LSG vs RR Toss Update (फोटो- सोशल मिडिया)
लखनौच्या एकाना स्टेडियवर 7.30 वाजता सुरू होणार सामना
वैभव सूर्यवंशी अन् यशवी जयस्वालच्या जोडीकडे लक्ष
ऋषभ पंत अन् रियान पराग आमनेसामने
Tata IPL 2026 LSG Vs RR Toss Live Updates: थोड्याच वेळात एकाना स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स अन् राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना सुरू (IPL 2026) होणार आहे. ऋषभ पंत लखनौचे तर रियान पराग राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करत आहे. आजच्या सामन्याची खेळपट्टी संथ असल्याचे समोर येत आहे. दरम्यान लखनौने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
राजस्थान रॉयल्स आणि लखनौचा संघ आपले मागील दोन्ही सामने पराभूत होऊन आले आहेत. त्यामुळे आजचा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा असणार आहे. लखनौकडून मुकुल चौधरी, ऋषभ पंत, मिशेल मार्श, मोहम्मद शामी असे खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. तर राजस्थान रॉयल्सकडून यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल आणि जोफरा आर्चर हे खेळाडू चांगली कामगिरी करत आहे.
हेड टू हेड रेकॉर्ड
आयपीएल इतिहासात आतापर्यंत या दोन संघांमध्ये एकूण ६ सामने खेळले गेले आहेत. यामध्ये राजस्थान रॉयल्सचे वर्चस्व दिसून येते. आकडेवारी पाहता राजस्थानचे पारडे दिसून yet आहे. मात्र होम ग्राऊंड असल्याने लखनौचा संघ हा रेकॉर्ड मोडण्याची शक्यता जास्त वर्तवली जात आहे. या सामन्यात दोन्ही संघांचे नेतृत्व नवीन दमाचे खेळाडू करत आहेत. लखनौचे नेतृत्व ऋषभ पंत कडे आहे, तर राजस्थानची धुरा रियान पराग सांभाळत आहे.
LSG Vs RR: शामी विरुद्ध Vaibhav Suryvanshi रंगणार सामना; पहा दोन्ही संघांची Playing 11
लखनौसाठी पंतची फटकेबाजी महत्त्वाची ठरेल. त्याने याच मैदानावर गेल्या हंगामात शतक झळकावले होते. राजस्थानचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून त्याने 6 सामन्यात 246 धावा केल्या आहेत. लखनौच्या प्रिन्स यादवने आतापर्यंत 11 विकेट्स घेतल्या आहेत, तर राजस्थानच्या रवी बिश्नोईने 10 विकेट्स घेतल्या आहेत.
अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवरील खेळपट्टी ही संथ समजली जाते. तसेच खेळपट्टी कोरडी देखील आहे. यामुळे या ठिकाणी स्पिनर्सना मोठी मदत मिळू शकते. मधल्या काही ओव्हर्समध्ये फलंदाजांना रन्स करण्यासाठी संघर्ष करावा लागू शकतो. तसेच सामना सुरू झाल्यावर काही ओव्हर्स नवीन चेंडूने वेगवान गोलंदाजांना थोडा स्विंग मिळू शकतो. मात्र, जसा सामना पुढे जाईल, तसे स्लोअर बॉल्स आणि कटर्स टाकणाऱ्या गोलंदाजांना यश मिळू शकते.
लखनौ सुपर जायंट्स : ऋषभ पंत (कर्णधार), एडन मार्कराम, हिम्मत सिंग, मॅथ्यू ब्रेट्झके, मुकुल चौधरी, अक्षत रघुवंशी, जोश इंग्लिस, मिचेल मार्श, अब्दुल समद, शाहबाज अहमद, अर्शीन कुलकर्णी, वानिंदू हसरंगा, आयुष मोहम्मद सिंह, महंमद सिंह, शहीद खान, शहीद खान, एम. राठी, आकाश सिंग, प्रिन्स यादव, अर्जुन तेंडुलकर, एनरिक नोर्टजे, नमन तिवारी, मयंक यादव, मोहसीन खान.
राजस्थान रॉयल्स : रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल, डोनोव्हन फरेरा, लुआन-ड्रे प्रिटोरियस, रवी सिंग, अमन पेरल, शिमरॉन हेटमायर, शुभम दुबे, वैभव सूर्यवंशी, यशस्वी जैस्वाल, रवींद्र जडेजा, ॲडम मिल्ने, ब्रिजेश शर्मा, नानफ्रा, जोफ्रा, अरविंद शर्मा, अरविंद कुमार, के. बर्गर, रवी बिश्नोई, संदीप शर्मा.






