Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vijay hazare trophy : न्यूझीलंडविरुद्ध डावललेल्या ऋतुराजने रचला इतिहास!ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाला मागे टाकत केला ‘हा’ कारनामा 

विजय हजारे ट्रॉफीचा लीगचा टप्पा संपला आहे. या स्पर्धेतून महाराष्ट्राला क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश मिळवता आला नाही. परंतु, महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने शेवटच्या सामन्यात इतिहास रचला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jan 09, 2026 | 04:31 PM
Vijay Hazare Trophy: Ruturaj, who was overlooked against New Zealand, created history! He achieved 'this' feat, surpassing an Australian legend.

Vijay Hazare Trophy: Ruturaj, who was overlooked against New Zealand, created history! He achieved 'this' feat, surpassing an Australian legend.

Follow Us
Close
Follow Us:

Ruturaj Gaikwad has made history : विजय हजारे ट्रॉफीचा लीगचा टप्पा संपला असून महाराष्ट्राला क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश मिळवण्यात अपयश आले आहे.  तथापि, महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने एक महत्त्वाचा टप्पा गाठण्यात यश मिळवले आहे.  लीग टप्प्यातील शेवटच्या सामन्यात त्याने शतक झळकावले. गोव्याविरुद्ध खेळताना गायकवाडने १३४ धावांची खेळी केली. ज्यामुळे महाराष्ट्राला जयपूरमध्ये पाच धावांनी विजय मिळवण्यात मदत झाली. या विजयानंतर मात्र ऋतुराजच्या संघाला स्पर्धेतून गाशा गुंडाळाव्या लागल्या.

हेही वाचा  : IPL 2026 मध्ये मुस्तफिजूर रहमानची होणार एंट्री? BCB प्रमुखांच्या विधानाने चर्चेला उधाण

गोव्याविरुद्धच्या १३४ धावांची खेळी करत  ऋतुराज गायकवाडने त्याच्या लिस्ट ए कारकिर्दीत ५,००० धावा पूर्ण केल्या. तसेच या दरम्यान त्याने त्याची सरासरी ५८.८३ पर्यंत वाढवली, जी आता या स्वरूपामध्ये किमान ५० सामने खेळणाऱ्या फलंदाजांमध्ये सर्वाधिक अशी आहे. अशा प्रकारे त्याने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज मायकेल बेवनचा ५७.८६ चा सर्वकालीन विक्रम देखील पिछाडीवर टाकला आहे. हा पराक्रम त्याने  ४२७ सामन्यांमध्ये (३८५ डाव) १५१०३ धावा करून साधला आहे.

सर्वाधिक लिस्ट ए सरासरी असलेले टॉप १० फलंदाज (किमान ५० डाव)

  1. ऋतुराज गायकवाड – ५८.८३ (९५ डावात ५०६० धावा)
  2. मायकेल बेवन – ५७.८६ (३८५ डावात १५१०३ धावा)
  3. सॅम हेन – ५७.७६ (६२ डावात ३००४ धावा)
  4. विराट कोहली – ५७.६७ (३३१ डावात १६२०७ धावा)
  5. चेतेश्वर पुजारा – ५७.०१ (१२७ डावात ५७५९ धावा)

एकदिवसीय संघात स्थान नाही

ऋतुराज गायकवाडचा उत्कृष्ट फॉर्म आणि शानदार कामगिरी असून देखील न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.  गायकवाडचा भारतीय संघात समावेश केला गेला नाही. तथापि, या मालिकेपूर्वी, ऋतुराज गायकवाडने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेच्या शेवटच्या सामन्यात शतक झळकावले होते. तरी देखील संघात त्याचा विचार करण्यात आला नाही.

गायकवाडच्या डच्चूवर उथप्पाचे भाष्य

ऋतुराज गायकवाडला संघातून डच्चू दिल्यानंतर, माजी भारतीय फलंदाज रॉबिन उथप्पाकडून निवड प्रक्रियेवर आपले मत व्यक्त करण्यात आले आहे. उथप्पाचा असा विश्वास आहे की जे खेळाडू भारताच्या “तीन मोठ्या राज्यांमधून” – मुंबई, दिल्ली किंवा पंजाबमधून येत नाहीत त्यांना नेहमीच भारतीय संघात त्यांचे स्थान टिकवून ठेवण्याचे आव्हानाचा सामना करावा लागतो.

हेही वाचा  : IPL 2026 : IPL मध्ये मुस्तफिजूर रहमान मालामाल! जाणून घ्या बंदीपूर्वी केली ‘इतकी’ कमाई

उथप्पा त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाला की, “जर तुम्ही मुंबई, दिल्ली किंवा पंजाबसारख्या मोठ्या क्रिकेट राज्यांमधून येत नसाल तर तुम्हाला सतत स्वतःला सिद्ध करावे लागत असते. अशा खेळाडूंसाठी संघात राहण्यासाठी सतत संघर्ष करावा लागतो. ” उथप्पा पुढे असे देखील म्हटलं की, ऋतुराज  गायकवाडला या काळात सकारात्मक मानसिकता राखण्याची आणि मानसिकदृष्ट्या मजबूत राहण्याची जास्त आवश्यकता आहे.

Web Title: Ruturaj who was overlooked against new zealand created history in the vijay hazare trophy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2026 | 04:31 PM

Topics:  

  • vijay hazare trophy 2025

संबंधित बातम्या

Vijay hazare trophy 2025-026 : सरफराज खानने घडवला इतिहास! 51वर्षांनंतर केला ‘हा’ कारनामा; ठरला पहिलाच फलंदाज
1

Vijay hazare trophy 2025-026 : सरफराज खानने घडवला इतिहास! 51वर्षांनंतर केला ‘हा’ कारनामा; ठरला पहिलाच फलंदाज

जखमी उपकर्णधाराची डरकाळी! श्रेयस अय्यरने केली 82 धावांची खेळी; मुंबई संघाचा 7 धावांनी विजयी 
2

जखमी उपकर्णधाराची डरकाळी! श्रेयस अय्यरने केली 82 धावांची खेळी; मुंबई संघाचा 7 धावांनी विजयी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.