Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs SL: टीम इंडियाला Back to Back झटके! बुमराहनंतर ‘हा’ खेळाडूही टेस्ट सीरीजमधून बाहेर

Sai Sudharsan Ruled out from ind vs sl test series: जसप्रीत बुमराहनंतर, साई सुदर्शन देखील दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 08, 2026 | 03:59 PM
IND Vs SL: टीम इंडियाला Back to Back झटके! बुमराहनंतर ‘हा’ खेळाडूही टेस्ट सीरीजमधून बाहेर
Follow Us
Follow Us:
  • भारताला मोठा धक्का
  • साई सुदर्शन टेस्ट सीरीजमधून बाहेर
  • पडिक्कल करणार तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी
भारत आणि श्रीलंका यांच्यात १५ ऑगस्टपासून दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाईल. या दौऱ्यापूर्वी भारताला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. डावखुरा फलंदाज साई सुदर्शन श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. साईच्या उजव्या पायाला स्ट्रेस फ्रॅक्चर झाले आहे. तो सध्या बंगळूरु येथील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये आहे. या दौऱ्यासाठी भारताच्या १५ सदस्यीय संघात त्याचा समावेश करण्यात आला होता. मात्र, त्याचा सहभाग तंदुरुस्तीवर आधारित होता, पण त्याआधी बरा होऊ शकला नाही.

क्रिकेट विश्वात अफगाण ‘वादळ’! ODI World Cup 2027 साठी थेट क्वालिफाय, ‘हा’ संघ पडला बाहेर?

साई सुदर्शन श्रीलंका कसोटी मालिकेतून बाहेर

वृत्तानुसार, साई सुदर्शनने नेटमध्ये १ तासाहून अधिक वेळ फलंदाजी केली आणि शारीरिक तयारीच्या सरावादरम्यान ताशी २४ किलोमीटर वेगाने धावला. मात्र, त्याच्या पायाच्या बोटात अजूनही वेदना होत असल्याचे या उघड झाले आहे. अशा परिस्थितीत, दोन दिवसांनी होणाऱ्या एमआरआय स्कॅननंतरच त्याच्या दुखापतीची तीव्रता कळेल.

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडलेला सुदर्शन हा दुसरा खेळाडू आहे . जसप्रीत बुमराहदेखील दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला होता. त्याच्या जागी आकिब नबीचा संघात समावेश करण्यात आला होता. मात्र, बीसीसीआयने अद्याप सुदर्शनच्या बदली खेळाडूची घोषणा केलेली नाही. सुदर्शन आणि बुमराह या दोघांचीही निवड तंदुरुस्तीवर अवलंबून होती आणि दोघेही बाहेर पडले आहेत.

पडिक्कल तिसऱ्या क्रमांकावर करणार फलंदाजी

सुदर्शन तंदुरुस्त असता, तर त्याचे तिसऱ्या क्रमांकावर खेळणे निश्चित मानले जात होते. मात्र, आता संघ व्यवस्थापनाला दुसऱ्या कोणाला तरी संधी द्यावी लागेल. सध्या भारतीय संघ श्रीलंका इलेव्हनविरुद्ध सराव सामना खेळत आहे. या सामन्यात देवदत्त पडिक्कलने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करून शानदार शतक झळकावले. त्यामुळे, आता तिसऱ्या क्रमांकावर त्याचे खेळणे निश्चित मानले जात आहे.

पडिक्कलने श्रीलंका इलेव्हनविरुद्ध १२१ चेंडूंमध्ये १०३ धावा केल्या आणि तो रिटायर्ड आऊट झाला. मात्र, भारताची चिंता कमी झालेली नाही. कर्णधार शुभमन गिलही जखमी असून त्याने सराव सामन्यात फलंदाजी केली नाही. शुक्रवारी, बीसीसीआयने तो क्षेत्ररक्षण करणार नाही असे सांगितले होते, परंतु त्याच्या फलंदाजीबद्दल कोणतीही माहिती दिली नाही.

💯 for Devdutt Padikkal! 🙌🙌 A superb knock from the left-handed batter in the warm-up game against SLC XI! 👏 👏 Updates ▶️ https://t.co/g7rdlUUjY2 #TeamIndia pic.twitter.com/eb0p6gnyEQ — BCCI (@BCCI) August 8, 2026

पहिला कसोटी सामना गॉलमध्ये

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना गॉलमध्ये खेळला जाईल. हे दोन संघ गॉलमध्ये पाच कसोटी सामन्यांमध्ये आमनेसामने आले आहेत. यापैकी, भारताने दोन सामने जिंकले आहेत आणि तीन गमावले आहेत. भारतीय संघ शेवटचा जुलै २०१७ मध्ये गॉलमध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळला होता, ज्यात टीम इंडियाने ३०४ धावांनी विजय मिळवला होता.

श्रीलंका कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ:

शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, देवदत्त पडिक्कल, सारांश जैन, आकिब नबी

पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ! PCB ची मोठी कारवाई; स्टार खेळाडूवर घातली २ वर्षांची बंदी

Web Title: Sai sudharsan ruled out from ind vs sl test series failing to recover from injury

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 03:59 PM

Topics:  

  • Devdutt Padikkal
  • IND vs SL
  • Sai Sudharsan
  • Test Series

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.