Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कॅमेरा सुरू झाला की Virat Kohli बदलतो? भारताच्याच माजी खेळाडूने थेट सांगितले; म्हणाले…

आरसीबीचा संघ आयपीएलमध्ये पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर आहे. आरसीबीचा संघ चांगला खेळ करत आहे. त्यातून भारताचा सर्वोत्तम फलंदाज आणि आरसीबीचा खेळाडू विराट कोलही जबरदस्त फॉर्ममध्ये खेळत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 12, 2026 | 07:33 PM
कॅमेरा सुरू झाला की Virat Kohli बदलतो? भारताच्याच माजी खेळाडूने थेट सांगितले; म्हणाले…
Follow Us
Follow Us:

विराट कोहलीबाबत संजय मांजरेकर यांचे भाष्य 
आरसीबीकडून विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये
पॉईंट्स टेबलमध्ये आरसीबी पहिल्या स्थानावर  

Virat Kohli In IPL 2026: आयपीएलचा महासंग्राम शेवटच्या टप्प्यात आला आहे. लवकरच प्ले ऑफचे सामने सुरू होणार आहेत. सध्या आरसीबीचा संघ आयपीएलमध्ये पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर आहे. आरसीबीचा संघ चांगला खेळ करत आहे. त्यातून भारताचा सर्वोत्तम फलंदाज आणि आरसीबीचा खेळाडू विराट कोलही जबरदस्त फॉर्ममध्ये खेळत आहे. आरसीबीकडून (IPL 2026) खेळताना, आपल्या उत्कृष्ट फलंदाजी, चपळ फिल्डिंग आणि मैदानावरील जबरदस्त ऊर्जेमुळे चर्चेत आहे. धावांचा पाऊस पाडण्यासोबतच मैदानावर प्रत्येक विकेटचे, क्षणाचा आनंद व्यक्त करणे ही त्याची ओळख आहे. मात्र आता यावर भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी भाष्य केले आहे.

विराट कोहली त्याच्या खेळीसोबत जबरदस्त आक्रमकतेसाठी ओळखला जातो. अनेकदा त्याच्या या अति-उत्साहावर आणि देहबोलीवर टीका केली जाते.  ‘विराट कोहली केवळ कॅमेऱ्यासाठी नाटक करतो’, असा आरोप अनेकदा विरोधकांकडून केला जातो. यावर संजय मांजरेकर यांनी भाष्य केले आहे. यामुळे टीका करणाऱ्यांची तोंडे बंद झाली आहेत.

विराट कोहलीचा मैदानावार दिसणारा आक्रमकपणा हा नवीन किंवा कोणताही दिखावा नाहीये. अनेक लोकांचा असा समज आहे की विराट केवळ समोर कॅमेरा बघून मुद्दाम असं वागतो, मात्र मी याच्याशी अजिबात सहमत नाहीये. मी त्याला सुरुवातीपासून ओळखतो. मी त्याला अंडर – 19 च्या संघाकडून खेळताना पाहिले आहे. तेव्हाही तो आक्रमकपणा दाखवायचा आणि आताही तो तसाच आहे. आक्रमकता त्याच्या क्रिकेट करिअरच्या सुरुवातीपासूनच त्याची खरी ओळख राहिली आहे, असे संजय मांजरेकर म्हणाले.

RCB Beat MI: मुंबई इंडियन्सचा ‘गेम ओव्हर’! आरसीबीने तोंडातील घास हिरावला, २ गडी राखून मिळवला शानदार विजय

आरसीबीने मुंबईच्या तोंडचा घास हिरावला

IPL २०२६ चा ५४ वा सामना रविवारी आरसीबी आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात, आरसीबी ने २ गडी राखून विजय मिळवला. हा सामना रायपूर येथे पार पडला, जिथे आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना, तिलक वर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर मुंबई इंडियन्सने १६६ धावांची एकूण धावसंख्या उभारली.

MI vs RCB Live Score: भुवीच्या भेदकमाऱ्या पुढे मुंबईचे फलंदाज हतबल! RCB समोर १६७ धावांचे आव्हान; तिलक वर्माची ५७ धावांची खेळी

आरसीबीने डावाच्या अगदी शेवटच्या चेंडूवर हे लक्ष्य यशस्वीरित्या गाठले. कृणाल पांड्याने एक शानदार अर्धशतक झळकावले, तर भुवनेश्वर कुमारने सामन्याचा उत्कृष्ट शेवट केला. पाच वेळा विजेते ठरलेल्या मुंबई संघाचे IPL 2026 मधील प्ले-ऑफच्या शर्यतीतून आव्हान संपुष्टात आले आहे. ११ सामन्यांमध्ये त्यांना हा आठवा पराभव पत्करावा लागला असून, गुणतालिकेत ते नवव्या स्थानावर आहेत. दुसरीकडे, तितक्याच सामन्यांमध्ये आपला सातवा विजय नोंदवत RCB संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी झेपावला आहे.

Web Title: Sanjay manjrekar statement abut virat kohli aggression in live match tata ipl 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 06:48 PM

Topics:  

  • IPL 2026
  • Royal Challengers Bangalore
  • Sanjay Manjrekar
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

‘क्रिकेटच्या देवा’चा रेकॉर्ड धोक्यात! केवळ 59 रन्स अन्…; चेस मास्टर Virat Kohli रचणार इतिहास
1

‘क्रिकेटच्या देवा’चा रेकॉर्ड धोक्यात! केवळ 59 रन्स अन्…; चेस मास्टर Virat Kohli रचणार इतिहास

IND vs WI ODI Series: ‘रो-को’ची जोडी पुन्हा मैदानात! Virat-Rohit वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज; पहिला सामना कधी-कुठे?
2

IND vs WI ODI Series: ‘रो-को’ची जोडी पुन्हा मैदानात! Virat-Rohit वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज; पहिला सामना कधी-कुठे?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.