फोटो सौजन्य - सोशल मीडिया
संजू सॅमसन-शशी थरूर : भारताच्या संघाने कमालीची कामगिरी करत बांग्लादेशच्या संघावर एकतर्फी विजय मिळवला. भारताच्या संघाने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली मालिका ३-० ने विजय मिळवून जेतेपद नावावर केले. विशेषतः भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये झालेल्या शेवटच्या तिसऱ्या सामन्यांमध्ये भारताच्या संघाने अनेक विक्रम मोडले आहेत. भारताचा सलामी फलंदाज संजू सॅमसन बांग्लादेशविरुद्ध झालेल्या मालिकेमधील पहिल्या दोन सामन्यांमध्ये फार काही चांगली कामगिरी करू शकला नाही. तिसऱ्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने बांग्लादेशविरुद्ध २९७ धावांचे लक्ष्य उभे केले आणि नवा विक्रम नावावर केला. यामध्ये सर्वात मोठे योगदान संजू सॅमसनचे होते.
बांग्लादेशविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या T२० सामन्यात संजू सॅमसनने झंझावाती शतक झळकावले. संजूने १११ धावांची इनिंग खेळली. या खेळीत त्याने ४७ चेंडूंचा सामना करत ११ चौकार आणि आठ षटकार मारले. बांगलादेशविरुद्धच्या शेवटच्या T२० सामन्यात संजूने लेगस्पिनर रशीद हुसेनच्या एका षटकात सलग पाच षटकार ठोकले आणि ४० चेंडूत शतक पूर्ण केले. त्याने सूर्यकुमार यादवसोबत दुसऱ्या विकेटसाठी १७३ धावांची भागीदारी केली. या सामन्यानंतर संजूच्या टॅलेंटची आणि त्याने केलेल्या हटके अंदाजामधील फलंदाजीची सर्वत्र चर्चा होत आहे. मालिका संपल्यानंतर संजू तिरुवनंतपुरम येथील त्याच्या घरी परतला तेव्हा काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी त्याची भेट घेतली आणि त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याचे अभिनंदन केले.
शशी थरूर यांनी त्यांच्या X हँडलवर संजूसोबतच्या भेटीचे काही फोटो शेअर केले आहेत. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, “”टॉन-अप संजू” मध्ये नायकाचे स्वागत करताना आनंद झाला कारण संजू सॅमसन बांगलादेशविरुद्धच्या शानदार शतकानंतर तिरुअनंतपुरमला परतला आहे. “त्याला सन्मान देण्यासाठी योग्य भारतीय रंगात पोनाडा.” “हे सापडले!”
Delighted to give a hero’s welcome to “ton-up Sanju” as @IamSanjuSamson returned to Thiruvananthapuram after his stunning century versus Bangladesh. Found a “ponnada” in the appropriate India colours to honour him with!
#SanjuSamson pic.twitter.com/g87SxHDOb2— Shashi Tharoor (@ShashiTharoor) October 14, 2024