KKR vs LSG: Wd, Wd, Wd..., Shardul Thakur's unwanted record, he became the first bowler to do so..
KKR vs LSG : आयपीएल २०२५ चा २१ वा सामना काल ८ एप्रिल मंगळवारी रोजी खेळवण्यात आला. या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला. हा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर खेळवण्यात आला होता. या सामन्यात एलएसजीकडून कोलकाता नाईट रायडर्सला ४ धावांनी पराभव पत्करावा लागला. एलसजीने प्रथम फलंदाजी करत २३८ धावांचा केल्या होत्या. तर प्रतिउत्तरात केकेआरला ७ गडी गमावून २३४ धावाच करता आल्या. एलएसजीने विजय जरी मिळवला असला तरी या सामन्यात एलएसजीचा गोलंदाज शार्दुल ठाकूरने एक नकोसा विक्रम केला आहे. तसेच आयपीएलच्या इतिहासात असा विक्रम करणारा तो पहिला गोलंदाज ठरला आहे.
ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या सामन्यामध्ये शार्दुल ठाकूरने आयपीएलच्या इतिहासात सर्वात जास्त वेळ षटक टाकण्याच्या बाबतीत तुषार देशपांडे आणि मोहम्मद सिराज यांच्यासोबत बरोबरी साधली आहे. लखनौ सुपर जायंट्सकडून १३ वे षटक टाकताना शार्दुलने या षटकात एकूण ११ चेंडू टाकले. हा एक स्वतःच विक्रम बनला आहे. याआधी, लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध तुषार देशपांडेने ११ चेंडूंचा सर्वात लांबलचक ओव्हर टाकला होता. तर मोहम्मद सिराजने मुंबई इंडियन्सविरुद्ध ११ चेंडूंचा एक ओव्हर टाकला होता.
हेही वाचा : CSK vs PBKS :त्याने CSK वर कहर बरसला! ३९ चेंडूत शतक ठोकणारा प्रियांश कोण? ६ सिक्सरचाही केलाय कारनामा..
१३ व्या षटकात शार्दुल ठाकूर गोलंदाजीसाठी आला. त्या षटकांत त्याने लागोपाठ ५ चेंडू वाईड टाकले. आयपीएलच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तो पहिला गोलंदाज बनला आहे. याआधी चार गोलंदाजांकडून सलग चार वाईड चेंडू टाकण्यात आले होते. आता मात्र, शार्दुलने त्याच्याही पुढे जाऊन सलग ५ चेंडू टाकले. सलग चार वाईड चेंडू टाकणाऱ्यांमध्ये जसप्रीत बुमराह (२०१५ ), प्रवीण कुमार (२०१७), मोहम्मद सिराज (२०२३) आणि खलील अहमद (२०२४) यासारख्या गोलंदाजांचा समावेश आहे.
कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध शार्दुल ठाकूरने २ विकेट्स मिळवल्या आहेत. त्याने केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेला सर्वात लांब टाकलेल्या षटकात बाद केले होते. त्यानंतर, त्याने धोकादायक आंद्रे रसेलला माघारी धाडले होते. शार्दुल ठाकूरने ५२ धावांच्या बदल्यात २ बळी घेतले. लखनौ सुपर जायंट्सने हा सामना ४ धावांनी आपल्या खिशात टाकला.
हेही वाचा : PBKS vs CSK : CSK विरुद्ध ‘किंग’ ठरल्यानंतरही पंजाबच्या खेळाडूला दणका! BCCI सोबत नडणे पडले महागात
आयपीएल २०२५ च्या या हंगामात शार्दुल ठाकूर खूप चर्चेत अलअ आहे. मेगा लिलावात कोणत्याही संघाने त्याला खरेदी केले नव्हते. त्यानंतर, लखनौ सुपर जायंट्सने जखमी वेगवान गोलंदाज मोहसीन खानच्या जागी ठाकूरला आपल्या संघात समाविष्ट करून घेतले. त्यानंतर शार्दुल ठाकूरने गोलंदाजीत चमकदार कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तो ५ सामन्यात ९ विकेट घेत पर्पल कॅपच्या शर्यतीत दाखल झाला आहे.