Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shivam Dube: “माझ्या आयुष्यातील खरा हिरो”, घरी पोहोचताच शिवम दुबेने वडिलांना घातले वर्ल्ड कपचे मेडल; भावूक Video व्हायरल

विजयानंतर मायदेशी परतलेल्या खेळाडूंचे जंगी स्वागत होत असतानाच, टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर शिवम दुबे (Shivam Dube) याचा एक अत्यंत हृदयस्पर्शी व्हिडिओ समोर आला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 12, 2026 | 05:35 PM
घरी पोहोचताच शिवम दुबेने वडिलांना घातले वर्ल्ड कपचे मेडल (Photo Credit- X)

घरी पोहोचताच शिवम दुबेने वडिलांना घातले वर्ल्ड कपचे मेडल (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

  • “माझ्या आयुष्यातील खरा हिरो”
  • घरी पोहोचताच शिवम दुबेने वडिलांना घातले वर्ल्ड कपचे मेडल
  • भावूक Video व्हायरल
भारतीय क्रिकेट संघाने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली ८ मार्च रोजी न्यूझीलंडचा पराभव करून टी-२० वर्ल्ड कप २०२६ वर आपले नाव कोरले. या ऐतिहासिक विजयानंतर मायदेशी परतलेल्या खेळाडूंचे जंगी स्वागत होत असतानाच, टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर शिवम दुबे (Shivam Dube) याचा एक अत्यंत हृदयस्पर्शी व्हिडिओ समोर आला आहे. वर्ल्ड कप जिंकून घरी परतल्यावर शिवमने विजयाचे मुख्य श्रेय आपल्या वडिलांना देत त्यांच्या गळ्यात सुवर्णपदक घातले, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

वडिलांच्या गळ्यात घातले सुवर्णपदक; भावूक क्षण कॅमेऱ्यात कैद

अहमदाबादहून मुंबईत आपल्या घरी पोहोचताच शिवम दुबेने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. या व्हिडिओमध्ये शिवम आपल्या वडिलांना टी-२० वर्ल्ड कपचे अधिकृत मेडल घालताना दिसत आहे. विशेष म्हणजे, यावेळी त्याचे वडील स्वतः टीम इंडियाची जर्सी घालून आपल्या लेकाची वाट पाहत होते. मुलाने दिलेल्या या अनमोल भेटीमुळे वडील राजेश दुबे कमालीचे भावूक झाले. हा व्हिडिओ शेअर करताना शिवमने “माझ्या आयुष्यातील खरा हिरो” असे कॅप्शन दिले आहे, ज्याने क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली आहेत.

सूर्यकुमार यादवला कर्णधारपदावरून काढून टाकणार की नाही? आकाश चोप्राने दिले उत्तर, म्हणाला – कदाचित पुढील सहा महिन्यांत…

वडिलांचा संघर्ष: घराच्या गच्चीवर बनवली होती टर्फ पिच

शिवम दुबेच्या आजच्या यशामागे त्याचे वडील राजेश दुबे यांचे मोठे बलिदान आहे. शिवमच्या सरावात खंड पडू नये म्हणून त्यांनी आपल्या घराच्या गच्चीवर स्वतः टर्फ पिच तयार करून घेतली होती. लहानपणी राजेश दुबे स्वतः तासनतास शिवमला बॉलिंग करायचे. सराव करून थकलेल्या शिवमच्या शरीराची ते स्वतः तेलाने मालिश करायचे, जेणेकरून तो दुसऱ्या दिवशी पुन्हा ताजेतवाने होऊन खेळू शकेल. पुढे त्यांनी शिवमला मुंबईतील प्रसिद्ध चंद्रकांत पंडित क्रिकेट अकादमीत दाखल केले, जिथून त्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला.

साधेपणाची चर्चा: विमानाऐवजी ट्रेनने केला प्रवास

विश्वविजेता झाल्यानंतरही शिवम दुबेचा साधेपणा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अहमदाबादहून मुंबईला येण्यासाठी विमानाचे तिकीट न मिळाल्याने त्याने चक्क ट्रेनने (३-टियर एसी) प्रवास करण्याचा निर्णय घेतला. प्रवाशांची गर्दी आणि ओळख पटू नये म्हणून त्याने चेहरा झाकून घेतला होता आणि गाडी सुटण्यापूर्वी अवघ्या ५ मिनिटे आधी तो आपल्या बर्थवर जाऊन झोपला. एक जागतिक विजेता खेळाडू इतक्या साधेपणाने प्रवास करतो, याचे कौतुक आता सर्वत्र होत आहे.

२०२६ च्या टी-२० विश्वचषकात शिवम दुबेची कामगिरी

टी-२० विश्वचषकात टीम इंडियासाठी फिनिशर म्हणून शिवम दुबेने शानदार कामगिरी केली, त्याने बॅट आणि बॉल दोन्हीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. दुबेने स्पर्धेत एकूण नऊ सामने खेळले, आठ डावांमध्ये ३९.१६ च्या सरासरीने २३५ धावा केल्या. त्याने एक अर्धशतकही झळकावले आणि त्याचा स्ट्राईक रेट १६९.०६ होता. दुबेने नऊ सामन्यांमध्ये पाच डावांमध्ये गोलंदाजी केली, २९.२ च्या सरासरीने पाच विकेट्स घेतल्या. त्याच्या प्रभावी कामगिरीने त्याने संघाच्या जेतेपदाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

NAMAN Awards: शुभमन गिलला मिळणार ‘क्रिकेटर ऑफ द इयर’चा पुरस्कार! या दिवशी बीसीसीआय करणार सन्मान

Web Title: Shivam dube gifts t20 world cup medal to father emotional video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 05:35 PM

Topics:  

  • cricket news
  • Shivam Dube
  • T20 World Cup 2026
  • Team India

संबंधित बातम्या

IND vs NZ: भारतविरूद्ध न्यूझीलंडने केली आपल्या Sqad ची घोषणा, ‘या’ 16 खेळाडूंचा समावेश
1

IND vs NZ: भारतविरूद्ध न्यूझीलंडने केली आपल्या Sqad ची घोषणा, ‘या’ 16 खेळाडूंचा समावेश

IND vs JPN: भारत आणि जपान ऐतिहासिक सामन्यासाठी तयार, मात्र पावसाने केला खोळंबा; थोड्याच वेळात होणार निरीक्षण
2

IND vs JPN: भारत आणि जपान ऐतिहासिक सामन्यासाठी तयार, मात्र पावसाने केला खोळंबा; थोड्याच वेळात होणार निरीक्षण

अभिषेक बच्चनच्या ETPL ला मिळाले पहिलेवहिले विजेतेपद! एडिनबर्ग कॅसल रॉकर्सने उंचावली ट्रॉफी
3

अभिषेक बच्चनच्या ETPL ला मिळाले पहिलेवहिले विजेतेपद! एडिनबर्ग कॅसल रॉकर्सने उंचावली ट्रॉफी

विलक्षण, अद्भुत! कुणाल गुप्ताचे झंझावाती शतक अन्…; ‘स्पार्टन मान्सुन लीग‌’मध्ये ‘या’ संघाचा दणदणीत विजय
4

विलक्षण, अद्भुत! कुणाल गुप्ताचे झंझावाती शतक अन्…; ‘स्पार्टन मान्सुन लीग‌’मध्ये ‘या’ संघाचा दणदणीत विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.