
मोलकरणीवर जबरदस्ती करत लैंगिक शोषण केल्याचा आरोप (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
सुलेमानने स्थानिक क्रिकेट खेळले आहे
४१ वर्षीय सुलेमान कादिर २००५ ते २०१३ पर्यंत प्रथम श्रेणी आणि लिस्ट ए क्रिकेट खेळला आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ८५६ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये एक शतक आणि लिस्ट ए क्रिकेटमध्ये ६१५ धावा आहेत. त्याचा भाऊ उस्मान कादिर याने पाकिस्तानसाठी एक एकदिवसीय आणि २५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. अब्दुल कादिर हा क्रिकेट इतिहासातील महान लेग-स्पिनरपैकी एक मानला जातो. त्याने ६७ कसोटी सामन्यात २३६ बळी आणि १०४ एकदिवसीय सामन्यात १३२ बळी घेतले आहेत. २०१९ मध्ये वयाच्या ६३ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
ही घटना २२ जानेवारी रोजी घडली
महिलेच्या म्हणण्यानुसार, ती रोज सुलेमान कादिरच्या घरी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत घरकाम करत होती. तिने पोलिसांना सांगितले की २२ जानेवारी रोजी सुलेमानने तिला फोन करून दुसऱ्या दिवशी सकाळी फार्महाऊस साफ करायचे आहे असे सांगितले. महिलेने सांगितले की फार्महाऊसवर आल्यानंतर सुलेमानने तिचा विनयभंग करण्यास सुरुवात केली. त्याने तिच्यावर हल्ला केल्याचा आरोपही तिने यावेळी केला आहे.
माजी क्रिकेटपटूच्या मुलाने तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केल्याचे घरकाम करणाऱ्या महिलेने सांगितले आणि त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी अशी विनंतीही केली आहे. दरम्यान पाकिस्तानच्या क्रिकेट विश्वात या गोष्टीमुळे खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांकडून माहिती मिळाली असून सुलेमानकडून कोणत्याही प्रकारची पुष्टी देण्यात आलेली नाही. त्याच्या कुटुंबीयांनी कोणतेही स्पष्टीकरण यावर दिलेले अजून समोर आलेले नाही.