Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asia Cup 2025: ‘…आणि काय करायला हवं’, श्रेयस अय्यरच्या वडिलांना राग अनावर; BCCI वर प्रश्न केले उपस्थित

Shreyas Iyer: श्रेयस अय्यरला आशिया कप २०२५ साठी भारतीय संघात स्थान मिळालेले नाही. आता त्याच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्याने चोख उत्तर दिले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Aug 21, 2025 | 04:25 PM
Asia Cup 2025: ‘…आणि काय करायला हवं’, श्रेयस अय्यरच्या वडिलांना राग अनावर; BCCI वर प्रश्न केले उपस्थित
Follow Us
Close
Follow Us:

Shreyas Iyer Father On BCCI: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) नुकतीच आशिया कप २०२५ (Asia Cup 2025) साठी भारतीय संघाची (Team India) घोषणा केली, ज्यात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली, तर काही अनुभवी खेळाडू दुर्लक्षित झाले. या दुर्लक्ष झालेल्या खेळाडूंमध्ये श्रेयस अय्यरचा (Shreyas Iyer) समावेश होता, ज्याने आयपीएल २०२५ आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती. या निवड समितीच्या निर्णयावर श्रेयसचे वडील संतोष अय्यर (Santosh Iyer) यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

श्रेयसच्या वडिलांची प्रतिक्रिया

टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना संतोष अय्यर म्हणाले की, “श्रेयसला भारतीय टी-२० संघात स्थान मिळवण्यासाठी आणखी काय करावे लागेल, हे मला समजत नाही.” त्यांनी श्रेयसच्या सातत्यपूर्ण कामगिरीवर भर दिला. ते म्हणाले, “तो अनेक वर्षांपासून आयपीएलमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आहे. दिल्ली कॅपिटल्सपासून ते कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्जपर्यंत त्याने कर्णधार म्हणूनही उत्तम कामगिरी केली आहे. त्याने २०२४ मध्ये केकेआरला आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले आणि यावर्षी पंजाब किंग्जला अंतिम फेरीत पोहोचवले.”

Shreyas Iyer’s father Santosh Iyer, speaks out on the omission of his son Shreyas Iyer from India’s squad for the Asia Cup 2025.#SantoshIyer #ShreyasIyer #Indiancricket #T20I #AsiaCup2025 #Insidesport #CricketTwitter pic.twitter.com/XxgURfFvFr — InsideSport (@InsideSportIND) August 21, 2025

आता शुभमन गिल नाही तर श्रेयस अय्यर असेल नवा कर्णधार! मोठी अपडेट आली समोर आली

आपल्या मुलाला कर्णधार बनवण्याची त्यांची अपेक्षा नसून, केवळ त्याला संघात स्थान मिळावे अशी त्यांची इच्छा आहे. संतोष अय्यर पुढे म्हणाले की, “भारतीय संघातून वगळले गेल्यावरही श्रेयसच्या चेहऱ्यावर कोणताही राग नसतो. तो फक्त ‘हे माझे नशीब आहे! आता तू काहीही करू शकत नाहीस,’ असे म्हणतो. तो नेहमी शांत आणि संयमी असतो. तो कोणालाही दोष देत नाही. पण अर्थातच, तो आतून निराश असतो.”

माजी क्रिकेटपटूंनीही व्यक्त केली निराशा

श्रेयसची निवड न झाल्याने अनेक माजी क्रिकेटपटूंनीही निराशा व्यक्त केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून त्याने सर्व फॉरमॅटमध्ये चांगली फलंदाजी केली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करून त्याने संघाला विजय मिळवून देण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र, भारतीय संघात असलेल्या तीव्र स्पर्धेमुळे सध्या त्याला टी-२० संघात स्थान मिळू शकलेले नाही.

श्रेयसचे टी-२० आंतरराष्ट्रीय पुनरागमन

श्रेयस अय्यरने आपला शेवटचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना २०२३ मध्ये खेळला होता. तेव्हापासून तो भारतीय संघाबाहेर आहे. २०२४ च्या टी-२० विश्वचषकातही त्याचा समावेश नव्हता. मात्र, पुढील वर्षी पुन्हा टी-२० विश्वचषक होणार असून, श्रेयसकडे संघात परतण्याची अजूनही संधी आहे. आशिया कपनंतर भारतीय संघ आणखी १५ टी-२० सामने खेळणार आहे. जर श्रेयसने आपली चांगली कामगिरी कायम ठेवली, तर त्याचे टी-२० संघात पुनरागमन होऊ शकते.

Web Title: Shreyas iyers father furious after not being selected for asia cup questions bcci

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2025 | 04:25 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • bcci
  • Shreyas Iyer
  • Sports
  • Sports News
  • Team India

संबंधित बातम्या

IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडिया ‘या’ दिवशी होणार रवाना, तर रोहित-विराटबद्दल मोठी अपडेट आली समोर
1

IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडिया ‘या’ दिवशी होणार रवाना, तर रोहित-विराटबद्दल मोठी अपडेट आली समोर

‘Team India’ चे नाव बदलण्याच्या मागणीवर हायकोर्टाने याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले- ‘जी टीम जगात…’
2

‘Team India’ चे नाव बदलण्याच्या मागणीवर हायकोर्टाने याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले- ‘जी टीम जगात…’

ICC Ranking : मिया मॅजिकची आता ICC ला भुरळ! कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत सिराजने गाठली मोठी ऊंची  
3

ICC Ranking : मिया मॅजिकची आता ICC ला भुरळ! कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत सिराजने गाठली मोठी ऊंची  

IND VS PAK : ‘भारत-पाक सामने थांबवा.., त्यांचा वापर..’, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा घणाघात 
4

IND VS PAK : ‘भारत-पाक सामने थांबवा.., त्यांचा वापर..’, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा घणाघात 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.