Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात  शुभमन गिल दिल्ली जिंकणार? डॉन ब्रॅडमनशी नाव जोडून रचणार इतिहास 

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दूसरा सामना १० ऑक्टोबरपासून खेळला जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलला मोठा विक्रम रचण्याची संधी आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 09, 2025 | 08:39 PM
IND vs WI: Will Shubman Gill win Delhi in the match against West Indies? Will he create history by linking his name with Don Bradman?

IND vs WI: Will Shubman Gill win Delhi in the match against West Indies? Will he create history by linking his name with Don Bradman?

Follow Us
Close
Follow Us:

Indian Test captain Shubman Gill will create history : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मलिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना अहमदाबाद येथे खेळला गेला होता. या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजला अडीच दिवसात पराभूत केले होते. आता या मालिकेतील  दुसरा सामना १० ऑक्टोबरपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाईल. भारतीय संघ सध्या मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. दुसऱ्या सामन्यात संघाचा तरुण कर्णधार शुभमन गिलला इतिहास रचण्याची संधी  आहे.

हेही वाचा : IND W vs SA W : स्मृती मानधनाचा महिला क्रिकेटमध्ये धुमाकूळ!एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक एकदिवसीय धावांचा पाडला पाऊस

शुबमन गिलच्या रडावर मोठा विक्रम

भारतीय संघाचा  कर्णधार म्हणून जबाबदारी स्वीकारल्यापासून, शुभमन गिल सातत्याने खोऱ्याने धावा काढत असल्याचे दिसून येत आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत तो मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही ठरला होता.  आता, त्याच्याकडे सर्वात जलद १००० कसोटी धावा पूर्ण करणारा भारतीय कर्णधार बनण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे.

आतापर्यंत हा विक्रम ऑस्ट्रेलियाचे दिग्गज फलंदाज डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर जमा आहे. ज्यांनी कर्णधार म्हणून फक्त ११ डावात १००० धावा फटकावल्या होत्या. शुभमन गिल ब्रॅडमननंतर हा विक्रम करणारा पहिला फलंदाज बनण्याची शक्यता आहे. त्याने आधीच १० डावात ८०५ धावा केल्या असून त्याला आणखी १९६ धावा करायची गरज आहे. जर त्याने ही कामगिरी केली तर तो इतिहास रचेल.  १,००० कसोटी धावा पूर्ण करणारा सर्वात जलद भारतीय कर्णधाराचा विक्रम सध्या सुनील गावस्कर यांच्या नावावर जमा आहे.  ज्यांनी १५ डावात १००० धावांचा टप्पा गाठला आहे.

शुभमन गिलची बॅट तळपणार

सध्याच्या फॉर्म पाहता, शुभमन गिल दुसऱ्या कसोटी सामन्यात मोठी खेळी खेळण्याची अपेक्षा आहे. त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत शानदार अर्धशतक झळकावले होते. अरुण जेटली स्टेडियमवरील खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल असल्याचे मानली जाते. खेळपट्टी लहान आणि वेगवान असल्याने चौकार मारणे सोपे होते. त्यामुळे, हा सामना गिलसाठी विक्रम प्रस्थापित करण्याची सुवर्णसंधी ठरण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : ‘मला रोहित भाईचा संयम…’, कर्णधार शुभमन गिलने हिटमॅनकडून कोणता धडा गिरवला? वाचा सविस्तर

शुभमन गिलची क्रिकेट कारकिर्द

शुभमन गिलने भारतासाठी ३८ कसोटी सामने खेळले असून ज्यामध्ये त्याने ४१.४९ च्या सरासरीने २,६९७ धावा फटकावल्या आहेत.  या काळात त्याने नऊ शतके आणि आठ अर्धशतके झळकवली आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने ५५ सामन्यांमध्ये ५९.०४ च्या सरासरीने २,७५५ धावा केल्या आहेत, तर २८ टी-२० सामन्यांमध्ये त्याने ७०५ धावा काढल्या आहेत.

Web Title: Shubman gill to create history by joining don bradman in match against west indies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2025 | 08:39 PM

Topics:  

  • Ind vs WI
  • Shubhman Gill
  • Test Match

संबंधित बातम्या

‘मला रोहित भाईचा संयम…’, कर्णधार शुभमन गिलने हिटमॅनकडून कोणता धडा गिरवला? वाचा सविस्तर 
1

‘मला रोहित भाईचा संयम…’, कर्णधार शुभमन गिलने हिटमॅनकडून कोणता धडा गिरवला? वाचा सविस्तर 

IND vs WI: भारत-वेस्ट इंडिज यांच्यात रंगणार दूसरा कसोटी सामना! हा सामना कधी, कुठे आणि कसा पाहायचा? वाचा सविस्तर 
2

IND vs WI: भारत-वेस्ट इंडिज यांच्यात रंगणार दूसरा कसोटी सामना! हा सामना कधी, कुठे आणि कसा पाहायचा? वाचा सविस्तर 

IND vs AUS: ‘त्यांच्यासारखे लोक खूप कमी…’, कसोटी कर्णधार शुभमन गिलचे ‘या’ दोन माजी कर्णधारांवर भाष्य 
3

IND vs AUS: ‘त्यांच्यासारखे लोक खूप कमी…’, कसोटी कर्णधार शुभमन गिलचे ‘या’ दोन माजी कर्णधारांवर भाष्य 

Gautam Gambhir च्या डिनर पार्टीला कोण कोण होते उपस्थित? भारताचा संपूर्ण संघ बसमध्ये, तर हर्षित राणाची खास गाडीत एन्ट्री
4

Gautam Gambhir च्या डिनर पार्टीला कोण कोण होते उपस्थित? भारताचा संपूर्ण संघ बसमध्ये, तर हर्षित राणाची खास गाडीत एन्ट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.