स्मृती मानधना(फोटो-सोशल मीडिया)
IND W vs SA W: आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकतील दहावा सामना विशाखापट्टणम येथील डॉ.वाय.एस. राजशेखर रेड्डी ACA-VDCA क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत आहे. या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार सलामीवीर स्मृती मानधनाने पुन्हा एकदा तिच्या उत्कृष्ट कामगिरीने इतिहास रचला आहे.
२०२५ च्या एकदिवसीय विश्वचषक दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात स्मृती मानधनाने फक्त २३ धावा करून ती माघारी परतली असली तर देखील या छोट्या खेळीने तिने एक महत्त्वाचा टप्पा पार केला आही. स्मृती आता एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक एकदिवसीय धावा करणारी महिला फलंदाज बनली आहे. या कामगिरीसह तिने ऑस्ट्रेलियन क्रिकेट दिग्गज मेलिंडा क्लार्कचा १९९७ पासूनचा २७ वर्षांचा विक्रम मोडीत काढला आहे.
हेही वाचा : IND VS AUS : रोहित-विराटची क्रिकेट कारकीर्द संपवली?अजित आगरकर ट्रोल; BCCI चा मोठा निर्णय..
१९९७ मध्ये, क्लार्कने १६ सामन्यांपैकी १४ डावांमध्ये ८०.८३ च्या प्रभावी सरासरीने ९७० धावा फटकावल्या होत्या. त्या काळात तिने तीन शतके आणि चार अर्धशतके झळकावली होती. दरम्यान, स्मृती मानधनाने २०२५ मध्ये १७ डावांमध्ये ९८२ धावा करून एक नवा इतिहास रचला आहे. या काळात तिने चार शतके आणि तीन अर्धशतके झळकावली आहेत. यामध्ये मनोरंजक गोष्ट म्हणजे, मेलिंडा क्लार्क आणि स्मृती मानधना वगळता इतर कोणत्याही महिला फलंदाजाला एका कॅलेंडर वर्षात ९०० धावांचा टप्पा गाठता आलेला नाही. या तिच्या आकडेवारीवरुन स्मृती मानधनाची प्रतिभा दिसून येते.
स्मृती मानधना यांची एकदिवसीय कारकीर्द देखील अपवादात्मक राहिली आहे. तिने १११ एकदिवसीय सामने खेळले असून ज्यामध्ये ४८ च्या सरासरीने ४,९०० पेक्षा जास्त धावा फटकावल्या आहेत. या काळात तिने १३ शतके आणि ३२ अर्धशतके ठोकली आहेत. तिची सर्वोच्च एकदिवसीय धावसंख्या १३६ इतकी राहिली आहे. भारतीय महिला क्रिकेट इतिहासात एकदिवसीय स्वरूपात मानधना दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक धावा करणारी फलंदाज असून पहिल्यास्थानी ७,८०५ धावा करणारी दिग्गज मिताली राज आहे.
२०२५ हे वर्ष स्मृती मानधनाच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचे सर्वात आशादायक वर्ष ठरलेले दिसते. या वर्षी तिने एकूण चार शतके ठोकली आहेत. जानेवारीमध्ये तिने आयर्लंडविरुद्ध १३५ धावांची खेळी केली होती. त्यानंतर मे महिन्यात श्रीलंकेविरुद्ध ११६ धावा केल्या. तसेच सप्टेंबरमध्ये तिने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग एकदिवसीय सामन्यात ११७ आणि १२५ धावा करून तिच्या फलंदाजीची क्षमता दाखवली आहे.
हेही वाचा : ‘मला रोहित भाईचा संयम…’, कर्णधार शुभमन गिलने हिटमॅनकडून कोणता धडा गिरवला? वाचा सविस्तर