Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs WI : 200 पार; पण भारताच्या बॉलर्सचा पुन्हा कस लागणार, ‘दव’ पुन्हा डोकेदुखी ठरणार?

IND vs WI : मालिकेतील तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना विंडीजसमोर सर्वबाद 224 धावांचे आव्हान दिले आहे. मात्र दुसऱ्या इनिंगमध्ये 'दव' हे भारतीय क्षेत्ररक्षणादरम्यान डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 11, 2026 | 08:48 PM
IND vs WI : 200 पार; पण भारताच्या बॉलर्सचा कस लागणार, 'दव' पुन्हा डोकेदुखी ठरणार?

IND vs WI : 200 पार; पण भारताच्या बॉलर्सचा कस लागणार, 'दव' पुन्हा डोकेदुखी ठरणार?

Follow Us
Follow Us:
  • अभिषेकच्या ऐतिहासिक 2 हजार धावांचा टप्पा पूर्ण
  • भारताची मधली फळी पुन्हा ढासळली
  • विंडीजच्या गोलंदाजांचे दबावतंत्र
 

इंदौरच्या होळकर स्टेडियममध्ये सुरू असलेल्या मालिकेतील (IND vs WI) तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताने सर्वबाद बाद 224 धावांचे आव्हान वेस्ट इंडिजला दिले आहे. अभिषेक शर्मा (69) वगळता संघातील कोणालाच अर्धशतक गाठता आलं नाही, परिणामी पहिल्या इनिंगमध्ये वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा घेतलेला निर्णय एकप्रकारे योग्य असाच ठरला.
मागील सामन्यातील वेस्ट इंडिजच्या मधल्या फळीतील फलंदाजांचा फॉर्म पाहता, भारतीय गोलंदाजांना टिचून गोलंदाजी करावी लागणार आहे.

तसेच मैदानात पडलेला ‘दव’ (Dewdrop) हा पुन्हा क्षेत्ररक्षण करताना डोकेदुखी ठरण्याची शक्यता असून भारताला चांगल्या गोलंदाजीसह क्षेत्ररक्षणावरही पकड निर्माण करावी लागेल.

अभिषेकच्या 2 हजार धावांचा टप्पा पूर्ण

सलामीला आलेल्या अभिषेकने संजू सॅमसन (3)चा विकेट झटपट पडल्यानंतरही त्याचं ओझं आपल्या कामगिरीवर पडू दिलं नाही. त्यानं इशान किशनच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी 108 धावांची भागीदारी रचली. यातील 63 धावा या अभिषेकच्या होत्या. अभिषेकने 30 चेंडूंत 6 चौकार व 5 षटकारांच्या मदतीने 69 धावांची खेळी केली. तो शतक पूर्ण करेल असे वाटत असताना, शेमर स्प्रिंगरने आपल्याच गोलंदाजीवर त्याला झेलबाद केले.
दरम्यान, या खेळीदरम्यान, अभिषेकने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. तो टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वात जलद 2,000 धावा करणारा फलंदाज ठरला आहे. अभिषेकने आपली 33 वी धाव पूर्ण करताच हा विश्वविक्रम साधला. त्याने 1,024 चेंडूंमध्ये 2,000 धावा पूर्ण केल्या. सर्वात कमी चेंडूंमध्ये 2,000 धावांचा टप्पा गाठणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. यासह, त्याने सूर्यकुमार यादवचा विश्वविक्रम देखील मोडला.

IND A vs AUS A: गुरजापनीत-सूर्यांश शेडगेचा धमाका, कांगारूंना अखेर दणका; टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला लोळवलं

पुन्हा मधली फळी ढासळली

मधल्या फळीतील इशान किशन (37) वगळता, कोणत्याच फलंदाजाला टिकून खेळता आलं नाही. 28 धावा करणारा तिलक वर्मा याला अपवाद वाटत असला तरी, तोही विचित्ररित्या धावचीत झाला. कर्णधार श्रेयस अय्यर (1) असो, नमन धीर (10) असो वा नितीशकुमार रेड्डी (21) स्वस्तात बाद झाले.

ISSF वर्ल्ड कपमध्ये उदयवीर सिद्धूची सुवर्ण कामगिरी; १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात पटकावले सुवर्णपदक

विंडीजच्या गोलंदाजांचे दबावतंत्र

भारताने पहिल्या इनिंगमध्ये या 223 धावांचा पल्ला जरी गाठला असला तरी, वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासून भारतीय फलंदाजांवर दबावतंत्र निर्माण केले होते. रोस्टन चेजने तर अय्यर व लयात आलेल्या इशान किशनचा विकेट मिळवला. रोस्टनने 38 धावांत 2 विकेट, तर शेमर स्प्रिंगरने 50 धावा देत 2 विकेट मिळवल्या. तर शेमर जोसेफ, किमो पाउल आणि गुडकेश मोती यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.

Web Title: Ind vs wi indore t 20 series 224 runs west indies rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2026 | 08:48 PM

Topics:  

  • Ind vs WI
  • indore
  • T-20 Series

संबंधित बातम्या

Abhishek Sharma Record: अभिषेक शर्माचा मैदानात ‘रुद्रावतार’! T20I मध्ये सर्वात जलद २ हजार धावा; सूर्यकुमारचा विक्रम धुळीस
1

Abhishek Sharma Record: अभिषेक शर्माचा मैदानात ‘रुद्रावतार’! T20I मध्ये सर्वात जलद २ हजार धावा; सूर्यकुमारचा विक्रम धुळीस

IND vs WI 3rd T20I: वैभव सूर्यवंशीला पुन्हा डच्चू? संजू सॅमसनच्या खेळीने समीकरण बदललं; पाहा भारताची संभाव्य Playing 11
2

IND vs WI 3rd T20I: वैभव सूर्यवंशीला पुन्हा डच्चू? संजू सॅमसनच्या खेळीने समीकरण बदललं; पाहा भारताची संभाव्य Playing 11

IND vs WI 3rd T20I: इंदौरमध्ये आज पाऊस खेळ बिघडवणार? तिसऱ्या T20I मध्ये कसं असेल हवामान? पाहा Weather Report
3

IND vs WI 3rd T20I: इंदौरमध्ये आज पाऊस खेळ बिघडवणार? तिसऱ्या T20I मध्ये कसं असेल हवामान? पाहा Weather Report

IND vs WI: Shai Hope चा धावांचा धुमाकूळ! ६ दिवसांत ठोकल्या तब्बल ‘इतक्या’ रन्स; रोहित शर्माला खेळाडूला टाकले मागे
4

IND vs WI: Shai Hope चा धावांचा धुमाकूळ! ६ दिवसांत ठोकल्या तब्बल ‘इतक्या’ रन्स; रोहित शर्माला खेळाडूला टाकले मागे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.