Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 12 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ICC Hall of Fame: भारतासाठी अभिमानाचा क्षण! सौरव गांगुली-अंजुम चोप्रा यांना क्रिकेटमधील सर्वोच्च सन्मान

Sourav ganguly Anjum Chopra in ICC Hall of Fame: आयसीसीने भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली आणि महिला संघाच्या माजी कर्णधार अंजुम चोप्रा यांना प्रतिष्ठेच्या 'आयसीसी हॉल ऑफ फेम'मध्ये समाविष्ट केले आहे. त्यांच्यासोबत इंग्लंडचे माजी कर्णधार केविन पीटरसन यांचाही सन्मान करण्यात आला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 12, 2026 | 07:35 PM
ICC Hall of Fame: भारतासाठी अभिमानाचा क्षण! सौरव गांगुली-अंजुम चोप्रा यांना क्रिकेटमधील सर्वोच्च सन्मान
Follow Us
Follow Us:
  • सौरव गांगुली-अंजुम चोप्रा यांना क्रिकेटमधील सर्वोच्च सन्मान
  • सौरव गांगुलीने व्यक्त केला आनंद
  • अंजुम चोप्राची शानदार कारकीर्द
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) भारतीय क्रिकेटमधील दोन दिग्गज, माजी पुरुष कर्णधार सौरव गांगुली आणि माजी महिला कर्णधार अंजुम चोप्रा, यांना प्रतिष्ठित ‘आयसीसी हॉल ऑफ फेम’मध्ये समाविष्ट केले आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन यालाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्कॉटलंडमधील एडिनबर्ग येथे शनिवारी आयोजित एका भव्य समारंभात ही घोषणा करण्यात आली. हा सन्मान अशा खेळाडूंना दिला जातो, ज्यांनी क्रिकेटच्या जगात मोठी कामगिरी केली आहे किंवा विशेष योगदान दिले आहे.

FIFA World Cup 2026 Semi Finals: ट्रॉफीच्या शर्यतीत आता फक्त ४ संघ! सेमिफायनलचा थरार रंगणार; पाहा संपूर्ण शेड्यूल

सौरव गांगुलीने व्यक्त केला आनंद

आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समावेश झाल्यावर सौरव गांगुलीने आनंद व्यक्त केला. गांगुली म्हणाले की, ‘आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये माझा समावेश होणे ही माझ्यासाठी अत्यंत सन्मानाची बाब आहे. क्रिकेटमधील महान खेळाडूंच्या नावांमध्ये माझे नाव पाहणे ही माझ्यासाठी नेहमीच अभिमानाची बाब असेल. भारताचे प्रतिनिधित्व करणे हे माझ्यासाठी एक सौभाग्य होते आणि आता अशा प्रकारे सन्मानित होणे हा एक खूप खास अनुभव आहे.’ आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांचे आभार मानताना ते म्हणाले की, कोणत्याही क्रिकेटपटूसाठी हा सर्वोच्च सन्मान आहे. त्यांनी भविष्यातही क्रिकेटची सेवा करत राहण्याची इच्छा व्यक्त केली. सौरव गांगुली आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळवणारे १० वे भारतीय क्रिकेटपटू ठरले आहेत.

𝐂𝐀𝐏𝐓𝐀𝐈𝐍 𝐂𝐎𝐔𝐑𝐀𝐆𝐄𝐎𝐔𝐒 🫡 A champion batter and a fearless leader, Sourav Ganguly is inducted into the ICC Hall of Fame 🎖️ More ➡️ https://t.co/4PSL2SOlj0 pic.twitter.com/pai5wMR9uW — ICC (@ICC) July 11, 2026

मी त्या सर्वांची आभारी- अंजुम चोप्रा

माजी भारतीय महिला कर्णधार आणि सध्याच्या क्रिकेट कॉमेन्ट्रेटर अंजुम चोप्रा यांनी आनंद व्यक्त केला. ती म्हणाली की, ‘भारतीय जर्सी परिधान करणे ही माझ्यासाठी नेहमीच अभिमानाची बाब राहिली आहे. आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळणे ही माझ्या संपूर्ण करिअरला आकार देणाऱ्या सर्वांच्या प्रयत्नांचा सन्मान आहे. मी त्या सर्वांची आभारी आहे.’ अंजुम चोप्रा आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळवणारी तिसरी भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. यापूर्वी हा सन्मान नीतू डेव्हिड आणि डायना एडुलजी यांना मिळाला आहे.

𝗜𝗡𝗗𝗜𝗔’𝗦 𝗧𝗥𝗔𝗜𝗟𝗕𝗟𝗔𝗭𝗘𝗥 🙌 Dependable, tactical and a pioneer of women’s cricket in India, Anjum Chopra enters the ICC Hall of Fame 🎖️ More ➡️ https://t.co/PlG9VLk4nx pic.twitter.com/4llcRhqO7m — ICC (@ICC) July 11, 2026

जय शाह यांनी तिन्ही खेळाडूंचे केले अभिनंदन

आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी तिन्ही खेळाडूंचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, ‘हा सन्मान अशा खेळाडूंना दिला जातो ज्यांनी आपल्या कामगिरी आणि योगदानाने क्रिकेटला नव्या उंचीवर नेले आहे.’ ते पुढे म्हणाले की ,’सौरव गांगुली, अंजुम चोप्रा आणि केविन पीटरसन यांनी शानदार कामगिरी करत आपापल्या देशांचे नेतृत्व केले आहे. आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळाल्याने, त्यांची कामगिरी येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.’

गांगुलीची आंतरराष्ट्रीय कारकिर्द

सौरव गांगुलीने आपल्या १६ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण १८,५७५ धावा केल्या. १९९६ मध्ये लॉर्ड्सवर कसोटी शतक झळकावून त्याने आपल्या कारकिर्दीची शानदार सुरुवात केली. कर्णधार म्हणून त्याने भारतीय संघाला २००३ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचवले.

अंजुम चोप्राची शानदार कारकीर्द

अंजुम चोप्राने भारतासाठी १२ कसोटी, १२७ एकदिवसीय आणि १४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले. तसेच, त्या महिलांच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये १,००० धावा पूर्ण करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला क्रिकेटपटू ठरल्या. १७ वर्षे भारतीय संघाकडून क्रिकेट खेळून आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ३,५०० हून अधिक धावा केल्या आहेत. १०० एकदिवसीय सामने खेळणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू होती

इंग्लंडच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या पीटरसनचाही या यादीत समावेश झाला आहे. पीटरसनने इंग्लंडसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १३,७९७ धावा केल्या आहेत. पीटरसननेही या सन्मानाबद्दल आयसीसीचे आभार मानले आहेत.

BCCI चा मोठा निर्णय! इंग्लंड आणि झिम्बाब्वे मालिकेतून हर्षित राणा-वरुण चक्रवर्ती बाहेर; नेमकं कारण काय?

Web Title: Sourav ganguly anjum chopra kavin petreson inducted into icc hall of fame 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 07:35 PM

Topics:  

  • ICC
  • Jay shah
  • Sourav Ganguly
  • Womens cricket team

संबंधित बातम्या

Sourav Ganguly Birthday: Off Side चा ‘देव’ सौरव गांगुली झाला 53 वर्षांचा, शत्रुच्या घरात जाऊन लावायचा विल्हेवाट
1

Sourav Ganguly Birthday: Off Side चा ‘देव’ सौरव गांगुली झाला 53 वर्षांचा, शत्रुच्या घरात जाऊन लावायचा विल्हेवाट

क्रिकेट मॅचदरम्यान कंडोम आणि डेटिंग Apps च्या जाहिरातींवर बंदी घाला! CTI चे ICC अध्यक्ष जय शाह यांना खळबळजनक पत्र
2

क्रिकेट मॅचदरम्यान कंडोम आणि डेटिंग Apps च्या जाहिरातींवर बंदी घाला! CTI चे ICC अध्यक्ष जय शाह यांना खळबळजनक पत्र

पैसाच पैसा! आयसीसीची विजेत्या Australia संघावर आर्थिक खैरात; उपविजेत्या इंग्लंडला किती कोटींचे बक्षीस?
3

पैसाच पैसा! आयसीसीची विजेत्या Australia संघावर आर्थिक खैरात; उपविजेत्या इंग्लंडला किती कोटींचे बक्षीस?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.