मार्को यान्सन (प्रातिनिधिक फोटो - ians)
साऊथ आफ्रिकेने पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ६७ रन्सने पराभव करत तीन सामन्यांच्या सिरिजमध्ये १-० अशी आघाडी घेतली आहे. डरबनच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या विजयासोबतच अष्टपैलू खेळाडू मार्को यान्सनने केलेल्या ऐतिहासिक कामगिरीने क्रीडाविश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे.
मार्को यान्सनने या सामन्यात बॅटने धुवाधार ७५ धावा कुटल्या, गोलंदाजीत १ विकेट घेतली. टर फिल्डिंग करतानाया तब्बल ४ विकेट्स देखील घेतल्या. या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर तो एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात ही दुर्मिळ कामगिरी करणारा जगातील अवघा पाचवा फलंदाज ठरला आहे.
Asian Games: अवघ्या ०.०८ सेकंदांचा थरार; वियतनामला धूळ चारत भारतीय चौकडीने पटकावले ‘रौप्य’
टॉस जिंकून साऊथ आफ्रिकेने प्रथम फलंदाजी केली. यामध्ये फलंदाज मार्को यान्सनच्या आक्रमक ७५ रन्स आणि अन्य फलंदाजांची खेळीच्या जोरवार ऑस्ट्रेलियाला ला एक मोठे टार्गेट दिले होते. आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन फलंदाजांना दक्षिण आफ्रिकेच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर टिकता आले नाही. नियमित अंतराने गडी गमावल्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाचा 67 रन्सने पराभव झाला आहे.
एकाच वनडे सामन्यात ‘५० हून अधिक रन्स, किमान १ विकेट आणि ४ कॅच’ घेण्याचा पराक्रम आतापर्यंत क्रिकेट इतिहासात फारच कमी खेळाडूंना करता आला आहे. यान्सनने डरबनमध्ये ही किमया साधून आपले नाव दिग्गज खेळाडूंच्या यादीत नोंदवले आहे.
एकाच ODI सामन्यात ५०+ धावा, १+ विकेट आणि ४ झेल घेणारे जगातील खेळाडू
१. एकनाथ सोळकर (भारत)
२. क्लाइव्ह लॉयड (वेस्ट इंडिज)
३. लांस क्लुझनर (दक्षिण आफ्रिका)
४. ख्रिस लिन (ऑस्ट्रेलिया)
५. मार्को यान्सन (दक्षिण आफ्रिका)
‘क्रिकेटच्या देवा’चा रेकॉर्ड धोक्यात! केवळ 59 रन्स अन्…; चेस मास्टर Virat Kohli रचणार इतिहास
मार्को यान्सनच्या अष्टपैलू कामगिरीनंतर दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा करत पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा डाव २३० रन्समध्ये गुंडाळला. साऊथ आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा 67 रन्सने दारुण पराभव केला. फिरकीपटू केशव महाराजच्या गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज ढेपाळले. दक्षिण आफ्रिकेकडून फिरकीपटू केशव महाराज सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने अचूक मारा करत ऑस्ट्रेलियाच्या ४ फलंदाजांना आउट केले.






