कुणाल गुप्ताचे धडाकेबाज शतक (फोटो- सोशल मिडिया)
कल्याण क्लब, गट्स अँड ग्लोरी, पुणे रेंजर्सचे विजय
कुणाल गुप्ताचे धडाकेबाज शतक
अमर खेडेकर, मिहीर रिसबुड आणि प्रसाद कुंटे यांची अर्धशतके
पुणे/Cricket: स्पार्टन क्रिकेट क्लब, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सहाव्या ‘स्पार्टन मान्सुन लीग’ अजिंक्यपद मिक्स कॉर्पोरेट टी-२० क्रिकेट स्पर्धेत कल्याण क्लब, गट्स अँड ग्लोरी आणि पुणे रेंजर्स क्रिकेट क्लब या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत धडाकेबाज विजय नोंदवले. सिंहगड रस्त्यावरील कोद्रे फार्मस् क्रिकेट मैदानावर रंगलेल्या या लढतींमध्ये खेळाडूंनी चौफेर फटकेबाजी करत प्रेक्षकांची मने जिंकली.
पहिल्या लढतीत फार्मा इलेव्हनने प्रथम फलंदाजी करताना दीपेश शेरे (नाबाद ५३ धावा) आणि शुभम डोळस्कर (५० धावा) यांच्या दमदार अर्धशतकांच्या बळावर कल्याण क्लबसमोर विजयासाठी १८८ धावांचे मोठे आव्हान ठेवले होते. मात्र, कल्याण क्लबच्या फलंदाजांनी हे आव्हान अगदी लिलया पार केले. अमर खेडेकर याने केलेल्या नाबाद ६३ धावा आणि मिहीर रिसबुड याच्या आक्रमक ६५ धावांच्या जोरावर कल्याण क्लबने अवघे २ गडी गमावून ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला.
पुण्यात Cricket चा महाथरार! महिला क्रिकेटपटूंसाठी पर्वणी! रंगणार ‘हिंदवी वॉरियर्स करंडक’ ODI सिरिज
दुसऱ्या सामन्यात गट्स अँड ग्लोरी संघाचा फलंदाज कुणाल गुप्ता याने चौफेर टोलेबाजी करत १३७ धावांची वादळी शतकी खेळी साकारली. त्याच्या या शतकाच्या जोरावर गट्स अँड ग्लोरी संघाने उभा केलेला धावांचा डोंगर सुशिल जाधव स्पोर्ट्स फाऊंडेशन (एसजेएसएफ) मेन्स् संघाला पेलवला नाही. या सामन्यात गट्स अँड ग्लोरी संघाने प्रतिस्पर्धी संघाचा तब्बल ७२ धावांनी मोठा पराभव केला.
तिसऱ्या चुरशीच्या सामन्यात प्रसाद कुंटे याने संयमी व आक्रमक खेळीचे प्रदर्शन करत शानदार अर्धशतक झळकावले. त्याच्या या महत्त्वपूर्ण योगदानाच्या जोरावर पुणे रेंजर्स क्रिकेट क्लबने टोरनेडोज् क्लबचे आव्हान ३ गडी राखून मोडून काढले आणि स्पर्धेतील आपली विजयी आगेकूच कायम ठेवली.
Gautam Gambhir : संजूबाबतचा तो निर्णय माझ्यासाठी कठीणच… संघ निवडीबाबत गंभीर यांनी सोडले मौन






