Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL Slapgate: ‘हिम्मत असेल तर रिंगमध्ये ये! 18 वर्षांनंतर पुन्हा पेटला वाद, श्रीसंतचे हरभजनला थेट ओपन चॅलेंज

Sreesanth challenges Harbhajan Singh for boxing Slapgate Controversy: भारतीय क्रिकेटमधील गाजलेल्या 'स्लॅपगेट' प्रकरणाने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, माजी वेगवान गोलंदाज श्रीसंतने हरभजन सिंगला बॉक्सिंग रिंगमध्ये सामना करण्याचे खुले आव्हान दिले आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 19, 2026 | 02:18 PM
IPL Slapgate: ‘हिम्मत असेल तर रिंगमध्ये ये! 18 वर्षांनंतर पुन्हा पेटला वाद, श्रीसंतचे हरभजनला थेट ओपन चॅलेंज
Follow Us
Follow Us:
  • 18 वर्षांनंतर पुन्हा पेटला वाद
  • श्रीसंतचे हरभजनला थेट ओपन चॅलेंज
  • जाहिरातीमुळे वाद पुन्हा उफाळला
भारतीय क्रिकेटमधील सर्वाधिक चर्चित वादांपैकी एक असलेले आयपीएल २००८ चे ‘स्लॅपगेट’ प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. भारताचा माजी वेगवान गोलंदाज श्रीसंतने माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंगला थेट ओपन चॅलेंज दिले आहे. जर त्याच्यात हिंमत असेल तर त्याने बॉक्सिंग रिंगमध्ये उतरून सामना करावा. असे वक्तव्य श्रीसंतने केले आहे. अलीकडील २००८ च्या थप्पड प्रकरणाशी संबंध जोडणाऱ्या एका जाहिरातीवर श्रीसंतने नाराजी व्यक्त केल्यानंतर हे वक्तव्य केले आहे. २००८ मध्ये मुंबई इंडियन्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब (आता पंजाब किंग्स) यांच्यातील सामन्यानंतर हरभजन सिंगने श्रीशांतला मैदानावर कानशिलात लगावली, तेव्हा या वादाला सुरुवात झाली. ही घटना आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त क्षणांपैकी एक म्हणून ओळखली जाते.

Women’s T20 World Cup मध्ये भारताला मोठा धक्का! श्रेयंका पाटील दुखापतीमुळे बाहेर; नव्या खेळाडूला संधी

जाहिरातीमुळे वाद पुन्हा उफाळला

गेल्या काही वर्षांपासून या दोन खेळाडूंमधील संबंध सामान्य वाटत होते. ते अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये आणि जाहिरातींमध्ये एकत्र दिसले होते. हरभजनने या घटनेबद्दल अनेक वेळा जाहीरपणे खेद व्यक्त केला होता. मात्र, अलीकडील एका जाहिरातीने जुन्या जखमा पुन्हा ताज्या केल्या. श्रीसंतचा आरोप आहे की, हरभजनने या वादाची खिल्ली उडवली आणि त्याचा आर्थिक फायदा घेतला. परिणामी, त्याने हरभजनपासून स्वतःला दूर केले आणि त्याला ब्लॉकही केले.

मुलाखतीत दिले खुले आव्हान

एका मीडिया चॅनलला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, श्रीसंतला हरभजनसोबत बॉक्सिंग ग्लोव्हज घातलेला त्याचा एक जुना फोटो दाखवण्यात आला. यानंतर त्याने कोणताही संकोच न बाळगता हरभजनला आव्हान दिले. श्रीसंत म्हणाला, ‘तुझ्यात हिम्मत आहे का? तू माझ्यासोबत रिंगमध्ये उतरू शकतोस का? सही करून येऊ शकतोस का? मी एक खुले आव्हान देत आहे. हे ग्लोव्हज घालून ये आणि लढ.’ त्याने असेही सांगितले की तो सध्या ‘बेअर नकल फाईट लीग’शी संबंधित असून कॉम्बॅट स्पोर्ट्सच्या जगात सक्रिय आहे.

तू कमव, मलाही कमवू दे…

श्रीसंत तिथेच थांबला नाही. तो पुढे म्हणाला की, ‘जर त्याला त्या थप्पड मारण्याच्या घटनेबद्दल एवढा त्रास होत असेल, तर त्याचा निर्णय जाहिरातींमधून नाही, तर खऱ्या लढतीतून व्हायला हवा. तो म्हणाला, ‘भज्जी, मी तुला आव्हान देतो. जर तुला त्या थप्पड मारण्याच्या घटनेबद्दल एवढा त्रास होत असेल आणि तू त्यातून पैसे कमवत असशील, तर मलाही कमवू दे. जाहिराती करण्याऐवजी रिंगमध्ये ये. मी मनापासून आव्हान देत आहे. जर आपल्यात आत्मसन्मान असेल, तर आपण खरी लढत लढली पाहिजे.’

हरभजन सिंग प्रतिसाद देणार का?

सध्या तरी, हरभजन सिंगकडून या आव्हानाला कोणताही प्रतिसाद आलेला नाही. मात्र, हे वक्तव्य क्रिकेट चाहत्यांमध्ये वेगाने व्हायरल होत आहे. १८ वर्षांपूर्वी मैदानावर सुरू झालेला हा वाद आता सोशल मीडियामुळे पुन्हा चर्चेत आला आहे.

TG20 लीगवर मोठा वाद; विजय देवरकोंडा, सिराज आणि तिलक वर्माला कायदेशीर नोटीस

Web Title: Sreesanth open challenge to harbhajan singh to some in boxing ring for fight over ipl 2008 slapgate controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 02:17 PM

Topics:  

  • controversy
  • cricket news
  • Harbhajan Singh
  • IPL

संबंधित बातम्या

Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्या मुंबईतच राहणार? KKR-सीएसकेच्या प्लॅनला मोठा धक्का!
1

Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्या मुंबईतच राहणार? KKR-सीएसकेच्या प्लॅनला मोठा धक्का!

Maggi Controversy: 2 मिनिटांत तयार होणारी ‘मॅगी’ खाणाऱ्यांसाठी मोठी बातमी! वादावर दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निकाल
2

Maggi Controversy: 2 मिनिटांत तयार होणारी ‘मॅगी’ खाणाऱ्यांसाठी मोठी बातमी! वादावर दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निकाल

ODI क्रिकेटचा ‘सुवर्ण’ अध्याय! ‘या’ दोन देशांनी पटकावला ५,००० व्या वनडे सामन्याचा मान; ५५ वर्षांपूर्वी…
3

ODI क्रिकेटचा ‘सुवर्ण’ अध्याय! ‘या’ दोन देशांनी पटकावला ५,००० व्या वनडे सामन्याचा मान; ५५ वर्षांपूर्वी…

Cricket News: फक्त 4 मॅच अन् 25 व्या वर्षीच घेतली निवृत्ती, ‘माझ्या आयुष्याचा सर्वात कठीण निर्णय…’, कोण आहे हा क्रिकेटर?
4

Cricket News: फक्त 4 मॅच अन् 25 व्या वर्षीच घेतली निवृत्ती, ‘माझ्या आयुष्याचा सर्वात कठीण निर्णय…’, कोण आहे हा क्रिकेटर?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.