कुशल मेंडीसने ठोकले शतक (फोटो ians)
इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या श्रीलंकेच्या संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात यजमान इंग्लंडचा १६ रन्सने पराभव करत तीन सामन्यांच्या सिरिजमध्ये १-१ अशी बरोबरी साधली आहे. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर श्रीलंकेने जोरदार पुनरागमन करत मैदानावर हा विजय साकारला आहे. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 50 ओव्हर्समध्ये 321 रन्सचा डोंगर उभा केला. श्रीलंकेचा यष्टीरक्षक-फलंदाज कुसल मेंडिसने या सामन्यात शतकी खेळी केली.
‘क्रिकेटच्या देवा’चा रेकॉर्ड धोक्यात! केवळ 59 रन्स अन्…; चेस मास्टर Virat Kohli रचणार इतिहास
कुसल मेंडिसने उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन करत अवघ्या १०० चेंडूंत १२१ रन्सची शानदार शतकीय खेळी खेळली.या शतकी खेळीच्या जोरावर कुसल मेंडिसने एकदिवसीय क्रिकेटमध्ये एका खास विक्रमी क्लबमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. श्रीलंकेकडून यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या मोजक्या खेळाडूंच्या यादीत तो सामील झाला आहे. ३२२ रन्सच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या फलंदाजांनी कडवी झुंज दिली. मात्र ते अपयशी ठरले.
श्रीलंकेचा यष्टीरक्षक-फलंदाज कुसल मेंडिसने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात १०० चेंडूंत १२१ रन्सची वादळी शतकीय खेळी साकारत श्रीलंकेच्या १६ रन्सने झालेल्या थरारक विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. इंग्लंडच्या भूमीत इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय (ODI) सामन्यात शतक झळकावणारा कुसल मेंडिस हा जगातील 8 वा विकेटकिपर ठरला आहे.
इंग्लंडमध्ये इंग्लंडविरुद्ध वनडे शतक ठोकणारे जगातील यष्टीरक्षक-फलंदाज
Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी टीमने लावला विजयाचा चौकार, जपानला नमवून सेमीफायनलमध्ये भरारी






