श्रीलंकन टीम(फोटो-सोशल मीडिया)
Zim vs SL : सध्या श्रीलंकेचा क्रिकेट संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर असून २९ ऑगस्टपासून दोघांमध्ये २ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. तसेच त्यानंतर ३ सप्टेंबरपासून टी-२० मालिका देखील खेळवण्यात येणार आहे. आशिया कप २०२५ स्पर्धेला ९ सप्टेंबरपासून सुरवात होणार आहे. त्यापूर्वी श्रीलंका संघ झिम्बाब्वेविरुद्ध टी-२० मालिका खेळणार आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी श्रीलंकेने आपला संघ घोषित केला आहे. या काळात दोन्ही संघांमध्ये ३ सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाणार आहे. यासाठी श्रीलंकेने १७ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. चारिथ असलंकाकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. या मालिकेत स्टार फिरकी गोलंदाज वानिंदू हसरंगाला वगळण्यात आले आहे.
हेही वाचा : पृथ्वी शॉ कोणाला डेट करत आहे? गणेश चतुर्थीच्या निमित्ताने ही ‘महिला’ दिसली त्याच्यासोबत ; Photo Viral
श्रीलंकेच्या संघाचा स्टार गोलंदाज मथिशा पाथिराना झिम्बाब्वेविरुद्ध संघात परतला आहे. मथिशा पाथिरानाच्या पुनरागमनामुळे आता श्रीलंकन संघाला बळकटी मिळणार आहे. यापूर्वी, श्रीलंकेविरुद्धच्या झिम्बाब्वे मालिकेसाठी मथिशा पाथिरानाला संघात स्थान देण्यात आले नव्हते. मथिशा पाथिराना हा आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळत असतो. याशिवाय, श्रीलंकेच्या संघात झिम्बाब्वेविरुद्ध पथुम निस्सांका, कुल मेंडिस, कुसल परेरा, कामिंदू मेंडिस आणि दासुन शनाका यांसारखे स्टार खेळाडूंचा भरणा देखील आहे. या खेळाडूंनी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे.
झिम्बाब्वेविरुद्ध खेळवण्यात येणाऱ्या मालिकेत चारिथ असलंका श्रीलंकेच्या संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. यानंतर, श्रीलंकेचा संघ आशिया कप २०२५ मध्ये देखील चारिथ असलंकाच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरताना दिसणार आहे. आशिया कप २०२५ पूर्वी कर्णधारासह संपूर्ण संघासाठी ही मालिका स्वतःची सराव चाचणी असणार आहे. अद्याप श्रीलंकेच्या संघाने आशिया कप 2025 साठी आपला संघ घोषित केलेला नाही.
चारिथ असलंका (कर्णधार), कुसल मेंडिस, पथुम निसांका, कुसल परेरा, नुवानिडू फर्नांडो, कामिंदू मेंडिस, विषेन हलंबागे, कामिल मिश्रा, दासुन शनाका, डुनिथ वेललागे, चमिका करुणारत्ने, महिष थेक्षाना, दुशान हेमानुरा, दुशान हेमनुरा, मशहूर फर्नांडो. पाथीराना आणि नुवान तुषारा.