फोटो सौजन्य- pinterest
होळीचा सण जवळ आला आहे त्यामुळे घरामध्ये साफसफाईला आणि होळीच्या तयारीला सुरुवात झालेली आहे. यावेळी होळी सोमवार 2 मार्च रोजी आहे तर 3 मार्च रोजी धुलीवंदन आहे. होळीपूर्वी घरातील नको असलेल्या, निरुपयोगी किंवा खराब झालेल्या वस्तू बाहेर फेकून दिल्याने वातावरण शुद्ध होते, मानसिक ताण कमी होतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते.
धार्मिक श्रद्धेनुसार, होळीच्या पहिले घराची साफसफाई करणे शुभ मानले जाते. असे केल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते आणि घरामध्ये सुख समृद्धी येते. वास्तुशास्त्राच्या मान्यतेनुसार, घरातील काही वस्तूंमुळे नकारात्मक ऊर्जा वाढते ज्यामुळे जीवनात समस्येचा सामना करावा लागतो. होळीच्या पहिले घरातून कोणत्या गोष्टी बाहेर काढाव्यात ते जाणून घ्या
तर घरामध्ये खूप दिवसांपासून जुने आणि फाटलेले चप्पल असल्यास ते लगेच बाहेर काढावे. असे मानले जाते की, अशा गोष्टी घरामध्ये गरिबी आणि नकारात्मकता वाढवते. याचा आर्थिक परिस्थितीवर सुद्धा परिणाम होऊ शकतो आणि मानसिक तणाव वाढू शकतो.
तुळशीचे रोप घरामध्ये सकारात्मक ऊर्जा, शांती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. जर हे रोप सुकले तर ते घरात ठेवणे शुभ मानले जात नाही. सुकलेली तुळस नकारात्मकता वाढू शकते. यासाठी ते काढून त्या ठिकाणी नवीन रोप लावणे चांगले राहील.
घरात ठेवलेले जुने कपडे आणि न वापरणारे कपडे गरिबांना दान करणे शुभ मानले जाते. त्यामुळे घरात समृद्धी राहील. त्यासोबतच जुने आणि खराब झालेल्या रंगांचा बचाव करावा. कारण हे त्वचेसाठी हानिकारक असू शकते.
जर घरामध्ये तुटलेला आरसा असेल तर ते बाहेर काढून टाका. वास्तुशास्त्रानुसार, तुटलेल्या आरशामुळे घरात नकारात्मक ऊर्जा पसरवते आणि जीवनात समस्या येऊ शकतात. याव्यतिरिक्त देवदेवतांच्या तुटलेल्या मुर्त्या किंवा फोटो घरात ठेवू नये.
घरामध्ये तुटलेल्या मुर्त्या ठेवणे अशुभ मानले जाते. या मुर्त्या वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन कराव्यात. ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि शांतीचे वातावरण राहते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: होळी हा नकारात्मकतेवर सकारात्मकतेचा विजय दर्शवणारा सण आहे. त्यामुळे घरातील जुनी, नको असलेली वस्तू काढून टाकल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते, अशी श्रद्धा आहे.
Ans: तुटलेली भांडी किंवा काच, बंद पडलेली घड्याळे, फाटलेले कपडे, खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू , न वापरण्यात येणाऱ्या जुन्या वस्तू
Ans: होय, तुटलेली किंवा खराब झालेली देवप्रतिमा घरात ठेवणे अशुभ मानले जाते. अशा प्रतिमा नदीत विसर्जित करणे किंवा योग्य पद्धतीने दूर करणे योग्य






