Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cricket: ‘स्पोर्ट्सफिल्ड मान्सून लीग’मध्ये युवा क्रिकेटपटूंचा जलवा; पुण्याला चढला क्रिकेटचा ‘ज्वर’

Cricket: सातारा रस्त्यावरील टेंभेकर फार्म्स क्रिकेट मैदानावर रंगलेल्या या लढतींमध्ये विजय क्रिकेट ॲकॅडमी आणि स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लिनिकच्या खेळाडूंनी प्रतिस्पर्ध्यांवर एकतर्फी वर्चस्व गाजवले.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 23, 2026 | 04:55 PM
Sportsfield Monsoon League

Sportsfield Monsoon League

Follow Us
Follow Us:
  • ‘स्पोर्ट्‌सफिल्ड मान्सून लीगमध्ये स्टीफन शिरोडकरची तुफानी खेळी
  • विजय ॲकॅडमी, स्पेशलाईज्ड क्लिनिक उपांत्य फेरीत
  • समर्थ जाधवने दाखवला अष्टपैलू खेळ
Pune/Cricket: स्पोर्ट्‌सफिल्ड मॅनेजमेंटतर्फे आयोजित पाचव्या ‘स्पोर्ट्‌सफिल्ड मान्सून लीग’ अजिंक्यपद १४ वर्षांखालील ३०-३० षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत विजय क्रिकेट ॲकॅडमी आणि स्पेशलाईज्ड क्रिकेट (Pune) क्लिनिक या संघांनी चमकदार कामगिरी नोंदवत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे.

सातारा रस्त्यावरील टेंभेकर फार्म्स क्रिकेट मैदानावर रंगलेल्या या लढतींमध्ये विजय क्रिकेट ॲकॅडमी आणि स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लिनिकच्या खेळाडूंनी प्रतिस्पर्ध्यांवर एकतर्फी वर्चस्व गाजवले. पहिल्या लढतीत समर्थ जाधवच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर विजय क्रिकेट ॲकॅडमीने आर्यन्स क्रिकेट ॲकॅडमीवर ८३ धावांनी दणदणीत विजय मिळवून अंतिम चार संघांत आपले स्थान निश्चित केले. प्रथम फलंदाजी करताना विजय क्रिकेट ॲकॅडमीने फलंदाजांच्या सांघिक योगदानाच्या बळावर १८६ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य उभे केले. यामध्ये समर्थ जाधवने सर्वाधिक ४४ धावांचे योगदान दिले. त्याला श्रवण धुमाळ (३६ धावा), सचिन बोरा (३३ धावा) आणि विहान ताकवले (२६ धावा) यांनी सुरेख साथ दिली.

Asian Games 2026: बांग्लादेशला ‘हुतुतू’ समजेना! भारतीय कबड्डी संघाचा दणदणीत विजय

समर्थ जाधवची अष्टपैलू चमक

आर्यन्स ॲकॅडमीकडून गोलंदाजीत रिवान तिबरेवालने प्रभावी मारा करत पाच फलंदाजांना तंबूत धाडले. प्रत्युत्तरादाखल १८७ धावांचा पाठलाग करताना आर्यन्स क्रिकेट ॲकॅडमीचा डाव २०.५ षटकांत अवघ्या १०३ धावांवर संपुष्टात आला. रिशीक गुहाने केलेली २५ धावांची झुंज वगळता इतर फलंदाज अपयशी ठरले. विजय संघाकडून गोलंदाजीत मानव सोळंकी आणि समर्थ जाधव यांनी प्रत्येकी तीन गडी बाद करत प्रतिस्पर्ध्यांचे कंबरडे मोडले, तर ऋषीकेश एस. याने दोन बळी घेत विजयावर शिक्कामोर्तब केले.

स्टीफन शिरोडकरचे वादळी अर्धशतक

दुसऱ्या सामन्यात स्टीफन शिरोडकरच्या फटकेबाजीच्या जोरावर स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लिनिकने क्रिकेट नेक्स्ट ॲकॅडमीचा ५ गडी राखून पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या क्रिकेट नेक्स्ट ॲकॅडमीने निर्धारित षटकांत १७७ धावांचे लक्ष्य उभे केले. त्यांच्याकडून अव्देत इप्पे (४९ धावा), ओजस वाईकर (४५ धावा) आणि विवान देशमुख (३५ धावा) यांनी डावाला आकार दिला. १७८ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लिनिकने २८.४ षटकांत विजय साकारला. विजयाचा शिल्पकार ठरलेल्या स्टीफन शिरोडकरने केवळ ५४ चेंडूंत ६ चौकार आणि ६ उत्तुंग षटकारांच्या मदतीने नाबाद ९६ धावांची तुफानी खेळी केली. त्याला दुसऱ्या बाजूने कार्तिक पासलकरने नाबाद ४० धावांची संयमी साथ देत संघाचा विजय सुकर केला.

याला म्हणतात पॅशन! निकेतची वादळी शतकी खेळी; Spartan Monsoon League मध्ये टायटन बुल्स्‌चा थरारक विजय

Web Title: Stephen shirodkar 96 runs inning and samarth well played sports field monsoon league in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 04:55 PM

Topics:  

  • cricket league
  • pune news
  • Pune Sports News
  • Sports News

संबंधित बातम्या

अहमदाबादमध्ये क्रीडा क्रांती! ८२५ कोटींचे ‘वीर सावरकर Sports Complex’ सज्ज; खेळाडूंना मिळणार जागतिक दर्जा
1

अहमदाबादमध्ये क्रीडा क्रांती! ८२५ कोटींचे ‘वीर सावरकर Sports Complex’ सज्ज; खेळाडूंना मिळणार जागतिक दर्जा

Maharashtra Today’s Live News in Marathi: भाजपचा मोठा फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी वैजयंत पांडा
2

Maharashtra Today’s Live News in Marathi: भाजपचा मोठा फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी वैजयंत पांडा

Pune Ganeshotsav 2026: गणेशोत्सवाच्या देखाव्यांना ‘AI’ची साथ; तंत्रज्ञानाने बदलले जिवंत देखाव्यांचे रूप
3

Pune Ganeshotsav 2026: गणेशोत्सवाच्या देखाव्यांना ‘AI’ची साथ; तंत्रज्ञानाने बदलले जिवंत देखाव्यांचे रूप

Boxing: ३७० खेळाडू, चुरशीच्या लढती अन् पिंपरी-चिंचवडचा विजय; आकुर्डीत ‘थाई बॉक्सिंग’चा थरार
4

Boxing: ३७० खेळाडू, चुरशीच्या लढती अन् पिंपरी-चिंचवडचा विजय; आकुर्डीत ‘थाई बॉक्सिंग’चा थरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.