Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sunil Narine Record: सुनील नरेनने रचला इतिहास! आयपीएलमध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील पहिला गोलंदाज

Sunil Narine New Record: सुनील नरेनने आयपीएल २०२६ मध्ये इतिहास रचला आहे. २०० बळी पूर्ण करणारा तो पहिला विदेशी गोलंदाज ठरला असून एकाच संघासाठी (KKR) खेळताना हा टप्पा गाठणारा पहिला गोलंदाज बनला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 03, 2026 | 06:26 PM
सुनील नरेनने रचला इतिहास! (Photo Credit- X)

सुनील नरेनने रचला इतिहास! (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • सुनील नरेनने रचला इतिहास!
  • आयपीएलमध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील पहिला गोलंदाज
  • IPL मधील सर्वाधिक यशस्वी गोलंदाज
Sunil Narine 200 wickets IPL: वय वर्ष 37 असूनही फिरकीची जादू आजही कायम असल्याचे सुनील नरेन याने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. आयपीएल 2026 (IPL 2026) च्या 45  व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध दोन महत्त्वाचे बळी घेत नरेनने ऐतिहासिक विक्रमांना गवसणी घातली. हैदराबादच्या मधल्या फळीतील फलंदाज सलिल अरोराची विकेट घेताच, नरेनने आयपीएलमध्ये अशा एका क्लबमध्ये प्रवेश केला जिथे आतापर्यंत एकाही विदेशी गोलंदाजाला पोहोचता आले नव्हते.

200 बळी घेणारा पहिला विदेशी गोलंदाज

राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात सुनील नरेनने आयपीएल कारकिर्दीतील 200 बळी पूर्ण केले. आयपीएलच्या इतिहासात 200 विकेट्सचा टप्पा गाठणारा तो पहिला विदेशी खेळाडू ठरला आहे. याआधी केवळ युजवेंद्र चहल आणि भुवनेश्वर कुमार या भारतीय गोलंदाजांनाच हा टप्पा गाठता आला होता. विशेष म्हणजे, 2012 पासून नरेन केवळ कोलकाता नाईट रायडर्स (KKR) कडून खेळत असून, एकाच संघासाठी 200 विकेट घेणारा तो जगातील पहिला गोलंदाज बनला आहे.

A cracking delivery to reach his 200th IPL wicket – just Sunil Narine things 🫡pic.twitter.com/DZwWfPpHmk — Cricbuzz (@cricbuzz) May 3, 2026

IPL मधील सर्वाधिक यशस्वी गोलंदाज (Top 5)

गोलंदाज बळी
युजवेंद्र चहल 228
भुवनेश्वर कुमार 215
सुनील नरेन 201
पीयूष चावला 192
आर. अश्विन 187

Rajasthan Royals विकली गेली रे..! तब्बल १५,६६० कोटींना झाला फ्रँचायझीचा ताबा; कोण आहे हा नवा ‘किंग’?

गोलंदाजीतील ‘कंजूस’ आणि घातक स्पेल

सुनील नरेनने 197 सामन्यांच्या आयपीएल कारकिर्दीत 6.8 च्या प्रभावी इकॉनॉमी रेटने हे यश मिळवले आहे. 100 हून अधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये नरेनचा इकॉनॉमी रेट हा सर्वोत्तम आहे. त्याने आयपीएलमध्ये 8 वेळा 4 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेण्याची किमया केली आहे, ज्यामध्ये एक हॅट्ट्रिक आणि 5 विकेट्सच्या हॉलचा समावेश आहे.

धावा आणि विकेट्सचा अनोखा ‘डबल धमाका’

केवळ गोलंदाजीच नाही, तर नरेनने फलंदाजीतही आपल्या नावाचा दरारा निर्माण केला आहे. आयपीएलमध्ये त्याने 165.30 च्या तुफानी स्ट्राईक रेटने 1820 धावा केल्या असून त्यात 1 शतक आणि 7 अर्धशतकांचा समावेश आहे. यासह आयपीएल इतिहासात 1000 धावा आणि 200 विकेट्सचा ‘डबल’ पूर्ण करणारा तो जगातील पहिला अष्टपैलू ठरला आहे.

एकूण टी-20 कारकिर्दीचा विचार केल्यास, 591 सामन्यांत 621 बळी घेणारा नरेन हा राशिद खान आणि ड्वेन ब्राव्होनंतर जगातील तिसरा सर्वाधिक यशस्वी गोलंदाज आहे. तीन वेळा ‘मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर’ (MVP) ठरलेल्या नरेनने आपल्या अष्टपैलू कामगिरीने आपण आजही क्रिकेटमधील सर्वात धोकादायक खेळाडू असल्याचे पुन्हा एकदा जगाला दाखवून दिले आहे.

चला पॅकअप करा! साधं जिंकताही आलं नाही; CSK ने MI ला चारली धूळ, प्ले ऑफचं स्वप्न भंगलं

Web Title: Sunil narine historical 200 wickets ipl record first overseas bowler

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 06:25 PM

Topics:  

  • cricket news
  • IPL 2026
  • Record
  • SRH Vs KKR
  • Sunil Narine

संबंधित बातम्या

Asian Games 2026: नेपाळ-जपानचा सामन्यात मोठा उलटफेर, भारताला Gold Medal जिंकण्याची संधी, ‘या’ संघाला भिडणार
1

Asian Games 2026: नेपाळ-जपानचा सामन्यात मोठा उलटफेर, भारताला Gold Medal जिंकण्याची संधी, ‘या’ संघाला भिडणार

DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय
2

DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय

पुण्यात टी-२० क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन मान्सून लीग’मध्ये ‘या’ ३ संघांनी मारली बाजी
3

पुण्यात टी-२० क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन मान्सून लीग’मध्ये ‘या’ ३ संघांनी मारली बाजी

IND vs NZ: भारतविरूद्ध न्यूझीलंडने केली आपल्या Sqad ची घोषणा, ‘या’ 16 खेळाडूंचा समावेश
4

IND vs NZ: भारतविरूद्ध न्यूझीलंडने केली आपल्या Sqad ची घोषणा, ‘या’ 16 खेळाडूंचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.