Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MI vs KKR : सूर्यकुमार यादवचा T-20 मध्ये भीम पराक्रम, असे करणारा ठरला एकमेव भारतीय फलंदाज 

काल 31 मार्च रोजी वानखेडे स्टेडियमवर कोलकत्ता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये सामना खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबईने केकेआरचा पराभव केला. तसेच सूर्यकुमार यदावने एक विक्रम केला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 01, 2025 | 02:10 PM
MI vs KKR: Suryakumar Yadav's heroics in T20, the only Indian batsman to do so

MI vs KKR: Suryakumar Yadav's heroics in T20, the only Indian batsman to do so

Follow Us
Close
Follow Us:

MI vs KKR : काल 31 मार्च रोजी वानखेडे स्टेडियमवर कोलकत्ता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये सामना खेळवण्यात आला.  या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाने केकेआरवर 8 विकेट्सने विजय मिळवला. या विजयाने मुंबईने आयपीएल 2025 च्या 18 हंगामातील पहिला विजय आपल्या नावे केला आहे. या सामन्यात गोलंदाज पदार्पणवीर अश्विनी कुमारने टिच्चून गोलंदाजी करत 3 ओव्हर मध्ये 24 धावा देत  4 बळी घेतले. आयपीएलच्या इतिहासामध्ये पदार्पणात 4 विकेट घेणारा तो पहिलाच भारतीय ठरला आहे. या सामन्यात केकेआरने प्रथम फलंदाजी करत केवळ 116 धावाच केल्या, त्यानंतर मुंबईने हे लक्ष्य 12.5 षटकात 2 गडी गमावून पूर्ण केले. या सामन्यात  सूर्यकुमार यादवने एक मोठा विक्रम केला आहे. टी-20 क्रिकेटमध्ये 8000 धावा करणारा सूर्यकुमार यादव हा पाचवा फलंदाज बनला आहे. सूर्या आता विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन आणि सुरेश रैना यांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे.

टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

  •  विराट कोहली -12976 
  •  रोहित शर्मा -11851 
  •  शिखर धवन -9797  
  •  सुरेश रैना -8654 
  •  सूर्यकुमार यादव – 8007*

हेही वाचा : IPL 2025 Rising Stars: अडगळीत होते हिरे, आता एका रात्रीत मिळाली झळाळी..; IPL मध्ये ‘या’ 5 खेळाडूंनी वेधले लक्ष…

तसेच सूर्यकुमार यादव चेंडू खेळण्याच्या बाबतीत मात्र सर्वात जलद 8000 धावा करणारा जगातील केवळ दुसरा आणि भारताचा पहिलाच  फलंदाज ठरला आहे. सूर्यकुमार यादवने 5256 चेंडूंचा सामना करत 8000 टी-20 धावांचा टप्पा गाठला आहे. 4749 चेंडूत 8000 धावा करणाऱ्या आंद्रे रसेलनंतर अशी कामगिरी करणारा तो केवळ दुसराच वेगवान फलंदाज ठरला आहे. केकेआरविरुद्ध खेळताना सूर्यकुमारने 9 चेंडूत नाबाद 27 धावा केलंय. या खेळी दरम्यान ही कामगिरी केली.

कमी चेंडूंचा सामना करत टी 20 मध्ये 8000 धावा

  • आंद्रे रसेल – 4747 चेंडू 
  • सूर्यकुमार यादव -5256 चेंडू 
  • ग्लेन मॅक्सवेल – 5278 चेंडू 

हेही वाचा : MI vs KKR : 30 रुपये ऑटो भाडे ते 30 लाख मिळाली किंमत, अश्वनी कुमारच्या वडिलांनी सांगितली सारी हकिकत..

केकेआरविरुद्धच्या सामन्यात मुंबईकडून सूर्यकुमार यादवने केवळ 9 चेंडूत 27 धावांची वेगवान खेळी केली होती. आपल्या तडाखेबंद  खेळीत सूर्याने असे अनेक फटके टोळवले ज्याचा निखळ आनंद चाहत्यांनी घेतला. सूर्याने 27 धावांची स्फोटक खेळी केली. या खेळीत त्याने 3  चौकार आणि 2 षटकार लागवले. याशिवाय मुंबईकडून रायन रिकेल्टनने 41 चेंडूत 62 धावांची नाबाद महत्वाची खेळी केली. या सामन्यात केकेआरने प्रथम फलंदाजी करत केवळ 116 धावाच केल्या, त्यानंतर मुंबईने हे लक्ष्य 12.5 षटकात 2 गडी गमावून पूर्ण केले. पदार्पणवीर अश्विनी कुमारने प्रभावी मारा करत 3 ओव्हर मध्ये 24 धावा देत  4 बळी घेतले. आयपीएलच्या इतिहासामध्ये पदार्पणात 4 विकेट घेणारा तो पहिलाच भारतीय ठरला आहे.

 

 

Web Title: Suryakumar yadavs big record in t20 mi vs kkr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2025 | 02:10 PM

Topics:  

  • Andre Russell
  • IPL 2025
  • MI vs KKR
  • Rohit Sharma
  • Suryakumar Yadav

संबंधित बातम्या

Asia Cup 2025 : भारताकडे सलामीसाठी ‘हे’ तीन पर्याय! आशिया कपमध्ये टीम इंडियाचा प्लेइंग-११ कसा असेल? जाणून घ्या
1

Asia Cup 2025 : भारताकडे सलामीसाठी ‘हे’ तीन पर्याय! आशिया कपमध्ये टीम इंडियाचा प्लेइंग-११ कसा असेल? जाणून घ्या

Asia Cup 2025: निवड समितीने उघडले नशीब! आशिया कपसाठी पहिल्यांदाच टीम इंडियात ‘या’ ७ नव्या खेळाडूंची वर्णी
2

Asia Cup 2025: निवड समितीने उघडले नशीब! आशिया कपसाठी पहिल्यांदाच टीम इंडियात ‘या’ ७ नव्या खेळाडूंची वर्णी

Asia cup 2025 साठी शुभमन गिलची थेट उपकर्णधारपदी वर्णी; आकडेवारी काही वेगळच सांगते, संघात स्थान देण्यामागील कारण काय?
3

Asia cup 2025 साठी शुभमन गिलची थेट उपकर्णधारपदी वर्णी; आकडेवारी काही वेगळच सांगते, संघात स्थान देण्यामागील कारण काय?

Asia Cup 2025 : सुर्याची टोळी आशिया कपसाठी तयार! शुभमन गिल दिसणार नव्या भूमिकेत, असा असेल भारताचा संपूर्ण संघ
4

Asia Cup 2025 : सुर्याची टोळी आशिया कपसाठी तयार! शुभमन गिल दिसणार नव्या भूमिकेत, असा असेल भारताचा संपूर्ण संघ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.