अश्वनी कुमार(फोटो-सोशल मीडिया)
MI vs KKR : काल 31 मार्च रोजी वानखेडे स्टेडियमवर कोलकत्ता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये सामना खेळला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाने केकेआरवर एकतर्फी विजय मिळवला. या विजयाने मुंबईने आयपीएल 2025 च्या 18 हंगामातील पहिला विजय आपल्या नावे केला आहे. या सामन्यात मुंबईने केकेआरला धूळ चारत 8 विकेट्सने पराभूत केले आहे. या सामन्यात मुंबईच्या विजयात पदार्पणवीर अश्विनी कुमारने महत्वाची भूमिका बजावली. त्याने 3 ओव्हरमध्ये 24 धावा देत 4 गडी टिपले. या नंतर अश्विनी कुमारची चर्चा सुरू जहाली आहे. अश्विनी कुमारसाठी आयपीएलपर्यंचा प्रवास सोपा राहिला नाही. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या अश्विनीला इथपर्यंत पोहोचण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला आहे. या संघर्षाबद्दल त्याच्या वडिलांनी माहिती दिली आहे.
अश्विनीच्या वडिलांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले की, अश्विनी हा त्याच्या क्रिकेटला खूप समर्पित आहे आणि आपले कौशल्य वाढवण्यासाठी सर्व काही तो देत असे. पाऊस असो वा कडक ऊन, त्याने आपले प्रशिक्षण कधीच थांबवले नाही. इंडियन एक्सप्रेसने घेतलेल्या मुलाखतीत अश्विनीचे वडील हरकेश कुमार यांनी आपल्या मुलाच्या संघर्षाबद्दल सांगितले की, ‘पाऊस असो किंवा उन असो, अश्विनी कधीही मोहालीच्या पीसीएमध्ये किंवा नंतर मुल्लानपूरच्या नवीन स्टेडियममध्ये जाण्यास मागेपुढे बघत नसे, कधीकधी, तो पीसीए अकादमीमध्ये सायकलने जायचा किंवा कधी लिफ्ट घेऊन किंवा शेअर केलेल्या ऑटोमध्ये देखील आता असे.’
त्याचे वडील महाणले की, ‘मला आठवते की तो माझ्याकडून 30 रुपये भाड्याने घेत असे आणि मेगा लिलावात त्याला मुंबई इंडियन्सने 30 लाख रुपयांना विकत घेतले तेव्हा मला माहिती होते की तो या प्रत्येक पैशाचा मोलाचा आहे. आज प्रत्येक विकेट पडल्यानंतर मी त्या दिवसांचा विचार करत होतो जेव्हा तो रात्री 10 वाजता सराव करून परत यायचा आणि दुसऱ्या दिवशी पहाटे पुन्हा 5 वाजता उठून सरावासाठी निघून जायचा.’
अश्विनी कुमारने चेन्नई सुपर किंग्ज, कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्ससाठी चाचण्या दिल्या होत्या. परंतु, तेथे तो अपयशी ठरला. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मिचेल स्टार्क यांना अश्विनी आपला आदर्श मानतो. पण, आता तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळत आहे ज्या संघाचा बुमराह एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे अश्विनीसाठी हे एक स्वप्न पूर्ण होण्यासारखे आहे.
हेही वाचा : Central Contract : नवीन केंद्रीय करार जाहीर; 3 क्रिकेटपटू इन तर ‘या’ खेळाडूंना बाहेरचा रस्ता
अश्विनीचा मोठा भाऊ शिव राणा म्हणाला की, ‘तो आयपीएल संघांच्या चाचण्यांमध्ये भाग घेत होता, त्याला जसप्रीत बुमराह आणि मिचेल स्टार्कसारखे व्हायचे होते, त्याचे मित्र त्याच्यासाठी क्रिकेटचा बॉल्स विकत घेण्यासाठी पैसे गोळा करत असत. जेव्हा त्याला मुंबई इंडियन्स संघाने 30 लाख रुपयांना विकत घेतले, तेव्हा त्याने सर्वात आधी क्रिकेट किट आणि बॉलचे वाटप केले. कालच्या केकेआरविद्धच्या कामगिरीने त्याने सिद्ध केले आहे की, गावातील मुलं त्याच्या नावाची जर्सी घालतील.’