IPL 2025 Rising Stars: अडगळीत होते हिरे, आता एका रात्रीत मिळाली झळाळी..; IPL मध्ये 'या' 5 खेळाडूंनी वेधले लक्ष...(फोटो-सोशल मीडिया)
IPL 2025 Rising Stars : आयपीएल हे नेहमीच एक नव्या दामच्या खेळाडूंना पुढे घेऊन येणारे व्यासपीठ राहिले आहे. हे खेळाडू आपली छाप पाडून भविष्यासाठी देशाच नेतृत्व करण्याची धमक ठेवतात. आत्तापर्यंत आयपीएल 2025 मध्ये 12 सामने खेळवण्यात आले आहे. या दरम्यान असे 5 युवा खेळाडूंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आयपीएल ही जगातील सर्वात मोठी T20 लीग म्हणून ओळखली जाते. ज्या लीगने आजवर टीम इंडियासाठी अनेक स्टार खेळाडू दिले आहेत. 2025 च्या हंगामात देखील युवा खेळाडूंचा पुरवठा सुरूच आहे. युवा खेळाडूंनी आपल्या कामगिरीने क्रिकेट जगताचे लक्ष वेधून घेतले आहे. अशा 5 खेळाडूंची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत.
आशुतोष शर्मा
दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग असणारा फलंदाज आशुतोष शर्मा याने 24 मार्च रोजी लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध आपल्या वेगवान खेळीने सर्वांनाच धक्का दिला. त्याने 30 चेंडूत 66 धावांची तडाखेबंद खेळी खेळून संघाला अशक्य वाटणारा विजय मिळवून दिला होता. 210 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीची स्थिति 65/5 अशी झाली होती. अशावेळी विजयाची शक्यता धूसर वाटत असताना आशुतोषला प्रभावशाली खेळाडू म्हणून खेळवले गेले आणि त्याने 30 चेंडूचा सामना करत 66 धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर त्याने संघाला शानदार विजय मिळवून दिला होता.
विघ्नेश पुथूर
मुंबई इंडियन्सचा युवा गोलंदाज विघ्नेश पुथूरने 23 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध खेळताना आपल्या गोलंदाजीने आयपीएलमध्ये चांगली सुरुवात दिली होती. त्याने सामना जिंकून देणारी गोलंदाजी केली होती. ज्यामध्ये त्याने केवळ 32 धावांत तीन बळी घेतले होते. परंतु संघाला विजय मिळवता आला नाही. त्याच्या चमकदार कामगिरीने एमएस धोनीचे देखील लक्ष वेधून घेतले होते. सामना संपल्यानंतर धोनीने विघ्नेश पुथूरसोबत संवाद साधला होता.
अनिकेत वर्मा
सनरायझर्स हैदराबादचा नव्या दमाचा फलंदाज अनिकेत वर्माने लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध त्याच्या जबरदस्त फटकेबाजी आपणही काही कमी नाही असा जणू इशाराच दिला होता. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येत त्याने केवळ 41 चेंडूचा सामना करत 74 धावांची तुफानी खेळी खेळली होती. यामध्ये त्याने 6 षटकार खेचले होते. अनिकेत हा मध्य प्रदेशच्या या युवा फलंदाज आहे. त्याने आपली मूळ किंमत ३० लाख रुपये योग्य असल्याचे सिद्ध करून दाखवले आहे. त्याच्या खेळीने एसआरएचला दिल्लीविरुद्ध चांगली धावसंख्या उभारता आली.
विप्रज निगम
एलएसजीविरुद्धच्या सामन्यात आशुतोषला साथ देताना विपराज निगमने देखील केवळ 15 चेंडूत 39 धावांची वेगवान खेळी केली होती. त्याच्या आक्रमक फलंदाजीने संघाची धावसंख्या पुढे नेण्यास मदत केली. त्याने केवळ बॅटनेच नव्हे तर चेंडूने देखील महत्वपूर्ण योगदान दिले होते.
अश्विनी कुमार
आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामातील 12 वा सामना वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून 23 वर्षीय अश्विनी कुमारने आयपीएलमध्ये पदार्पण केले. मुंबई इंडियन्सने या 23 वर्षीय खेळाडूवर विश्वास दाखवला आहे. त्यानेही या विश्वासाला जागत आपली कामगिरी चोख बजावली. त्याने केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेला बाद केले. आयपीएल 2025 मधील पहिलीच ओव्हरमधील पहिल्याच चेंडूवर त्याने अजिंक्य रहाणेला आपला पहिला बळी ठरवले. राहणेने टोवलेला चेंडू तिलक वर्माने अफलातून टिपला आणि अश्विनीने आयपीएलमधील आपली पहिली विकेट घेतली. तसेच अश्विनीने रिंकू सिंग आणि प्रभावशाली खेळाडू मनीष पांडेला बाद केले. त्याने 3 ओव्हर मध्ये 24 धावा देत 4 महत्वाच्या विकेट्स घेतल्या.