Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

17 वर्षीय Tanvi Sharma ची कमाल! Taipei Open 2026 जिंकून संपवला 18 वर्षांचा दुष्काळ

Tanvi sharma won Taipei Open 2026 Super 300: १७ वर्षीय भारतीय बॅडमिंटनपटू तन्वी शर्माने तैपेई ओपनमध्ये आपले पहिले BWF सुपर ३०० विजेतेपद पटकावून इतिहास रचला आहे. ही स्पर्धा जिंकणारी ती सर्वात तरुण खेळाडू ठरली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 02, 2026 | 02:28 PM
17 वर्षीय Tanvi Sharma ची कमाल! Taipei Open 2026 जिंकून संपवला 18 वर्षांचा दुष्काळ
Follow Us
Follow Us:
  • 17 वर्षीय Tanvi Sharmaची कमाल
  • Taipei Open 2026 जिंकून मोडला 18 वर्षांचा दुष्काळ
  • एकाच हंगामात दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय
भारताची युवा बॅडमिंटन स्टार तन्वी शर्माने तैपेई ओपन सुपर-300 स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद पटकावून इतिहास रचला आहे. पंजाबच्या या १७ वर्षीय खेळाडूने रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात व्हिएतनामच्या सहाव्या मानांकित थुई लिन्ह गुयेनला २१-१६, २१-१६ असे पराभूत करून आपल्या कारकिर्दीतील पहिले BWF वर्ल्ड टूर विजेतेपद पटकावले. हा सामना केवळ ३६ मिनिटे चालला. यासह, तन्वी शर्मा २००८ साली सायना नेहवालनंतर या स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. तिच्या कारकिर्दीतील हे पहिले BWF सुपर ३०० विजेतेपदही आहे. गेल्या वर्षी ती यूएस ओपन सुपर ३०० च्या अंतिम फेरीत पोहोचली होती, पण तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

Gulveer Singh चा CWG 2026 मध्ये ऐतिहासिक पराक्रम! 5000 मीटरमध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय

तन्वीने दोन्ही सेट्समध्ये गाजवले वर्चस्व

भारताची बॅडमिंटनपटू तन्वी शर्माने तैपेई ओपन सुपर ३०० बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात व्हिएतनामच्या थुई लिन गुयेनवर दोन्ही सेटमध्ये वर्चस्व गाजवले. तिने सामन्याची सुरुवात शानदार केली. आपल्या उत्कृष्ट ड्रॉप शॉट्स, क्रॉस-कोर्ट स्मॅशेस आणि अप्रतिम नेट प्लेच्या जोरावर तिने पहिल्या सेटमध्ये १०-२ अशी आघाडी घेतली. मध्ये काही चुका झाल्या, पण तिने लगेचच पुनरागमन करत पहिला गेम २१-१६ ने जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये व्हिएतनामी खेळाडूने ३-० अशी आघाडी घेतली, पण तन्वीने आपला संयम राखला. दुसऱ्या सेटमध्ये व्हिएतनामी खेळाडूने ३-० अशी आघाडी घेतली, पण तन्वीने आपला संयम राखला. उत्कृष्ट डिफेन्स आणि ट्रिकी शॉट्स मारत तिने आघाडी घेतली. अखेरीस, दुसरा सेटही २१-१६ अशा फरकाने जिंकून अवघ्या ३६ मिनिटांत सामना संपवला. यासह, तन्वी शर्मा वयाच्या १७ वर्षे आणि २२२ दिवसांत, तन्वी तैपेई ओपनच्या इतिहासातील सर्वात तरुण अंतिम फेरीतील खेळाडू ठरली. तिने तैपेईच्या ताई त्झू-यिंगचा विक्रम मोडला आहे, जिने वयाच्या १८ वर्षे आणि ८५ दिवसांनी हे विजेतेपद पटकावले होते.

17-year-old Tanvi Sharma 🇮🇳 goes for gold against Nguyen Thuy Linh 🇻🇳.#BWFWorldTour #TaipeiOpen2026 pic.twitter.com/QUlZuTSRUc — BWF (@bwfmedia) August 2, 2026

एकाच हंगामात दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय

तन्वीने या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचताच, २००६ मध्ये पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत खेळलेल्या दक्षिण कोरियाचे दिग्गज ली योंग डे यांचा सर्वात कमी वयात अंतिम फेरीत पोहोचण्याचा विक्रम मोडला. याशिवाय, माजी जागतिक ज्युनियर नंबर वन तन्वी ही जागतिक ज्युनियर चॅम्पियनशिपच्या एकाच हंगामात दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय आहे. तन्वी वयाच्या १६ व्या वर्षी २०२५ च्या यूएस ओपनमध्ये तिच्या पहिल्या सुपर ३०० अंतिम फेरीत पोहोचली होती, पण तिला त्या स्पर्धेत यश मिळाले नाही.

CWG 2026: भारताची दुहेरी कमाल! शॉटपुटमध्ये Soman Rana ने जिंकले ‘गोल्ड’; शुभम जुयालच्या गळ्यात सिल्व्हर

Web Title: Tanvi sharma won taipei open 2026 super 300 women singles creates history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 02:27 PM

Topics:  

  • Badminton
  • China
  • Sport News

संबंधित बातम्या

पुण्यात Tennis चा थरार! आरुष देशपांडे अन् ‘या’ खेळाडूची चमकदार कामगिरी, पटकावली विजेतेपदे
1

पुण्यात Tennis चा थरार! आरुष देशपांडे अन् ‘या’ खेळाडूची चमकदार कामगिरी, पटकावली विजेतेपदे

Asian Games 2026: ना टॉस, ना सामना! बांग्लादेश थेट सेमीफायनलमध्ये; चीनचं आव्हान संपलं
2

Asian Games 2026: ना टॉस, ना सामना! बांग्लादेश थेट सेमीफायनलमध्ये; चीनचं आव्हान संपलं

Stock Market मध्ये भीतीचं वातावरण! China च्या एन्ट्रीने उडाली खळबळ… आता काय होणार?
3

Stock Market मध्ये भीतीचं वातावरण! China च्या एन्ट्रीने उडाली खळबळ… आता काय होणार?

Badminton: एकतर्फी संग्राम! ‘जेझ’ संघ ठरला १२ व्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन स्पर्धेचा ‘सुपर चॅम्पियन’
4

Badminton: एकतर्फी संग्राम! ‘जेझ’ संघ ठरला १२ व्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन स्पर्धेचा ‘सुपर चॅम्पियन’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.