MI vs DC Live Pitch Report (फोटो- सोशल मिडिया)
मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने
अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर होणार सामना
दुपारी 3.30 वाजता सुरू होणार सामना
Tata IPL 2026 MI Vs DC Live Updates: आज राजधानी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार आहे. आयपीएलचा थरार आज दिल्लीत पाहायला मिळणार आहे. तब्बल 12 वर्षांनी मुंबई इंडियन्सने (MI vs DC) आपला पहिला सामना जिंकला आहे. तर लखनौविरुद्ध दिल्लीने देखील विजय प्राप्त केला होता.
आज अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स हे दोन्ही संघ विजयासाठी मैदानात उतरतील. दोन्ही संघांनी आपला पहिला सामना जिंकला आहे. त्यामुळे आज दोन्ही संघ आपला विजयाचा रथ कायम ठेवण्यासाठी खेळताना दिसून येतील. हार्दिक पंड्या विरुद्ध अक्षर पटेल हे कर्णधार म्हणून आमनेसामने असतील.
अरुण जेटली स्टेडियमचा पीच रिपोर्ट
आजचा शनिवार हा आयपीएलमधला पहिला हेडर शनिवार असणार आहे. आज आयपीएलचे दोन सामने होणार आहेत. तर दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन समजले जाते. त्यामुळे या ठिकाणी आज मोठी धावसंख्या पाहायला मिळू शकते. 2021 नंतर या ठिकाणी आयपीएलचे 21 सामने झाले. यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 200 पेक्षा जास्त धावसंख्या उभी केली आहे. या ठिकाणी आज पावसाची देखील शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.
विजयाचा श्रीगणेशा! IPL मध्ये MI ने मोडला 14 वर्षांचा जुना ‘शाप’; KKR विरुद्ध हिटमॅनची वादळी खेळी
काय आहे आकडेवारी?
जसप्रीत बुमराहने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध चांगली कामगिरी केली आहे. त्याने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आतापर्यंत 30 विकेट्स घेलत्याचे समोर येत आहे. तर अक्षर पटेल आयपपीएलमध्ये 2000 धावा पूर्ण करण्यासाठी 84 धावा दूर आहे. तर रोहित शर्माने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 1 हजार पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
LSG Vs DC Live: लखनौसमोर समीर रिझवीचा धुमाकूळ; एकाना हादरलं, दिल्लीचा 6 विकेट्सने विजय
मुंबई इंडियन्सची संभाव्य टीम: रोहित शर्मा, रायन रिकेल्टन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), नमन धीर, शरफेन रदरफोर्ड , रॉमॅरियो शेफर्ड, मिचेल सँटनर , अल्ला गझनफर,शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, मयंक मार्कंडे, क्विंटन डी कॉक, रॉबिन मिन्झ, मिचेल सँटनर
दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य टीम: केएल राहुल, पाथुम निसांका, नितीश राणा, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, कुलदीप यादव, लुंगी एन्गिडी, मुकेश कुमार, टी. नटराजन , समीर रिझवी , आशुतोष शर्मा, पृथ्वी शॉ, विप्रज निगम,मिचेल स्टार्क , दुष्मंथा चमीरा






