
दिल्ली कॅपिटल्स आज होम ग्राऊंडवर खेळणार
अजिंक्य पंजाबला रोखण्याचे अक्षर पटेलपुढे आव्हान
श्रेयस अय्यरने अद्याप एकही सामना गमावला नाही
Tata IPL PBKS Vs DC Live Toss Updates: थोड्याच वेळात दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्ज सामना सुरू होणार आहे. आज शनिवार असल्याने डबल हेडर सामने असणार आहेत. दोन्ही संघ विजयाच्या आत्मविश्वासाने मैदानात उतरणार आहेत. दरम्यान नुकत्याच झालेला टॉस दिल्ली कॅपिटल्सने जिंकला (IPL 2026) असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या कर्णधार श्रेयस अय्यर आणि पंजाब किंग्जचा संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. पंजाब किंग्जने अद्याप एकही सामना गमावला नाही. कर्णधार श्रेयस अय्यर, प्रभसिमरन सिंह, प्रियांश आर्या आणि पंजाबचे गोलंदाज शानदार कामगिरी बजावत आहे. एक सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे पंजाबला तिथे 1 पॉइंट मिळाला. अन्यथा सध्या पंजाब सर्व सामने जिंकून पॉईंट्स टेबलमध्ये आघाडीवर आहे.
दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात चांगली झाली होती. मात्र मधले काही सामने दिल्लीने गमावले. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने आपली गाडी रुळावर आणली आहे. कुलदीप यादव, लुंगी एनगिडी , केएल राहुल, डेव्हिड मिलर, कूपर कॉनली हे सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये दिसून येत आहेत. त्यामुळे आजचा सामना हा रोमांचकारी होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
DC Vs PBKS Pitch Report: फलंदाज की गोलंदाज? कोण ठरणार वरचढ? पहा आजचा पीच रिपोर्ट
काय आहे आजचा पीच रिपोर्ट?
दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी नंदनवन समजली जाते. दिल्लीची खेळपट्टी ही पूर्णपणे सपाट असून ती फलंदाजांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. हे मैदान थोडे लहान असल्याने या ठिकाणी आज हायस्कोअर सामना पाहायला मिळू शकतो. दुसऱ्या डावात खेळपट्टी थोडी कोरडी होऊन फिरकीपटूंना मदत होऊ शकते. या मैदानावर 200 हून अधिक धावांचा पाठलाग करणे देखील शक्य आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. सामना दुपारी ३:३० वाजता सुरू होत असल्याने खेळाडूंना ४० अंश सेल्सिअस तापमानाचा सामना करावा लागणार आहे.
SRH Vs RR Pitch Report: आर्चरचा अचूक निशाणा की अभिषेकची बॅट! काय सांगतो खेळपट्टीचा अहवाल?
पंजाब किंग्जची संभाव्य टीम: प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्या, कूपर कॉनोली, श्रेयस अय्यर, मार्क्स स्टॉइनिस, नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्को जानसेन, झेवियर बार्टलेट, विजयकुमार वैशाक, युझवेंद्र चहल, अर्शर्दीप सिंग.
दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य टीम: केएल राहुल (यष्टीरक्षक), पथुम निसंका, समीर रिझवी, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, औकिब नबी डार, कुलदीप यादव, टी. नटराजन, मुकेश कुमार, लुंगी एनगिडी, आशुतोष शर्मा.