rr vs srh pitch report (फोटो- istockphoto)
राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने
एसआरएच आज नव्या कर्णधारासह खेळणार
संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार सामना
Tata IPL 2026 SRH Vs RR Live : आयपीएल 2026 च्या 36 व्या सामन्यात आज राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. जयपूरच्या ऐतिहासिक सवाई मानसिंग स्टेडियमवर (IPl 2026) हा सामना रंगणार असून, दोन्ही संघांसाठी हा सामना गुणतालिकेतील स्थान मजबूत करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. सवाई मानसिंग स्टेडियमचा पीच रिपोर्ट जाणून घेऊयात.
सवाई मानसिंग क्रिकेट स्टेडियमचा पीच रीपोर्ट
सवाई मानसिंग स्टेडियमची खेळपट्टी नेहमीच संतुलित राहिली आहे.येथील खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन ठरू शकते. सुरुवातीला चेंडू बॅटवर नीट येत असल्याने पॉवरप्लेमध्ये धावांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. एसआरएचची किंवा राजस्थानची पहिली फलंदाजी असली तरी दोन्ही संघाकडे पॉवर प्ले मध्ये मोती धावसंख्या उभी करणारे फलंदाज आहे.
आज हा सामना रात्री 7.30 वाजता सुरू होणार आहे. दूसरा डाव सुरू होईल तेव्हा खेळपट्टीवर दव पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे बॉल ओला झाल्यास गोलंदाजांना अडचण होऊ शकते. त्यामुळे आज या ठिकाणी टॉस जिंकून कोणताही संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. मधल्या ओव्हर्समध्ये स्पिनर्सला मदत मिळू शकते. या मैदानावर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 180 ते 190 च्या दरम्यान राहू शकते.
हेड टू हेड रेकॉर्ड
आतापर्यंत एसआरएच आणि राजस्थान रॉयल्सचा संघ 22 वेळेस आमनेसामने आले आहेत. यामध्ये एसआरएचचे पारडे जड पाहायला मिळत आहे. 21 पैकी 13 सामने एसआरएचने जिंकले आहेत. तर 9 सामने राजस्थान रॉयलने जिंकले आहेत. सध्या पॉईंट्स टेबलमध्ये आघाडी घेण्यासाठी सर्वच संघांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. एसआरएच सध्या चौथ्या तर राजस्थान रॉयल्स तिसऱ्या स्थानी आहे.
सामन्याची महत्त्वाची माहिती-
स्थळ: सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर.
वेळ: रात्री ७:३० वाजता.
खास बाब: राजस्थान रॉयल्स सध्या गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर हैदराबाद चौथ्या क्रमांकावर
DC Vs PBKS Pitch Report: फलंदाज की गोलंदाज? कोण ठरणार वरचढ? पहा आजचा पीच रिपोर्ट
राजस्थान रॉयल्सची संभाव्य टीम: यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल, लुआन-ड्रे प्रिटोरियस, डोनोवन फरेरा, रवींद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, संदीप शर्मा, रवी बिश्नोई, तुषार देशपांडे
सनरायझर्स हैदराबाद: अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, हेनरिक क्लासेन, सलील अरोरा, अनिकेत वर्मा, नितीश कुमार रेड्डी, हर्ष दुबे , शिवांग कुमार,प्रफुल्ल हिंगे, एशान मलिंगा, हर्षल पटेल , झीशान अन्सारी






