Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Praful Hinge चा RR ला ‘मराठमोळा’ हिसका! SRH ने 5 व्या विजयापासून रोखलं, 57 रन्सने केला पराभव

217 रन्सचा पाठलाग करण्यासाठी राजस्थान रॉयल्सकडून यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशी मैदानात उतरले. मात्र वैभव सूर्यवंशी या मॅचमध्ये एकही रन न करता आउट झाला.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 13, 2026 | 11:20 PM
Praful Hinge चा RR ला ‘मराठमोळा’ हिसका! SRH ने 5 व्या विजयापासून रोखलं, 57 रन्सने केला पराभव
Follow Us
Follow Us:

एसआरएचचे आरआरला 217 रन्सचे टार्गेट
इशान किशनने केली 91 रन्सची खेळी

Tata IPL 2026 SRH Vs RR Live Updates: आज राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना पार पडला. राजस्थान रॉयल्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. एसआरएचने आरआरला 217 रन्सचे टार्गेट दिले होते. राजस्थान रॉयल्सची सुरुवात म्हणावी तशी चांगली झाली नाही. दरम्यान या सामन्यात एसआरएचने राजस्थानचा 57 रन्सने पराभव केला आहे. साकीब हुसेन आणि प्रफुल हिंगे या दोन युवा गोलंदाजांनी प्रत्येकी 4 विकेट्स घेऊन राजस्थान रॉयल्सला सलग 5 व्या विजयापासून रोखले आहे.

राजस्थान रॉयल्सची फलंदाजी 
217 रन्सचा पाठलाग करण्यासाठी राजस्थान रॉयल्सकडून यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशी मैदानात उतरले. मात्र वैभव सूर्यवंशी या मॅचमध्ये एकही रन न करता आउट झाला. तर ध्रुव जुरेल देखील शून्यावर आउट झाला. ल्वान-द्रे प्रिटोरियस देखील एकही रन करू शकला नाही. राजस्थान रॉयल्सचे निम्मे फलंदाज पॉवर प्लेच्या आधीच आउट झाले. त्यानंतर खेळायला आलेल्या रवींद्र जाडेजाने आणि डोनोव्हन फेरेराने राजस्थानचा डाव सांभाळला. दोघांनी 100 पेक्षा जास्त रन्सची पार्टनरशिप केली. डोनोव्हन फेरेरा 69 रन्सवर आउट झाला. रवींद्र जाडेजा 45 रन्सवर आउट झाला. तुषार देशपांडेने 9 चेंडूत 25 रन्सची खेळी केली.

राजस्थान रॉयल्सची गोलंदाजी

राजस्थान रॉयल्सने पहिल्या ओव्हरपासून प्रभावी गोलंदाजी केली. जोफ्रा आर्चरने अभिषेक शर्माला 0 व्यावर आउट केले. डोनोव्हन फेरेराने ट्रेविस हेडला आउट केले. संदीप शर्माने इशान किशनला आउट केले. तुषार देशपांडेने हेनरी क्लासेनला आउट केले. जोफ्रा आर्चरने नितीश कुमार रेड्डीची विकेट घेतली. रियान परागने देखील देखील एक विकेट घेतली.

Vaibhav Sooryavanshi ✅
Praful Hinge ✅
Lhuan-dre Pretorius ✅
A dream start for Praful Hinge on his #TATAIPL debut 🧡 Updates ▶️ https://t.co/xGTDdKbXpY#KhelBindaas | #SRHvRR | @SunRisers pic.twitter.com/RKGW3NxM5y — IndianPremierLeague (@IPL) April 13, 2026

एसआरएचची फलंदाजी 

राजस्थान रॉयल्सने टॉस जिंकून एसआरएचला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. जबरदस्त फॉर्ममध्ये असलेले अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेड सलामीला खेळण्यासाठी मैदानात उतरले. मात्र आज अभिषेक शर्मा खातेही उघडू शकला नाही. एकही रन न करता तो आउट झाला. तर ट्रेविस हेड देखील लवकर आउट झाला. 18 चेंडूत 18 रन करून हेड आउट झाला. नंतर एसआरएचची कमान इशान किशनने सांभाळली. केवळ 30 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. इशान किशन 44 चेंडूत 91 रन्स करून आउट झाला. त्यापाठोपाठ हेनरी क्लासेन देखील 40 रन्स करून आउट झाला. त्यानंतर नितीश कुमार रेड्डी 13 चेंडूत 28 रन्स करून आउट झाला. अनिकेत वर्मा 5 चेंडूत 6 रन्स करून आउट झाला. हर्ष दुबे एकही रन न करता नॉट आउट राहिला.

एसआरएचची गोलंदाजी

एसआरएचच्या गोलंदाजांना या मॅचमध्ये सूर गवसल्याचे पाहायला मिळाले. साकीब हुसेनने राजस्थानच्या फलंदाजांची दांडी गूल केली. त्याने यशस्वी जयस्वाल, कर्णधार रियान परागची विकेट घेतली. तर प्रफुल हिंगेने वैभव सूर्यवंशीची विकेट घेतली. साकीब हुसेनने डोनोव्हन फेरेराची विकेट घेतली.

SRH Vs RR: हैदराबादमध्ये Ishan Kishan ची रॉयल ‘धुलाई’; राजस्थानला 5 व्या विजयासाठी 217 रन्सची गरज

एसआरएचची संभाव्य टीम: ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, हेनरिक क्लासेन, नितीश कुमार रेड्डी, सलील अरोरा, अनिकेत वर्मा, हर्ष दुबे, शिवांग कुमार, हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, ईशान कलिंगा, झीशान अन्सारी

राजस्थान रॉयल्सची संभाव्य टीम:
यशस्वी जयस्वाल, वैभव सूर्यवंशी, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, दासुन शनाका, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, रवी बिश्नोई, संदीप शर्मा, नितीश राणा.

Web Title: Tata ipl 2026 praful hinge ishan kishan srh beat rajsthan royals by 57runs live updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 11:18 PM

Topics:  

  • IPL 2026
  • Ishan Kishan
  • SRH vs RR

संबंधित बातम्या

‘…असेच टाकत रहा,स्पिन होईल’; स्टंपमागून Ishan चे चक्रव्यूह, अक्षरच्या बॉलवर Jos Buttler ची दांडी गूल
1

‘…असेच टाकत रहा,स्पिन होईल’; स्टंपमागून Ishan चे चक्रव्यूह, अक्षरच्या बॉलवर Jos Buttler ची दांडी गूल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.