Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

GT Vs RR Live: ‘प्रिन्स’चा राजेशाही थाट! Shubhman Gill चा शतकी झंझावात; रॉयल्सला नमवत फायनलमध्ये प्रवेश

राजस्थान रॉयल्सने दिलेल्या 215 रन्सचा पाठलाग करण्यासाठी गुजरात टायटन्सकडून कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन मैदानात खेळण्यासाठी आले. मात्र या दोघांनी अत्यंत सूचक, आक्रमक आणि शानदार भागीदारी रचली.

  • By तेजस भागवत
Updated On: May 29, 2026 | 11:32 PM
GT Vs RR Live: 'प्रिन्स'चा राजेशाही थाट! Shubhman Gill चा शतकी झंझावात रॉयल्स नमवत फायनलमध्ये प्रवेश

GT Vs RR Live: 'प्रिन्स'चा राजेशाही थाट! Shubhman Gill चा शतकी झंझावात रॉयल्स नमवत फायनलमध्ये प्रवेश

Follow Us
Close
Follow Us:

साई सुदर्शन आणि शुभमन गिलची शानदार खेळी 
राजस्थान रॉयल्सचे गोलंदाज सपशेल फेल 
शुभमन गिलची शानदार शतकी खेळी

Tata IPL 2026 GT Vs RR Qualifier 2 Live Updates: आज चंदीगडमध्ये गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये आयपीएल 2026 चा क्वालिफायर 2 सामना खेळवण्यात आला. राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी केली. वैभव सूर्यवंशीच्या खेळीच्या जोरावर राजस्थानने गुजरातला 215 रन्सचे टार्गेट दिले होते. गुजरात कडून साई सुदर्शन आणि कर्णधार शुभमन गिलने शानदार भागीदारी केली. अखेर या सामन्यात गुजरात टायटन्सचा विजय झाला आहे. त्यामुळे गुजरात टायटन्सने क्वालिफायर 2 मध्ये राजस्थानचा 7 विकेट्सने पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता गुजरात विरुद्ध आरसीबी अंतिम सामना 31 मे रोजी अहमदाबादमध्ये होणार आहे.

गुजरात टायटन्सची फलंदाजी

राजस्थान रॉयल्सने दिलेल्या 215 रन्सचा पाठलाग करण्यासाठी गुजरात टायटन्सकडून कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन मैदानात खेळण्यासाठी आले. मात्र या दोघांनी अत्यंत सूचक, आक्रमक आणि शानदार भागीदारी रचली आणि गुजरातचा विजय निश्चित केला. शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी 167 रन्सची भागीदारी केली. साई सुदर्शन 58 रन्सवर विचित्र पद्धतीने आउट झाला. त्यानंतर जोस बटलर खेळण्यासाठी आला. प्रिन्स म्हणून ओळख असलेल्या शुभमन गिलने शानदार शतकी खेळी केली.

राजस्थान रॉयल्सची गोलंदाजी

215 रन्सचा बचाव करणे राजस्थानच्या गोलंदाजांना शक्य झाले नाही. क्वालिफायर 2 मध्ये अत्यंत सर्वसाधारण अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी राजस्थानच्या गोलंदाजांची अक्षरश: धुलाई केली. अखेर ब्रिजेश शर्माने साई सुदर्शनला आउट करत राजस्थानला पहिली विकेट मिळवून दिली.

Vaibhav Suryvanshi चा नादच खुळा! नावावर केला ‘हा’ महारेकॉर्ड; ठरला पहिला भारतीय फलंदाज

राजस्थान रॉयल्सची फलंदाजी

रियान परागने चंदीगडच्या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वाल खेळण्यासाठी मैदानात आले होते. मात्र राजस्थानसाठी जयस्वाल यशस्वी खेळी करू शकला नाही. तो केवळ 1 रन करून आउट झाला. त्यानंतर मागच्या सामन्यात वेगवान अर्धशतक खेळी करणारा ध्रुव जुरेल मैदानात आला. जुरेल 7 रन्स करून आउट झाला. त्यानंतर खेळण्यासाठी रवींद्र जाडेजा आणि वैभव सूर्यवंशीने राजस्थानचा डाव सावरला.

Under immense pressure, the Captain says 𝙆𝙚𝙚𝙥 𝘾𝙖𝙡𝙢
🧘‍♂️
🎥 The moment Shubman Gill got to a masterful ton 👏 Updates ▶️ https://t.co/eupS8cBPc2#TATAIPL | #Qualifier2 | #TheFinalLeap | #GTvRR | @gujarat_titans pic.twitter.com/q3TaZru8Vj — IndianPremierLeague (@IPL) May 29, 2026

गुजरात टायटन्सची गोलंदाजी

गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांनी आज चांगली गोलंदाजी केली. मोहम्मद सिराजने यशस्वीला आउट केले. तर रबाडाने ध्रुव जुरेलची विकेट घेतली. जेसन होल्डरने जोफ्रा आर्चर आणि दासून शनकाला आउट केले. प्रसिद्ध कृष्णाने एक विकेट घेतली.

GT Vs RR Live: संकटमोचक Vaibhav Suryvanshi! राजस्थानचा कोसळणारा डाव सावरला; गुजरातसमोर बलाढ्य आव्हान

गुजरात टायटन्स :शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर, निशांत सिंधू, राहुल तेवाटिया, वॉशिंग्टन सुंदर, जेसन होल्डर, रशीद खान, मोहम्मद सिराज, कागिसो रबाडा, प्रसीद कृष्णा.

राजस्थान रॉयल्स : यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रियान पराग (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, डोनोवन फरेरा, रवींद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, रवी बिश्नोई, नांद्रे बर्गर, संदीप शर्मा.

Web Title: Tata ipl 2026 qualifier 2 gt shubhman gill and sai sudarshan beat rajasthan royals by 7 wickets and enter final against rcb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 11:29 PM

Topics:  

  • GT vs RR
  • IPL 2026
  • jofra archer
  • Sai Sudarshan
  • Shubhman Gill

संबंधित बातम्या

Vaibhav Suryvanshi चा नादच खुळा! नावावर केला ‘हा’ महारेकॉर्ड; ठरला पहिला भारतीय फलंदाज
1

Vaibhav Suryvanshi चा नादच खुळा! नावावर केला ‘हा’ महारेकॉर्ड; ठरला पहिला भारतीय फलंदाज

GT Vs RR Live: संकटमोचक Vaibhav Suryvanshi! राजस्थानचा कोसळणारा डाव सावरला; गुजरातसमोर बलाढ्य आव्हान
2

GT Vs RR Live: संकटमोचक Vaibhav Suryvanshi! राजस्थानचा कोसळणारा डाव सावरला; गुजरातसमोर बलाढ्य आव्हान

IPL 2026 मध्ये फसवणूक? चंदीगडमध्ये टॉसवरुन राडा; भरमैदानात Shubhman Gill अंपायरवर भडकला
3

IPL 2026 मध्ये फसवणूक? चंदीगडमध्ये टॉसवरुन राडा; भरमैदानात Shubhman Gill अंपायरवर भडकला

RR vs GT Qualifier 2 Live: पहिली लढाई राजस्थानने जिंकली; रियान परागचा फलंदाजीचा निर्णय
4

RR vs GT Qualifier 2 Live: पहिली लढाई राजस्थानने जिंकली; रियान परागचा फलंदाजीचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.