
जयपूरमध्ये राजस्थान अन् लखनौ भिडणार
वैभव सूर्यवंशच्या खेळीकडे लक्ष
शामी विरुद्ध जयस्वालमध्ये चुरस
Tata IPL 2026 RR Vs LSG Live Updates: आज जयपूरमध्ये थोड्याच वेळात राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौचा संघ आमनेसामने येणार आहेत. राजस्थानचे नेतृत्व रियान पराग आणि लखनौचे नेतृत्व ऋषभ पंत करत आहे. राजस्थान (IPL 2026) रॉयल्ससाठी आजचा सामना अत्यंत महत्वाचा असणार आहे. प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी राजस्थान रॉयल्सला विजय आवश्यक असणार आहे. दरम्यान आता टॉस पार पडला. rराजस्थान रॉयल्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी आजचा सामना राजस्थान रॉयल्ससाठी महत्वाचा आहे. आजचा सामना जिंकल्यास राजस्थानचा प्ले ऑफ मध्ये जाण्याचा मार्ग काही प्रमाणात सोपा होऊ शकतो. मात्र पराभव झाल्यास राजस्थान रॉयल्सच्या अडचणी वाढणार आहेत. तर दुसरीकडे ऋषभ पंत नेतृत्व करत असलेल्या लखनौचा संघ याआधीच या स्पर्धेतून बाहेर गेला आहे. मात्र स्पर्धेचा शेवट गोड करण्यासाठी लखनौचा संघ विजयासाठी मैदानात उतरेल.
आजचा हा महत्त्वाचा सामना जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. सवाई मानसिंह स्टेडियमची खेळपट्टी कडक आणि सपाट स्वरूपाची आहे. त्यामुळे हे पीच फलंदाजीसाठी फायदेशीर ठरते. फलंदाजांना मोठे फटके खेळणे सोपे जाते. गेल्या काही सामन्यांमध्ये या ठिकाणी 200 पेक्षा जास्त रन्स झाल्याचे पाहायला दिसून आले.
IPL 2026 Playoffs: असं कुठं असतंय व्हय? जागा एक अन् दावेदार अनेक; SRH च्या एका विजयाने मोठी उलथापालथ
आयपीएल 2026 मध्ये तीन संघ क्वालिफाय झाले आहेत. चौथ्या स्थानावर कोण येणार यासाठी मोठी चुरस सुरू आहे. अनेक संघ प्रयत्न करत आहेत. राजस्थान रॉयल्सला क्वालिफाय करायचे असल्यास आजचा आणि पुढील सामना जिंकावा लागणार आहे. राजस्थान रॉयल्सने मागील सामन्यात पराभवाचा सामना केला आहे. आजचा सामना जयपूरमध्ये म्हणजेच होम ग्राऊंडवर होत असल्याचे राजस्थानचे पारडे जड समजले जात आहे.
SRH च्या एका विजयाने मोठी उलथापालथ
आरसीबीचे सध्या 18 पॉईंट्स झाले आहेत. तसेच एसआरएचकडे आणि गुजरातकडे 16 पॉईंट्स जमा झाले आहेत. आता मात्र प्ले ऑफ साठी एकच जागा शिल्लक आहे. त्यामुळे यासाठी अनेक संघांमध्ये चुरस सुरू आहे. आरसीबी, गुजरात आणि एसआरएचने प्लेऑफ मध्ये क्वालिफाय केले आहे. आता उरलेल्या एका जागेसाठी पंजाब किंग्स, चेन्नई सुपर किंग्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ मैदानात आहेत. या सर्व संघांना आपले पुढील सर्व सामने जिंकावे लागणार आहेत.
IND vs AFG: नवा कर्णधार, नवा जोश! अफगाणिस्तानविरुद्ध बीसीसीआयने केली Team India ची घोषणा
राजस्थान रॉयल्सचा संघ: राजस्थान रॉयल्स, ध्रुव जुरेल, रियान पराग (कर्णधार), डोनाव्हन फरेरा, शुभम दुबे, जोफ्रा आर्चर, जोफ्रा आर्चर, ब्रिजेश शर्मा, यश राज पुंज, ॲडम मिल्ने, रवी बिश्नोई, वैभव सूर्यवंशी, नांद्रे बर्गर.
लखनौ सुपर जायंट्सचा संघ: मिचेल मार्श, हिंमत सिंग, रिषभ पंत, निकोलस पूरन, एडन मार्करम, आयुष बदोनी, दिग्वेश राठी, मोहम्मद शमी, मयंक यादव, आकाश सिंग, मोहसिन खान, मुकुल चौधरी, प्रिन्स यादव