भारतीय संघाची घोषणा (फोटो- सोशल मिडिया)
अफगणिस्तानविरुद्ध भारतीय संघाची घोषणा
शुभमन गिल करणार भारताचे नेतृत्व
वन-डे संघात रोहित आणि विराटचा समावेश
BCCI/IND Vs AFG: बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. भारतीय संघ आयपीएल संपताच अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी आणि वन-डे मालिका खेळणार आहे. त्यासाठी आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेत काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली असून, अनेक युवा आणि अनुभवी खेळाडूंनी संघात पुनरागमन केले आहे.
वन-डे आणि कसोटी संघाचे नेतृत्व शुभमन गिल करणार आहे. केएल राहुल कसोटी संघाचा आणि श्रेयस अय्यर वनडे संघाचा उपकर्णधार असणार आहे. वनडे संघात इशान किशन परतला आहे. तर अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघात विराट कोहली आणि रोहित शर्माचा देखील समावेश करण्यात आला आहे.
भारताचा कसोटी संघ: शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, साई सुदर्शन, के.एल. राहुल (उपकर्णधार), देवदत्त पडिक्कल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
🚨 News 🚨 Presenting #TeamIndia's squads for the @IDFCFIRSTBank Test match and the 3️⃣-match ODI series against Afghanistan in June 🙌#INDvAFG pic.twitter.com/hFiABALLld — BCCI (@BCCI) May 19, 2026
भारताचा एकदिवसीय सामन्यांचा संघ: शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), के.एल. राहुल, ईशान किशन, हार्दिक पांड्या, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, प्रिन्स यादव, गुरनूर ब्रार, हर्ष दुबे.
बातमी अपडेट होत आहे…






