
भयानक वादळ! IPL 2026 मध्ये रन्सचा पाऊस पडणार; SRH ला टॉप 2 मध्ये जाण्यासाठी थेट...
आज एसआरएच आणि आरसीबी भिडणार
हैदराबादमध्ये रंगणार महत्वाचा सामना
आरसीबीला मोठे फरकाने हरवावे लागणार
Tata IPL 2026 SRH Vs RCB Live Updates: आज संध्याकाळी 7.30 वाजता राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर सनराययझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात महत्वाचा सामना होणार आहे. एसआरएचसाठी आजचा सामना महत्वाचा असणार आहे. टॉप 2 मध्ये जागा पक्की करायची असेल तर एसआरएचला आजचा सामना जिंकावा लागेल. मात्र एसआरएचला हा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागणार आहे.
आतापर्यंत आयपीएलमध्ये गुजरात, आरसीबी आणि एसआरएचने क्वालिफाय केले आहे. आयपीएल 2026 मध्ये आज 68 वा सामना खेळवला जाणार आहे. आजचा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होत आहे. या सामन्याच्या पार्श्वभूमीवर हैदराबादसाठी ‘टॉप २’ मध्ये पोहोचणे आता अत्यंत आव्हानात्मक झाले आहे.
कालच्या सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जचा 89 रन्सने पराभव केला आहे. गुजरातने चेन्नईचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे. यामुळे आता गुजरातचा नेट रनरेट +0.695 झाला आहे. त्यामुळे आजचा सामना एसआरएचला मोठ्या फरकाने जिंकावा लागणार आहे. एसआरएचला केवळ विजय मिळवणे आवश्यक नाहीये तर मोठ्या फरकाने जिंकणे महत्वाचे असणार आहे. त्यांना आजच्या सामन्यात महाविजय मिळवावा लागणार आहे.
एसआरएचला पॉईंट्स टेबलमध्ये टॉप 2 मध्ये आपले स्थान आज पक्के करायचे असेल तर त्यांना आरसीबीला मोठ्या फरकाने हरवावे लागेल. पथम फलंदाजी केल्यास एसआरएचला आरसीबीला जवळपास 80 ते 90 रन्सच्या फरकाने हरवावे लागेल. आजचा हा सामना राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, हैदराबाद येथे सायंकाळी ७:३० वाजता सुरू होईल.
हा सामना खेळपट्टी क्रमांक २ वर खेळला जाईल. ही हाय- स्कोरिंग खेळपट्टी असल्याने या मैदानावर मोठ्या धावसंख्या सातत्याने पाहायला मिळाल्या आहेत. या खेळपट्टीवर मागील काही सामन्यांमध्ये मोठे स्कोअर झाले आहेत. सनरायझर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध २४२ धावा तर पंजाब किंग्सविरुद्ध २३४ धावा उभारल्या होत्या आणि हा सामना जिंकला होता.
MS Dhoni निवृत्ती घेणार? CSK चा कर्णधार ऋतुराज गायकवाडने केले मोठे विधान; म्हणाला…
या दोन्ही सामन्यांमध्ये हैदराबादने प्रथम फलंदाजी केली होती. दुसऱ्या डावात काही प्रमाणात दव पडत असले तरी मोठा स्कोअर उभारल्यास त्याला डिफेंड करणे शक्य आहे. यामुळे नाणेफेक जिंकून कर्णधार प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. राजीव गांधी स्टेडियमची खेळपट्टी गोलंदाच्या तुलनेत फलंदाजांसाठी फायदेशीर मानली जाते. चेंडू सरळ बॅटवर येत असल्यामुळे चौकार-षटकारांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.