
गुजरात टायटन्सला दिले 206 रन्सचे टार्गेट
विराट कोहलीचे शानदार अर्धशतक
आरसीबीचा गुजरातवर दणदणीत विजय
Tata IPL 2026 GT Vs RCB Live Updates: आयपीएलचा थरार सुरू होऊन एक महिना होत आला आहे. आज दोन युवा कर्णधार आमनेसामने आले होते. आज बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात सामना खेळवला गेला. या सामन्यात चाहत्यांना मोठ्या धावसंख्या पाहायला मिळाल्या. गुजरातने (GT Vs RCB) प्रथम फलंदाजी करून आरसीबीला 206 रन्सचे टार्गेट दिले होते. अखेर या सामन्यात आरसीबीने गुजरात टायटन्सवर 5 विकेट्सने विजय मिळवला आहे. गुजरातकडून साई सुदर्शनने केलेली शतकी खेळी व्यर्थ गेली.
आरसीबीची फलंदाजी
गुजरात टायटन्सने दिलेल्या 206 रन्सचा पाठलाग करण्यासाठी आरसीबीकडून विराट कोहली आणि जेकब बेथेल सलामीवीर म्हणून खेळण्यासाठी मैदानात उतरले. दोघांनी पहिल्या एक ते दोन ओव्हर्समध्ये चांगली सुरुवात केली. मात्र जेकब बेथेल केव 14 रन्स करून आउट झाला. त्यानंतर उत्कृष्ठ फॉर्ममध्ये असलेला देवदत्त पाडीकल विराट कोहली बरोबर खेळण्यासाठी आला. विराट कोहलीने आरसीबीसाठी 81 रन्सची अत्यंत महत्वपूर्ण अशी खेळी केली.
देवदत्त पाडीकल अत्यंत आक्रमक खेळी करत आरसीबीला 12 ओव्हर्समध्येच 140 रन्सच्या पुढे पोहोचवले. तर विराट कोहलीने देखील आपला क्लास दाखवला. कर्णधार रजत पाटीदार 8 रन्स करून आउट झाला. तर जितेश शर्मा देखील 10 रन्स करून आउट झाला. शेवटच्या ओव्हर्समध्ये कृणाल पंड्याने एकहाती सामना आरसीबीकडे झुकवला. टीम डेव्हिडने आणि कृणाल पंड्याने अखेरच्या क्षणी सामना आरसीबीकडे झुकवला.
GT Vs RCB Live: जेसन होल्डरचा ‘पॉवर’ शो! ‘आरसीबी’ला विजयासाठी 206 रन्सचे टार्गेट
गुजरात टायटन्सची गोलंदाजी
गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांनी चांगली सुरुवात केली. मोहम्मद सिराजने जेकब बेथेलच्या रूपात आरसीबीला पहिला धक्का दिला. सिराजने बेथलला 14 रन्सवर आउट केले. राशिद खानने 55 रन्सवर खेळत असणाऱ्या देवदत्त पाडीकलला स्टंपआउट करून आउट केले.
गुजरात टायटन्सची फलंदाजी
आरसीबीने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि गुजरातला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. दरम्यान कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शनने गुजरात टायटन्सला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी गुजरातकडून सलामीवीर म्हणून 125 रन्स पेक्षा जास्त रन्सची भागीदारी केली. शुभमन गिल 32 रन्स करून आउट झाला.
Match 34. 18.4: Jason Holder to Krunal Pandya 4 runs, Royal Challengers Bengaluru 205/5 https://t.co/5ZJjfv5Nr6 #TATAIPL | #RCBvGT — IndianPremierLeague (@IPL) April 24, 2026
आरसीबीची गोलंदाजी
आरसीबीला या सामन्यात चांगली गोलंदाजी करता आलेली नसल्याचे पाहायला मिळाले. पॉवर प्लेमध्ये आरसीबीच्या गोलंदाजांना एकही विकेट मिळवता आली नाही. पहिली विकेट त्यांना 127 ते 130 रन्सची भागीदारी झाल्यावर मिळवता आली. सुयश शर्माने शुभमन गिलला 32 रन्सवर आउट केले. तर शतकी खेळी करणाऱ्या साई सुदर्शनला जोश हेझलवूडने आउट केले. तर भुवनेश्वर कुमारने घातक ठरणाऱ्या बटलरला आउट केले.
आजची संभाव्य प्लेइंग 11
आरसीबी: विराट कोहली, फिल सॉल्ट, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, रासिद सलाम, सुयश शर्मा, जोश हेझलवूड. (इम्पॅक्ट प्लेयर: देवदत्त पडिक्कल)
GT Vs RCB Live: साईचं ‘सुदर्शन’ चक्र फिरलं! आरसीबीचे गोलंदाज रडकुंडीला; लगावले वादळी शतक
गुजरात टायटन्स: शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (यष्टीरक्षक), कुमार कुशाग्रा, राहुल तेवतिया, राशीद खान, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, ग्लेन फिलिप्स, कागिसो रबाडा, अशोक शर्मा.