
Team India (Photo Credit- X)
अबु धाबीच्या स्टेडियमवरील भारतीय संघाचा रेकॉर्ड पाहिला तर, त्यांनी या मैदानावर फक्त एक टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे, जो २०२१ च्या आयसीसी टी-२० वर्ल्ड कपमधील अफगाणिस्तानविरुद्धचा होता. त्या सामन्यात भारताने २ बाद २१० धावा केल्या होत्या आणि अफगाणिस्तानला १४४ धावांवर रोखत ६६ धावांनी विजय मिळवला होता. त्यामुळे, या मैदानावर भारताचा विजयाचा रेकॉर्ड १०० टक्के आहे. दुसरीकडे, ओमानने येथे १३ सामने खेळले असून, ६ सामने जिंकले आणि ७ सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला आहे.
Another practice session in the bag 💪 All eyes on #INDvOMA 🎯#TeamIndia | #AsiaCup2025 pic.twitter.com/caNyaK8LXp — BCCI (@BCCI) September 17, 2025
ओमानविरुद्धचा हा सामना टीम इंडियासाठी खूप खास असणार आहे, कारण हा भारताचा २५० वा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना असेल. जागतिक क्रिकेटमध्ये हा टप्पा गाठणारा भारतीय संघ पाकिस्ताननंतर दुसरा संघ ठरेल, ज्यांनी आतापर्यंत २७५ सामने खेळले आहेत. टीम इंडियाने आतापर्यंत खेळलेल्या २४९ सामन्यांपैकी १६६ सामन्यांत विजय मिळवला असून, ७१ सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
आशिया कप २०२५ मधील ग्रुप स्टेज अजून संपलेला नाही. ग्रुप-ए मधून टीम इंडिया आणि पाकिस्तानने पात्रत मिळवली आहे, पण ग्रुप-बीमधील लढाई अजूनही सुरू आहे. १८ सप्टेंबर रोजी श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात मोठा सामना खेळला जाईल. अफगाणिस्तानसाठी हा सामना ‘करो वा मरो’चा असणार आहे. सुपर-४ मध्ये जाण्यासाठी त्यांना फक्त विजय मिळवणे आवश्यक आहे. दुसरीकडे, जर श्रीलंकाला सुपर-४ मध्ये आपली जागा पक्की करायची असेल, तर त्यांना मोठ्या फरकाने हरण्यापासून वाचणे गरजेचे आहे. जर ते ७० हून कमी धावांनी किंवा १३ षटकांच्या आत हरले, तरी ते सुपर-४ मध्ये जातील. या सामन्याच्या निकालावर बांगलादेशचे भवितव्यही अवलंबून आहे.