आकाश दीप अडकला विवाहबंधनात (फोटो- instagram)
भारतीय संघातील स्टार क्रिकेटपटू आकाश दीप आणि आक्षिता राज यांचा विवाहसोहळा वाराणसी येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडला. या विवाहसोहळ्याला अनेक क्रिकेटपटू आणि मान्यवर उपस्थित होते. आकाश दीप अन् आक्षिता राज यांचे लग्नसोहळ्याचे फोटो समोर आले आहेत.
रोहित, धोनी अन् अनुपस्थित?
आकाश दीप अन् आक्षिता राजच्या विवाहसोहळ्याला अनुपस्थित दिसले. याबत आकाशदीपला प्रश्न विचारण्यात आला आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी लग्नसोहळ्याला बोलावले नाही का असा प्रश्न आकाश दीपला विचारण्यात आला? यावेळी त्याने गमतीशीर उत्तर दिले. ते तर आले असते तर वाराणसीमध्ये लग्न होऊ शकले असते का? असे आकाश दीपने गमतीशीर उत्तर दिले आहे.
आकाश दीपच्या मूळ गावी उत्साहाचे वातावरण आहे. लग्नसोहळा होण्याआधी त्याच्या मूळ गावी धार्मिक विधी पार पडले. 21 जून रोजी त्याचा तिलक समारंभ पार पडला. त्यानंतर 24 जून रोजी आकाश दीप अन् आक्षिता राज विवाहबद्ध झाले आहेत. वर आणि वधू लग्नाच्या पोषाखात अत्यंत सुंदर दिसत होते. हा लग्नसोहळा अत्यंत पारंपरिक, कौटुंबिक पद्धतीप्रमाणे पार पडला आहे.






