Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND W vs AUS W: टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर १०२ धावांनी दणदणीत विजय; दुसऱ्या वनडेमध्ये मालिका १-१ ने बरोबरीत

न्यू चंदीगड येथील महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात, टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा १०२ धावांनी मोठा पराभव करून मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Sep 17, 2025 | 09:10 PM
Team India (Photo Credit- X)

Team India (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:
  • टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर १०२ धावांनी दणदणीत विजय
  • दुसऱ्या वनडेमध्ये मालिका १-१ ने बरोबरीत
  • स्मृती मानधनाचे शानदार शतक
IND W vs AUS W 2nd ODI: भारतीय महिला आणि ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघ (IND W vs AUS W) यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना आज, १७ सप्टेंबर रोजी खेळवण्यात आला. न्यू चंदीगड येथील महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात, टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा १०२ धावांनी मोठा पराभव करून मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. आता तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात दोन्ही संघ मालिका जिंकण्यासाठी आमनेसामने येतील.
And that’s how it is done 😎 🔥#TeamIndia comprehensively win the 2️⃣nd ODI by 102 runs and level the 3 match series 1️⃣-1️⃣ Scorecard ▶️ https://t.co/64x1QjUHl9#INDvAUS | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/lXaEYxrqKq — BCCI Women (@BCCIWomen) September 17, 2025

Harmanpreet Kaur: महिला वर्ल्ड कप २०२५ कसा जिंकणार? कर्णधार हरमनप्रीत कौरचा फॉर्म ठरला चिंतेचा विषय; पाहा आकडेवारी

स्मृती मानधनाचे शानदार शतक

नाणेफेक गमावल्यानंतर आणि प्रथम फलंदाजी मिळाल्यावर टीम इंडियाने चांगली सुरुवात केली. सलामीवीर स्मृती मानधनाने शानदार फलंदाजी करत शतकी खेळी केली. तिने ९१ चेंडूत १४ चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने सर्वाधिक ११७ धावा केल्या. स्मृती मानधनासह दीप्ती शर्मानेही ४० धावांची महत्त्वाची खेळी साकारली. या खेळीच्या जोरावर भारताने ४९.५ षटकांत २९२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून डार्सी ब्राउनने तीन, तर ऍश्ले गार्डनर आणि मेगन शट यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

गोलंदाजांची प्रभावी कामगिरी

२९३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. केवळ १२ धावांमध्ये त्यांचे दोन्ही सलामीवीर तंबूत परतले. त्यानंतर, ऑस्ट्रेलियन संघ ४०.५ षटकांत केवळ १९० धावाच करू शकला. त्यांच्याकडून अ‍ॅनाबेल सदरलँडने सर्वाधिक ४५ धावा केल्या. भारताकडून गोलंदाजीत क्रांती गौरने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तसेच, दीप्ती शर्मानेही दोन बळी मिळवले. आता दोन्ही संघांमधील मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना शनिवार, २० सप्टेंबर रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाईल.

Web Title: Team india beats australia by 102 runs ties series 1 1 in second odi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2025 | 09:10 PM

Topics:  

  • IND VS AUS
  • Smriti Mandhana
  • Sports
  • Sports News
  • Team India

संबंधित बातम्या

रवी शास्त्री इंग्लंडचे नवे प्रशिक्षक असतील का? अ‍ॅशेस पराभवानंतर इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूने ECB ला दिला सल्ला
1

रवी शास्त्री इंग्लंडचे नवे प्रशिक्षक असतील का? अ‍ॅशेस पराभवानंतर इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूने ECB ला दिला सल्ला

IND vs SL T20 : भारतीय महिला श्रीलंकेविरुद्ध मालिका जिंकण्याच्या मार्गावर! टीम इंडियाचा एक विजय मिळवून देणार सिरीजचे जेतेपद
2

IND vs SL T20 : भारतीय महिला श्रीलंकेविरुद्ध मालिका जिंकण्याच्या मार्गावर! टीम इंडियाचा एक विजय मिळवून देणार सिरीजचे जेतेपद

हंगामाचा शेवट विजयाने करणार का गुकेश? हम्पी जेतेपद राखण्याचा करणार प्रयत्न
3

हंगामाचा शेवट विजयाने करणार का गुकेश? हम्पी जेतेपद राखण्याचा करणार प्रयत्न

बॉक्सिंग डे कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाची प्लेइंग 11 कशी असेल? हा एक खेळाडू राहू शकतो पाच दिवस बेंचवर
4

बॉक्सिंग डे कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाची प्लेइंग 11 कशी असेल? हा एक खेळाडू राहू शकतो पाच दिवस बेंचवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.