फोटो सौजन्य - बीसीसीआय
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. ही मालिका 19 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे, या मालिकेसाठी बीसीसीआयने आणि संघ निवडकर्ते अजित आगरकर यांनी भारतीय संघाची घोषणा केली आहे. भारताच्या संघाला आता नवा एकदिवसीय कर्णधार मिळाला आहे. रोहित शर्मानंतर आता शुभमन गिल हा भारतीय संघाचा नवा कर्णधार असणार आहे. एकदिवसीय कर्णधार बनल्याबद्दल गिलची पहिली प्रतिक्रियाही समोर आली आहे.
भारताच्या नव्या कर्णधाराची घोषणा झाल्यानंतर क्रिकेट चाहत्यांच्या अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. संघाची घोषणा झाल्यानंतर आता भारताचा नवा कर्णधार शुभमन गिल यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. गिलने कर्णधार झाल्याबद्दल अभिमान व्यक्त केला. भारताचा एकदिवसीय कर्णधार होणे हा सर्वात मोठा सन्मान आहे असे त्याचे मत आहे. तो म्हणाला, “एकदिवसीय क्रिकेटमध्ये माझ्या देशाचे नेतृत्व करणे आणि इतकी चांगली कामगिरी करणाऱ्या संघाचे नेतृत्व करणे हा माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान आहे. ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि मला आशा आहे की मी चांगली कामगिरी करू शकेन.”
२०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाबद्दल बोलताना गिल म्हणाला, “मला वाटते की विश्वचषक खेळण्यापूर्वी आपल्याकडे सुमारे २० एकदिवसीय सामने शिल्लक आहेत. आमचे अंतिम ध्येय दक्षिण आफ्रिकेतील विश्वचषक आहे. आम्ही सध्या जे काही खेळत आहोत, आम्ही ज्या प्रत्येक खेळाडूला प्रयत्न करत आहोत, ते विश्वचषक जिंकण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत याची खात्री करणे आहे.”
First Test at Home as Captain ✅
Clinical Performance ✅
India’s new ODI captain ✅ After leading #TeamIndia in his maiden Test as captain at home, Shubman Gill reacts to being crowned new ODI captain 👌 – By @Moulinparikh #INDvWI | #AUSvIND | @idfcfirstbank | @ShubmanGill — BCCI (@BCCI) October 4, 2025
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना १९ ऑक्टोबर रोजी पर्थ येथे खेळला जाईल. दुसरा सामना २३ ऑक्टोबर रोजी अॅडलेड येथे खेळला जाईल. तिसरा सामना २४ ऑक्टोबर रोजी सिडनी येथे खेळला जाईल. गिलसाठी ही मालिका मोठी परीक्षा असेल.
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उप-कर्णधार), अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसीद कृष्णा, ध्रुव जुरेल, ध्रुव ज्युरेल (यावलश)