
इशान किशनचे शानदार शतक
कर्णधार शुभमन गिलचे दीड शतक
भारताने अफगणिस्तानला दिले रन्सचे टार्गेट
INDIA Vs Afghanistan 2nd ODI Match Live Updates: लखनौचा एकाना क्रिकेट स्टेडियमवर भारत विरुद्ध अफगणिस्तान यांच्यात दूसरा एकदिवसीय सामना सुरू आहे. अफगणिस्तानच्या संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय केला. भारताने हा निर्णय चुकीचा ठरवला. कर्णधार शुभमन गिल, इशान किशनने शतकी खेळी करत भारताला रन्सपर्यंत पोहोचवले. भारताने अफगणिस्तानला अखेर रन्सचे 403 रन्सचे टार्गेट दिले आहे.
भारताची फलंदाजी
भारताची सुरुवात रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वालने केली. यशस्वी जयस्वाल ४ रन्स करून आउट झाला. तर रोहित शर्मा ४८ रन्सची खेळी करून आउट झाला. त्यानंतर कर्णधार शुभमन गिल आणि इशान किशनने तिसऱ्या विकेटसाठी २०० पेक्षा जास्त रन्सची भागीदारी केली. शुभमन गिलने दीड शतकी खेळी केली. तो १५४ रन्स करून आउट झाला.
इशान किशन १२५ रन्सवर आउट झाला. त्यानंतर उपकर्णधार श्रेयस अय्यर खेळण्यासाठी आला. केएल राहुलने मागील सामन्यात चांगली फिनिशिंग खेळी केली होती. मात्र या सामन्यात पहिल्याच बॉलवर मोठा फटका मारण्याच्या नादात तो आउट झाला. तर उपकर्णधार श्रेयस अय्यर २६ रन्सची खेळी करून आउट झाला. गूरनूर ब्रार ३ रन्स करून आउट झाला.
IND Vs AFG Live: याला म्हणतात पिसं काढणं! Shubhman Gill चे तुफानी दीडशतक; भारत ४०० पार जाणार?
अफगणिस्तानची गोलंदाजी
अफगणिस्तानच्या गोलंदाजांना सुरुवातीला भारताच्या २ विकेट्स सहज मिळवता आल्या. मात्र त्यानंतर त्यांची चांगलीच धुलाई केली गेली. मोहम्मद साफीने १ विकेट घेतली. नांगेयालिया खरोतीने आज चांगली गोलंदाजी केली. त्याने भारताच्या ४ फलंदाजांना आउट केले. तर राशीद खानने २ विकेट्स पटकावल्या.
1️⃣5️⃣4️⃣ Runs
1️⃣1️⃣0️⃣ Balls
2️⃣2️⃣ Fours
2️⃣ Sixes A masterful knock from the #TeamIndia skipper we will remember for a long time 🫡👏 Updates ▶️ https://t.co/JYJ5l44iJ6#INDvAFG | @IDFCFIRSTBank | @ShubmanGill pic.twitter.com/spTDMPC7kv — BCCI (@BCCI) June 17, 2026
भारत: रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, गुरनूर ब्रार, प्रिन्स यादव, अर्शदीप सिंग.
IND vs AFG Live: कडक, खणखणीत अन्…! अफगणिस्तानविरुद्ध Ishan Kishan चे वादळी शतक
अफगाणिस्तानः रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, सादिकुल्ला अटल, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), दरविश रसूली, रशीद खान, न्गेलिया खरोती, एएम गझनफर, मोहम्मद सलीम सफी, बिलाल सामी.