Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ENG Live Score: टीम इंडियाने इंग्लंडला दिले १९० धावांचे लक्ष्य! अभिषेक शर्मा आणि श्रेयस अय्यरची वादळी अर्धशतके

श्रेयस अय्यरने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आज देखील वैभव सूर्यवंशीला डेब्यू करण्याची संधी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार श्रेयस अय्यरकडून देण्यात न आल्याचे पाहायला मिळाले. भारताने इंग्लंजसमोर १९० धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 02, 2026 | 12:04 AM
टीम इंडियाने इंग्लंडला दिले १९० धावांचे लक्ष्य! (Photo Credit- X)

टीम इंडियाने इंग्लंडला दिले १९० धावांचे लक्ष्य! (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • टीम इंडियाने इंग्लंडला दिले १९० धावांचे लक्ष्य!
  • अभिषेक शर्मा आणि श्रेयस अय्यरची वादळी अर्धशतके
  • पाहा स्कोरकार्ड
IND vs ENG 1st T20I: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना आज खेळला जात आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आयर्लंडविरुद्धची टी-२० मालिका ०-२ अशी गमावली होती, परंतु आता ते पुनरागमन करण्याचा प्रयत्न करतील. दरम्यान, श्रेयस अय्यरने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आज देखील वैभव सूर्यवंशीला डेब्यू करण्याची संधी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार श्रेयस अय्यरकडून देण्यात न आल्याचे पाहायला मिळाले. भारताने इंग्लंजसमोर १९० धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
Innings Break! Half-centuries from Abhishek Sharma (59), Shreyas Iyer (68) and a late flourish by Shivam Dube (42*) guide #TeamIndia to a total of 189/7 Scorecard – https://t.co/XfzkYv4bwW | #TeamIndia #ENGvIND #1stT20I pic.twitter.com/6EnqSkvwr5 — BCCI (@BCCI) July 1, 2026


प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने एकूण १८९ धावांची मजल मारली. चेस्टर-ले-स्ट्रीट येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात, अभिषेक शर्मा आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी भारतीय संघासाठी अर्धशतके झळकावली. अवघ्या ६ धावांवर दोन बळी गमावल्यानंतर, भारतीय संघाने दमदार पुनरागमन करत मोठी धावसंख्या उभारली. श्रेयस अय्यरने ६८ धावा केल्या.

६ धावांत दोन बळी, त्यानंतर अभिषेकचा धडाका

अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी भारतीय संघासाठी डावाची सुरुवात केली. सॅमसन केवळ एक धाव काढून बाद झाला, तर इशान किशनला नशिबाची साथ मिळाली नाही; खातेही न उघडता तो धावबाद (रन-आउट) झाला. अशा प्रकारे, अवघ्या ६ धावांवर भारताने दोन गडी गमावले होते. त्यानंतर अभिषेक शर्माने आक्रमक पवित्रा घेत अवघ्या २० चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. इंग्लंडच्या भूमीवर भारतीय खेळाडूने झळकावलेल्या सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रमही अभिषेकने आपल्या नावे केला.

KCA lifts ban: आधी बिनशर्त माफी, मग बॅन हटवला! स्पॉट-फिक्सिंगनंतर ‘हा’ भारतीय गोलंदाज कमबॅक करणार? क्रिकेट असोसिएशनचा मोठा निर्णय

कर्णधार श्रेयसचे पहिले अर्धशतक

श्रेयस अय्यरने कर्णधार म्हणून आपले पहिले आणि कारकिर्दीतील नववे अर्धशतक झळकावले. ५० धावांचा टप्पा गाठण्यासाठी त्याने ३८ चेंडू घेतले, ज्यामुळे हे त्याच्या टी-२० कारकिर्दीतील सर्वात संथ अर्धशतक ठरले. अय्यरने ४७ चेंडूंत ६८ धावा केल्या; या खेळीदरम्यान त्याने सहा चौकार आणि एक षटकार लगावला. दुसरीकडे, तिलक वर्माने १३ चेंडूंत १३ धावा केल्या. भारतीय डावादरम्यान हर्षित राणा चर्चेचा विषय ठरला, कारण त्याला अक्षर पटेलच्या आधी फलंदाजीसाठी पाठवण्यात आले होते. त्याला खातेही उघडता आले नाही आणि तो यष्टिरक्षकाकडून स्टंप होऊन बाद झाला.

शिवम दुबेची चमकदार कामगिरी

शिवम दुबेने ‘डेथ ओव्हर्स’मध्ये उत्कृष्ट ‘फिनिशर’ची भूमिका बजावली आणि २१ चेंडूंत ४२ धावा करून नाबाद राहिला. या आक्रमक खेळीदरम्यान त्याने दोन चौकार आणि तीन षटकार लगावले. दरम्यान, टी-२० क्रिकेटमध्ये यष्टिरक्षक म्हणून जोस बटलरने आपल्या १०० व्या ‘डिस्मिसल’चाटप्पा गाठला; हर्षित राणा हा त्याचा १०० वा बळी ठरला.

ICC T20 Rankings मध्ये मोठा बदल,अभिषेक शर्माला मागे टाकत हा’ खेळाडू बनला जगातील नंबर-१ टी-20 फलंदाज

Web Title: Team india sets england a target of 190 runs explosive half centuries from abhishek sharma and shreyas iyer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 11:58 PM

Topics:  

  • Abhisekh Sharma
  • cricket news
  • IND Vs ENG
  • Shreyas Iyer

संबंधित बातम्या

ENG Vs IND Live: आज देखील वैभवला स्थान नाहीच; श्रेयस अय्यरने टॉस जिंकत घेतला फलंदाजीचा निर्णय
1

ENG Vs IND Live: आज देखील वैभवला स्थान नाहीच; श्रेयस अय्यरने टॉस जिंकत घेतला फलंदाजीचा निर्णय

IND vs ENG: डरहॅमच्या कानाकोपऱ्याबद्दल जाणतो ‘हा’ खेळाडू, इंग्लंडचा बोजवारा उडविण्यासाठी दिल्या टिप्स
2

IND vs ENG: डरहॅमच्या कानाकोपऱ्याबद्दल जाणतो ‘हा’ खेळाडू, इंग्लंडचा बोजवारा उडविण्यासाठी दिल्या टिप्स

IND vs ENG: ‘त्याला संधी मिळणार नाही…’, इंग्लंडविरूद्ध सामन्यासाठी वैभव सूर्यवंशीबाबत चेतेश्वर पुजाराचे मोठे विधान
3

IND vs ENG: ‘त्याला संधी मिळणार नाही…’, इंग्लंडविरूद्ध सामन्यासाठी वैभव सूर्यवंशीबाबत चेतेश्वर पुजाराचे मोठे विधान

Hardik Pandya: 1, 2, 3 नाही तर तब्बल 7 फ्रेंचायझी हार्दिक पांड्याच्या मागे, यादी वाचाच!
4

Hardik Pandya: 1, 2, 3 नाही तर तब्बल 7 फ्रेंचायझी हार्दिक पांड्याच्या मागे, यादी वाचाच!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.