भारतीय संघ पुन्हा अव्वल (फोटो- सोशल मिडिया)
भारतीय संघाने नुकत्याच पार पडलेल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात जपानचा पराभव केला. या विजयाच्या जोरावर भारताने क्रमवारीत पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर झेप घेतली. गेल्या काही काळापासून श्रेयस अय्यरच्या कप्तानीत संघ सातत्यपूर्ण कामगिरी करत असून, या निर्णायक विजयामुळे भारतीय संघाला क्रमवारीत मोठा फायदा झाला आहे.
भारतीय संघ क्रमवारीच्या अग्रस्थानी पोहोचला असला तरीही इंग्लंड आणि भारतीय संघाचे रेटिंग पॉईंट्स सारखेच आहेत. मात्र आकडेवारीनुसार थोडीशी आघाडी भारतीय संघाला मिळाली आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघ टी 20 क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.
IND Vs JPN: पावसाचा व्यत्यय अन् शेवटच्या बॉलपर्यंत थरार! जपानवर भारताचा 2 रन्सने सनसनाटी विजय
काही काळापूर्वी इंग्लंडने भारताला मागे टाकत टी-20 क्रमवारीतील अव्वल स्थान मिळवले होते. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत इंग्लंडने केलेल्या दमदार कामगिरीचा त्यांना क्रमवारीत फायदा झाला होता. मात्र, आता क्रमवारीत पुन्हा बदल झाला असून भारताने इंग्लंडला मागे टाकत अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. टी-20 क्रिकेटमध्ये गेल्या काही काळापासून भारत आणि इंग्लंड यांच्यात अव्वल स्थानासाठी चुरस पाहायला मिळत आहे.
दोन्ही संघांची कामगिरी आणि सामन्यांचे निकाल क्रमवारीवर थेट परिणाम करत असल्याने आगामी सामन्यांमध्येही ही स्पर्धा कायम राहण्याची शक्यता आहे. टी-20 क्रमवारीतील अव्वल स्थान भारतासाठी महत्त्वाचे मानले जात आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करण्याचे टीम इंडियाचे प्रयत्न या क्रमवारीतही दिसून येत आहेत. आता आगामी टी-20 सामन्यांमध्ये भारताला आपले अव्वल स्थान कायम ठेवण्याचे आव्हान समोर असणार आहे. सुरुवातीचे काही सामने संघर्ष करणारा भारतीय संघ सध्या चांगली कामगिरी करताना दिसून येत आहे.
सध्या भारतीय संघ जपानच्या दौऱ्यावर आहे. आज भारत आणि जपान यांच्यात एक सामना खेळवण्यात आला. दोन्ही संघांमध्ये एशियन गेम्सच्या आधी एक सामना खेळवण्यात आला. या चुरशीच्या सामन्यात भारतीय संघाने 2 रन्सने जपानवर विजय प्राप्त केला आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना प्रत्येकी 5 ओव्हर्सचा खेळवला गेला. अखेर भारताने जपानवर 2 रन्सने विजय मिळवला आहे.






