आशिया कपसाठी यूएई संघ जाहीर(फोटो-सोशल मीडिया)
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेला ९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी जवळपास सर्व संघांची घोषणा करण्यात आली आहे. त्याच वेळी, आता यूएईने आशिया कपसाठी आपला संघ जाहीर करण्यात आहे. मोहम्मद वसीमकडे यूएई संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. यूएई क्रिकेट वेबसाइटनुसार, आशिया कपसाठी १७ सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.
हेही वाचा : ODI मधील ‘हे’ आहेत जगातील १० महान फलंदाज! एबी डिव्हिलियर्सने केली खास निवड; जाणून घ्या कोण आहे अव्वल स्थानी?
यूएई क्रिकेट ससंघाचा भारत, ओमान आणि पाकिस्तान या संघासह गट अ मध्ये समावेश आहे. यूएई आपला पहिला सामना १० सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारताविरुद्ध खेळणार आहे. त्यांचा पुढचा सामना १५ सप्टेंबर रोजी अबू धाबी येथील शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर ओमानविरुद्ध असणार आहे. त्यानंतर, त्यांचा शेवटचा गट सामना १७ सप्टेंबर रोजी दुबईमध्ये पाकिस्तानविरुद्ध असणार आहे.
संयुक्त अरब अमिरातीने पाकिस्तान आणि अफगाणिस्तान विरुद्ध सुरू असलेल्या टी-२० तिरंगी मालिकेसाठी त्यांच्या संघात दोन महत्वाचे बदल केले आहे. वेगवान गोलंदाज मतिउल्लाह खान आणि डावखुरा फिरकी गोलंदाज सिमरनजित सिंग यांना संघात स्थान देण्यात आले आहे. तर उर्वरित संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
यूएईकडून आतापर्यंत १ एकदिवसीय आणि ५ टी-२० सामने खेळणारा वेगवान गोलंदाज मतिउल्लाह खान या मालिकेद्वारे संघात पुनरागमन करणार आहे. जुलै २०२५ मध्ये त्याने शेवटचा टी-२० सामना पर्ल ऑफ आफ्रिका मालिकेदरम्यान नायजेरियाविरुद्ध खेळला होता. यूएईचा डावखुरा फिरकी गोलंदाज सिमरनजित सिंगने यूएईकडून ५ एकदिवसीय आणि ११ टी-२० सामने खेळलेले आहेत. डिसेंबर २०२४ मध्ये झालेल्या गल्फ टी२० चॅम्पियनशिपनंतर त्याला पहिल्यांदाच संघात स्थान देण्यात आले आहे.
टी२० आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये यूएईच्या सहभागाबद्दल सांगायचे झाले तर, संघाने शेवटचा २०१६ मध्ये बांगलादेशमध्ये झालेल्या टी२० फॉरमॅटच्या पहिल्या आशिया कपमध्ये सहभाग नोंदवला होता. आशिया कपमधील लीग फेरीनंतर, प्रत्येक गटातील दोन संघ सुपर-४ साठी पत्र ठरणार आहेत. त्यानंतर सुपर-४ सामने खेळवण्यात येणार आहे. सुपर-४ सामने २० ते २६ सप्टेंबर दरम्यान खेळवण्यात येणार आहेत. त्यानंतर या स्पर्धेचा अंतिम सामना २८ सप्टेंबर रोजी होणार आहे.
हेही वाचा : लिटन दासचा टी-२० मध्ये मोठा कारनाम! शकीब अल हसनचा विक्रम मोडला, बांगलादेशसाठी ‘असे’ करणारा ठरला पहिला फलंदाज
मुहम्मद वसीम (कर्णधार), अलिशान शराफू, आर्यनश शर्मा (विकेटकीपर), ध्रुव पराशर, आसिफ खान, एथन डिसूझा, हैदर अली, हर्षित कौशिक, जुनैद सिद्दीकी, मतियल्लाह खान, मुहम्मद जवादुल्लाह, मुहम्मद फारूख, मुहम्मद जोहैब, राहुल चोप्रा (विकेटकीपर), रोहिद खान, सिमरनजीत सिंग आणि सागीर खान.