
भारतातील आघाडीचे उद्योजक आणि चार वेळा जागतिक विजेतेपद पटकावणारे आदित्य गणेशवाडे यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनी होणारी मॅरेथॉन ही पुण्यातील सामुदायिक धावण्याची चळवळ (कम्युनिटी रनिंग मूव्हमेंट) म्हणून ओळखली जाईल. या स्पर्धेत सुमारे ३ ते ५ हजार स्पर्धक सहभागी होतील, असा विश्वास आम्हाला आहे. यामध्ये हौशी तरूण, कॉर्पोरेट क्षेत्रातील संघ, कुटूंबे आणि जेष्ठ नागरिक अशा सर्व वयोगटांतील स्पर्धक सहभागी होतील.
स्पर्धेत असतील चार गट
या स्पर्धेत ३ किमी, ५ किमी, १० किमी आणि २१ किमी असे चार गट असणार आहेत. या स्पर्धेची सुरूवात कोथरूड-कर्वेनगर येथील गांधी लॉन्स् येथून पहाटे ४ वाजता होणार आहे. आदित्य गणेशवाडे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या धावण्याच्या स्पर्धेत उच्च दर्जाची क्रीडा कौशल्ये आणि उद्योजकीय नेतृत्वाचा संगम पाहायला मिळणार आहे.
मुंबईची हवेची गुणवत्ता खालावली, ‘मॅरेथॉन’ वर होणार परिणाम? महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र
नामवंत क्रीडापटूंचा सहभाग
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी भारतीय क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड, अव्वल महिला टेनिसपटू ऋतुजा भोसले, अर्जुन पुरस्कार प्राप्त कबट्टीपटू शांताराम जाधव, आशियायी पदकविजेता स्केटर सिध्दांत कांबळे आदि मान्यवर एकत्र येणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन आणि ‘फ्लॅग ऑफ’ पुण्याचे लोकप्रतिनिधी आणि नगरसेवक यांच्यासह पुण्यातील अनेक आंतरराष्ट्रीय व ऑलिम्पिक पदकविजेते, क्रिडा, मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज यावेळी उपस्थित राहणार आहेत.
मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन
माजी भारतीय महिला कर्णधार वाहबिझ बरूचा, माजी पोलिस सहआयुक्त राजेंद्र भामरे, नगरसेवक निलेश कोंढाळकर, गोखले ग्रुपचे अध्यक्ष विशाल गोखले, अर्चित गोखले, भारतीय खो-खो संघाचा कर्णधार प्रतिक वाईकर, स्केटर आर्य जुवेकर, बॅडमिंटनपटू पुर्वा बर्वे, महाराष्ट्राचे क्रिकेटपटू राजवर्धन हंगरगेकर आणि दिव्यांग हिंगणेकर, सिनेअभिनेते क्षितीज दाते, अक्षय टांकसाळे आणि युट्युबर व इन्फ्लुएन्सर अथर्व सुदावे हे प्रमुख पाहूणे म्हणून उद्घाटन आणि पारितोषिक वितरण प्रसंगी उपस्थित राहणार आहेत.
प्रत्येक सहभागी धावपटूला विशेष भेट
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक धावपटूला विशेष भेट मिळणार आहे. स्पर्धेत सहभागी झाल्याचे प्रतीक म्हणून शर्यतीचा अधिकृत टी-शर्ट आणि शर्यत पूर्ण केल्याबद्दल पदक (‘फिनिशर मेडल’) देण्यात येणार आहे. स्पर्धेत केवळ दोन गटांमध्ये ‘टाईम-बेस’ शर्यत होणार आहे. १० किमी आणि २१ किमी शर्यतींसाठी वेळेची नोंद होणार असून, त्यांना अंतिम वेळेच्या नोंदीनुसार पारितोषिके देण्यात येणार आहेत. २१ किलोमीटर शर्यतीमधील विजेत्यांना टेनेक्स् तर्फे ‘हिरो एक्स्ट्रीम १२५आर’ आणि ‘हिरो झूम १२५’ या मोटारसायकलींचे खास पारितोषिक मिळणार आहे.
Chiplun News: चिपळूणच्या दुसऱ्या हाफ मॅरेथॉनला अभूतपूर्व प्रतिसाद; १८९५ धावपटूंचा सहभाग
सहभागी आणि हौशी स्पर्धकांसाठी ‘फन रन’ शर्यतसुध्दा होणार आहे. यांसह शर्यतीआधी आणि शर्यत पूर्ण झाल्यानंतरही आरोग्य आणि फिटनेस संबंधीत विविध उपक्रम, जेष्ठ नागरिकांसह सर्व वयोगटांसाठी झुंबा व्यायामचे सत्र होणार आहे, असे आदित्य गणेशवाडे यांनी सांगितले. या मॅरेथॉनच्या नोंदणीसाठी townscript.com/e/atenx-independence-run-302300 या संकेतस्थळावर भेट देण्यात यावी. तसेच नावनोंदणी आणि अधिक माहीतीसाठी अथर्व कर्णिक (९४०३०४०३१७) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.