तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाची इंग्लंडवर १३४ धावांची आघाडी (फोटो-सोशल मीडिया)
AUS vs ENG, Ashes 2025 : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची अॅशेस मालिका सुरू आहे. या मालिकेतील पाचव्या आणि अंतिम सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. तिसऱ्या दिवसाच्या खेळाअखेर ऑस्ट्रेलियाने ७ विकेट गमावून ५१८ धावा उभ्या केल्या आहेत.ऑस्ट्रेलियानेआता एकूण १३४ धावांची आघाडी घेऊन सामन्यावर आपली पकड अधिक मजबूत केली आहे. दिवसाच्या खेळाअखेर, सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने शानदार फलंदाजीचा नजारा सादर करत शतक झळकावून नाबाद राहिला.
ऑस्ट्रेलियाचा स्थायी कर्णधार स्टीव्ह स्मिथने मालिकेतील हे आपले पहिले शतक झळकावले आहे. मालिकेदरम्यान तो खराब फॉर्मशी झुंजत असल्याचे दिसून आले होते. स्टीव्ह स्मिथने त्याच्या कारकिर्दीतील ३७ वे कसोटी शतक झळकवले आहे. अॅशेस इतिहासातील हे स्टीव्ह स्मिथचे १३ वे शतक ठरले आहे.
हेही वाचा : विश्वचषक महत्त्वाची भूमिका बजावणार! क्रिकेटमध्ये झिम्बाब्वेला आदर मिळवून देण्याचा कर्णधार रझाचा निर्धार
स्टीव्ह स्मिथ २०५ चेंडूचा सामना करत नाबाद १२९ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने १५ चौकार आणि १ षटकार मारले. स्टीव्ह स्मिथचा डाव ऑस्ट्रेलियासाठी जास्त महत्त्वाचा ठरला आणि त्याच्या खेळीने ऑस्ट्रेलियाच्या आघाडीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्याच्यासोबत ब्यू वेबस्टरने चांगली साथ देत ५८ चेंडूत ४२ धावा करत ४ चौकार मारले. दोघांनी आठव्या विकेटसाठी नाबाद ८१ धावा जोडल्या आहेत.
यापूर्वी, ट्रॅव्हिस हेडने मालिकेतील तिसरे शतक देखील लगावले. हेडने १६६ चेंडूचा सामना करत १६३ धावा केल्या. यामध्ये त्याने २४ चौकार आणि १ षटकार मारले आहेत. ७ बाद ५१८ धावा पूर्ण करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने १३४ धावांची मजबूत आघाडी मिळवली आहे. इंग्लंडकडून ब्रायडन कार्सने तीन, बेन स्टोक्सने दोन आणि जोश टंग आणि जेकब बेथेलने प्रत्येकी एक बळी टिपला आहे.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्या डावात जो रूटच्या १६० आणि हॅरी ब्रुकने ८४ धावांच्या जोरावर इंग्लंडने एकूण ३८४ धावा केल्या होत्या.
ऑस्ट्रेलिया : ट्रॅव्हिस हेड, जेक वेदरल्ड, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), उस्मान ख्वाजा, ॲलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), कॅमेरॉन ग्रीन, ब्यू वेबस्टर, मायकेल नेसर, मिचेल स्टार्क, स्कॉट बोलँड
इंग्लंड : झॅक क्रॉली, बेन डकेट, जेकब बेथेल, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), Mजेमी स्मिथ (यष्टीरक्षक), विल जॅक्स, ब्रायडन कार्स,मॅथ्यू पॉट्स, जोश टंग






