The World's Richest Cricketer Retired at The Age of just 22 He is Ahead of Virat, MS Dhoni in Terms of Money
Aryaman Birla Retirement : जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक असलेल्या आर्यमन बिर्लाने वयाच्या 22 व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आर्यमन दीर्घकाळापासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये सक्रिय आहे, परंतु भारतीय संघात स्थान मिळवण्यात त्याला अद्याप यश आले नाही. IPLमध्येही आर्यमनला अद्याप कोणत्याही संघाने विकत घेतले नव्हते, त्यानंतर आर्यमनने क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला.
सर्वात श्रीमंत खेळाडू
आर्यमन बिर्लाची क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
भारतीय संघाचा युवा खेळाडू आर्यमन बिर्ला याने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करताच सर्व खेळाडूंमध्ये एकच खळबळ उडाली आहे. आर्यमन अवघ्या 22 वर्षांचा असून तो बऱ्याच काळापासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये सक्रिय आहे. आर्यमनला भारतीय संघाचा भाग बनवण्यात अजून यश आले नसले तरी पैशांच्या बाबतीत तो विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी आणि सचिन तेंडुलकर यांच्यापेक्षा खूप श्रीमंत आहे.
आर्यमन विराटपेक्षा खूप श्रीमंत
आर्यमन बिर्ला यांच्याकडे एवढी संपत्ती आहे की, तो एक वेगळा IPL संघ तयार करू शकतो, परंतु दुर्दैवाने तो आजपर्यंत कोणत्याही IPL संघाचा भाग बनू शकला नाही यातील आर्यमन बिर्ला यांनी वयाच्या 22 व्या वर्षी निवृत्तीची घोषणा केली आहे.
आर्यमन वडिलांचा व्यवसाय सांभाळणार
आर्यमन बिर्ला आता क्रिकेटपासून दूर राहून वडील मंगलम बिर्ला यांचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि व्यवसायाला पुढे नेण्यासाठी काम करणार आहे. आर्यमन बिर्ला हा भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगातला सर्वात श्रीमंत खेळाडू आहे. आर्यमन बिर्ला यांच्याकडे सुमारे 70,000 कोटी रुपयांची संपत्ती आहे, परंतु एवढा पैसा असूनही तो आजपर्यंत भारतासाठी एकही सामना खेळू शकलेला नाही.
हेही वाचा : ‘तेरा यार हूँ मैं’…जीवाभावाच्या मित्राला पाहून विनोद कांबळी भावूक, सचिन तेंडुलकरसह भेट झाली Viral
बालपणीचे स्वप्न अधुरे
आर्यमन बिर्ला यांना लहानपणापासूनच क्रिकेटर बनायचे होते. त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याच्या वडिलांनीही त्याला पाठिंबा दिला, आर्यमन बिर्लाने 2017 मध्ये मध्य प्रदेशसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. यानंतर त्याची लिस्ट ए साठीही निवड झाली. आर्यमनची प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चांगली सुरुवात झाली होती आणि त्याने 9 सामन्यांच्या 16 डावात 1 शतक आणि 1 अर्धशतकासह एकूण 414 धावा केल्या. आर्यमन शेवटचा 2019 मध्ये मैदानावर दिसला होता.