Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ICC Ranking : सूर्याच्या साम्राज्याला ‘तिलक’ धोका! ICC रँकिंगमध्ये घेतली मोठी झेप 

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी 20 मालिकेत शानदार कामगिरी करणाऱ्या तिलक वर्माला मोठा फायदा झाला आहे. आयसीसीकडून ताज्या टी२० आंतरराष्ट्रीय फलंदाजी क्रमवारीत त्याने मोठी झेप घेतली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Dec 17, 2025 | 05:19 PM
ICC Ranking: Tilak Varma poses a threat to Suryakumar Yadav's dominance! He has made a big leap in the ICC rankings.

ICC Ranking: Tilak Varma poses a threat to Suryakumar Yadav's dominance! He has made a big leap in the ICC rankings.

Follow Us
Close
Follow Us:

ICC T20 Rankings : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी 20 मालिका खेळली जात आहे. या दरम्यान आयसीसीकडून नवीनतम टी२० आंतरराष्ट्रीय फलंदाजी क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. या क्रमवारीत भारतीय खेळाडूंनी बाजी मारली आहे. भारताचा स्फोटक अभिषेक शर्माने आपली दहशत कायम राखली आहे. तर तिलक वर्माने देखील आपल्या क्रमवारीत चांगली कामगिरी बजावली आहे. दरम्यान, कर्णधार सूर्यकुमार यादवसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

हेही वाचा : Messi India Tour : मेस्सीच्या शो दरम्यान गोंधळ प्रकरण! क्रीडा मंत्री अरुप बिस्वास यांनी दिला राजीनामा

अभिषेक शर्माचा दबदबा कायम

भारतीय सलामीवीर अभिषेक शर्माने ताज्या आयसीसी टी२० आंतरराष्ट्रीय क्रमवारीत पहिले स्थान अबाधित राखले आहे. त्याचे रेटिंग ९०९ वर पोहोचले असून ते कोणत्याही फलंदाजासाठी एक महत्त्वाची कामगिरी मानली जाते. त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे अभिषेकने अव्वल स्थानावर आपली पकड अधिक मजबूत करण्यात यश मिळवले आहे. इंग्लंडचा फिल साल्ट ८४९ रेटिंगसह दुसऱ्या क्रमांकावर विराजमान  आहे. श्रीलंकेचा पथुम निस्सांका ७७९ रेटिंगसह तिसऱ्या स्थानी आहे.

तिलक वर्माची मोठी झेप

भारतीय युवा फलंदाज तिलक वर्माने ताज्या क्रमावरीत दोन स्थानांनी झेप घेऊन तो चौथ्या स्थानावर जाऊन पोहोचला आहे. त्याचे रेटिंग आता ७७४ असून अलिकडच्या सामन्यांमध्ये त्याने शानदार कामगिरी केली आहे. त्यामुळे थेट टॉप चारमध्ये पोहोचला आहे. ही वाढ आगामी सामन्यांमध्ये टीम इंडियासाठी सकारात्मक बाब मानली जात आहे.

‘या’ खेळाडूंची कामगिरी खालावली

तिलक वर्माच्या चांगल्या कामगिरीचा परिणाम इतर काही फलंदाजांवर देखील झालेला दिसून येत आहे. इंग्लंडच्या जोस बटलरला एका स्थानाचा फटका बसला आहे. तो आता ७७० च्या रेटिंगसह पाचव्या स्थानी गेला आहे. पाकिस्तानचा साहिबजादा फरहान देखील ७५२ च्या रेटिंगसह सहाव्या स्थानावर मागे सरकला आहे. तथापि, ऑस्ट्रेलियाचा मिशेल मार्शला एका स्थानाने वर गेला आहे. तो आता ६८४ च्या रेटिंगसह आठव्या स्थानावर पोहचला आहे.  न्यूझीलंडचा टिम सेफर्ट देखील दोन स्थानांनी पुढे गेला आहे. तो आता ६८३ च्या रेटिंगसह नवव्या स्थानावर पोहचला आहे.

हेही वाचा : ICC Ranking : कोणत्याही भारतीय गोलंदाजाला जमले नाही ते..! आता ‘मिस्ट्री’ फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीने करून दाखवले…

सूर्यकुमार यादवसाठी धोक्याची घंटा

भारतीय टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादवसाठी ही रँकिंग चिंतेचे कारण ठरली आहे. एकेकाळी टी-२० क्रमवारीत नंबर वन फलंदाज असलेला सूर्या आता टॉप १० मधून बाहेर पडण्याच्या जवळ येऊन पोहचला आहे. तो एका स्थानाने घसरला आहे आणि ६६९ रेटिंगसह दहाव्या क्रमांकावर जाऊन पोहचला आहे.

Web Title: Tilak varma makes a big leap in the icc t20 rankings

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2025 | 05:19 PM

Topics:  

  • ICC Ranking
  • Suryakumar Yadav
  • T20 cricket
  • Tilak Varma

संबंधित बातम्या

ICC Ranking : कोणत्याही भारतीय गोलंदाजाला जमले नाही ते..! आता ‘मिस्ट्री’ फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीने करून दाखवले…
1

ICC Ranking : कोणत्याही भारतीय गोलंदाजाला जमले नाही ते..! आता ‘मिस्ट्री’ फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीने करून दाखवले…

IND vs SA 4th T20I : सूर्याआर्मी मालिका विजयाच्या निर्धाराने उतरणार मैदानात! दक्षिण आफ्रिकेसमोर बरोबरी साधण्याचे ध्येय 
2

IND vs SA 4th T20I : सूर्याआर्मी मालिका विजयाच्या निर्धाराने उतरणार मैदानात! दक्षिण आफ्रिकेसमोर बरोबरी साधण्याचे ध्येय 

IND vs SA T20 Series : जसप्रीत बुमराह उर्वरित दोन सामने खेळणार की नाही? BCCI ने दिली मोठी अपडेट, वाचा सविस्तर
3

IND vs SA T20 Series : जसप्रीत बुमराह उर्वरित दोन सामने खेळणार की नाही? BCCI ने दिली मोठी अपडेट, वाचा सविस्तर

IND vs SA : मी फॉर्ममध्ये नाहीये असं वाटतय… विजयानंतर सूर्यकुमार यादवने सांगितले त्याच्या खराब फॉर्मबद्दल
4

IND vs SA : मी फॉर्ममध्ये नाहीये असं वाटतय… विजयानंतर सूर्यकुमार यादवने सांगितले त्याच्या खराब फॉर्मबद्दल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.