Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एकेकाळचे ‘जय-वीरू’ आज भिडणार! Ronaldo की Modric? फुटबॉल चाहत्यांसाठी असणार पर्वणी

मैदानात एकमेकांना सहकार्य करणारे हे दोन जिवलग मित्र आपापल्या देशाच्या प्रतिष्ठेसाठी आणि 'फिफा वर्ल्ड कप' जिंकण्याचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकमेकांसोबत  भिडणार आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 02, 2026 | 01:27 PM
एकेकाळचे ‘जय-वीरू’ आज भिडणार! Ronaldo की Modric? फुटबॉल चाहत्यांसाठी असणार पर्वणी
Follow Us
Follow Us:
  • फिफा वर्ल्ड कप २०२६ ची बाद फेरी 
  • ख्रिस्तियानो रोनाल्डो व लुका मोड्रिक येणार आमनेसामने
  • सर्वात मोठे आणि दिग्गज खेळाडू आमनेसामने

Fifa World Cup 2026: सध्या फिफा वर्ल्डकप 2026 चा थरार सुरू आहे. आज राऊंड ऑफ 32 च्या बाद फेरीत दोन बलाढ्य संघ आमनेसामने येणार आहेत. कॅनडातील टोरंटो येथील ‘बीएमओ फील्ड’ या स्टेडियमवर युरोपमधील दोन बलाढ्य संघ भिडणार आहेत. पोर्तुगाल आणि क्रोएशिया एकमेकांशी भिडणार आहेत. आज फिफा वर्ल्डकपच्या बाद फेरीत पोर्तुगाल आणि क्रोएशिया एकमेकांशी भिडणार आहेत. आजचा सामना अत्यंत महत्वाचा आसल्याने दोन्ही संघांसाठी करो या मरो अशी स्थिती असणार आहे. या सामन्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे आमनेसामने येणारे दोन्ही खेळाडू.

पोर्तुगालचा स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो ४१ वर्षांचा आहे. तर क्रोएशियाचा मुख्य मिडफिल्डर लुका मोड्रिक ४० वर्षांचा आहे. एकमेकांविरुद्ध खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे. या दोन्ही महानायकांसाठी आपला हा ६ वा वर्ल्ड कप असून, कदाचित हा त्यांच्या कारकिर्दीतील शेवटचा वर्ल्ड कप सामना ठरू शकतो. ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लुका मोड्रिक यांनी स्पॅनिश क्लब ‘रियल माद्रिद’साठी एकत्र खेळताना ६ मोसमात तब्बल ४ युरोपियन चॅम्पियन्स लीग जेतेपदे जिंकली आहेत.

Kylian Mbappe Record: एम्बाप्पेचा विश्वविक्रम! 88 वर्षांचा विक्रम मोडत रचला इतिहास, मेस्सीचा विक्रमही धोक्यात

सामना कधी सुरू होणार?

तारीख: ३ जुलै २०२६

वेळ: पहाटे ४:३० वाजता (भारतीय वेळेनुसार)

स्थान: टोरंटो स्टेडियम , कॅनडा.

मैदानात एकमेकांना सहकार्य करणारे हे दोन जिवलग मित्र आपापल्या देशाच्या प्रतिष्ठेसाठी आणि ‘फिफा वर्ल्ड कप’ जिंकण्याचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकमेकांसोबत  भिडणार आहेत. रोनाल्डोने उझबेकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दोन शानदार गोल करत आपला फॉर्म दाखवून दिला आहे.

MEX vs ECU: 40 वर्षानंतर रचला इतिहास, मेक्सिकोने एक्वाडोरला नॉकआऊटमध्ये हरवलं

मेस्सीचा विक्रमही धोक्यात

फिफा विश्वचषक २०२६ च्या राऊंड ऑफ ३२ मध्ये फ्रान्सने स्वीडनला ३-० ने पराभूत करून अंतिम १६ मध्ये प्रवेश केला. न्यूयॉर्क-न्यू जर्सी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यातील विजयपेक्षा अधिक चर्चा कर्णधार किलियन एम्बाप्पेची झाली. दोन गोल करून, त्याने केवळ संघाला सहज विजय मिळवून दिला नाही, तर विश्वचषकाच्या इतिहासात जवळपास नऊ दशकांपासून अबाधित असलेला एक विक्रमही प्रस्थापित केला. कर्णधार किलियन एम्बाप्पेने या सामन्यात दोन गोल करून १० गोलांसह फिफा विश्वचषकाच्या बाद फेरीतील सर्वाधिक गोल करणारा खेळाडू बनण्याचा मान मिळवला आणि ब्राझीलचे महान खेळाडू लिओनिडोस यांचा ८८ वर्षे जुना विक्रम मोडला.

Web Title: Today knockout match ronaldo vs modric in fifa world cup 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 01:25 PM

Topics:  

  • Cristiano Ronaldo
  • Fifa World Cup
  • Football Tournament

संबंधित बातम्या

Cristiano Ronaldo Retirement: एका युगाचा अंत होणार? ‘कदाचित हे माझं शेवटचं…’; ख्रिस्तियानो रोनाल्डो मोठ्या निर्णयाच्या तयारीत
1

Cristiano Ronaldo Retirement: एका युगाचा अंत होणार? ‘कदाचित हे माझं शेवटचं…’; ख्रिस्तियानो रोनाल्डो मोठ्या निर्णयाच्या तयारीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.