Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Sports: चौथ्या फेरीअखेर धुरळा! विहान, अद्विक, अर्णवचा दणदणीत विजय; तर…

१० वर्षांखालील गटात अद्विक नवल याने जयदेव राणा याचा पराभव करून ४ गुणांची कमाई केली. त्याच गटात अर्णव पाटील याने अगस्त्य शिवरकरवर विजय मिळवत आपली विजयी घोडदौड कायम राखली.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 17, 2026 | 03:40 PM
Pune Chess Competition

Pune Chess Competition

Follow Us
Follow Us:

बुद्धिबळ स्पर्धेत चौथ्या फेरीनंतर पाच खेळाडूंचे प्रत्येकी ४ गुण
विहान कांबळे याने केला शर्विल गोडबोलेचा पराभव
पुण्यात सुरू आहेत बुद्धिबळ स्पर्धा

पुणे: आर्यन्स बुद्धिबळ अकादमीच्या वतीने महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष राजेंद्र कोंडे आणि केतन खैरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अनस्टॉपेबल एलबीएचएम ब्लिट्झ व रॅपिड खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत (Sports) चौथ्या फेरीनंतर विविध वयोगटांतील विहान कांबळे, अद्विक नवल, अर्णव पाटील, रिजूल कुऱ्हाडे आणि विहान देशमुख यांनी प्रत्येकी ४ गुणांची कमाई करत संयुक्त आघाडी घेतली आहे. नवले लॉन्स, पुणे येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत चौथ्या फेरीअखेर विविध वयोगटांतील आघाडीच्या खेळाडूंनी आपले विजयी अभियान कायम ठेवले. ८ वर्षांखालील गटात विहान कांबळे याने शर्विल गोडबोलेचा पराभव करत चौथा विजय नोंदवला आणि ४ गुणांसह आघाडी मिळवली.

अद्विक, अर्णव आघाडीवर
१० वर्षांखालील गटात अद्विक नवल याने जयदेव राणा याचा पराभव करून ४ गुणांची कमाई केली. त्याच गटात अर्णव पाटील याने अगस्त्य शिवरकरवर विजय मिळवत आपली विजयी घोडदौड कायम राखली. चौथ्या फेरीअखेर अद्विक आणि अर्णव या दोघांनीही प्रत्येकी ४ गुण मिळवत आघाडीच्या खेळाडूंमध्ये स्थान मिळवले आहे.

उंट, घोडा अन्…! बुद्धिबळाच्या पटावर आंतरराष्ट्रीय थरार; पुण्यात जगभरातून तब्बल 400…

 रिजूल, विहान देशमुख यांची आगेकूच
१२ वर्षांखालील गटात रिजूल कुऱ्हाडे याने तनिष शिंदेचा पराभव करून ४ गुणांची कमाई केली. सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर रिजूलने चौथ्या फेरीनंतर गटात आघाडीचे स्थान कायम राखले आहे. १५ वर्षांखालील गटात विहान देशमुख याने अर्णव तनपुरेवर विजय मिळवत स्पर्धेतील आपला चौथा विजय नोंदवला. या विजयासह विहान देशमुख यानेही ४ गुणांची कमाई करत आघाडीच्या खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवले.

 मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन
यापूर्वी स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष राजेंद्र कोंडे आणि जागतिक सुवर्णपदक विजेत्या येरवडा कारागृह संघाचे प्रशिक्षक केतन खैरे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी स्पर्धेचे आयोजन सचिव आर्यन हलकुडे, नागनाथ हलकुडे तसेच मुख्य आर्बिटर आंतरराष्ट्रीय आर्बिटर श्रद्धा विंचवेकर आदी उपस्थित होते. स्पर्धेतील पुढील फेऱ्यांमध्ये आघाडी कायम ठेवण्यासाठी विविध वयोगटांतील खेळाडूंमध्ये चुरस वाढण्याची अपेक्षा असून, चौथ्या फेरीनंतर प्रत्येकी ४ गुणांसह आघाडीवर असलेल्या खेळाडूंची कामगिरी विशेष लक्षवेधी ठरली आहे.

हंगामाचा शेवट विजयाने करणार का गुकेश? हम्पी जेतेपद राखण्याचा करणार प्रयत्न

Web Title: Unstoppable in the lbhm blitz and rapid chess tournament pune sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • Chess
  • pune news
  • Pune Sports News

संबंधित बातम्या

Cricket: ८० रन्सची तुफानी खेळी अन् सलग दुसरा विजय! ‘रायझिंग स्टार ब्ल्यू’ चा दणदणीत पराक्रम
1

Cricket: ८० रन्सची तुफानी खेळी अन् सलग दुसरा विजय! ‘रायझिंग स्टार ब्ल्यू’ चा दणदणीत पराक्रम

Pune News: बारामती, पुरंदरमध्ये ‘इलेक्शन मोड’; मतदार यादी निरीक्षकांकडून BLO अन् मतदारांशी थेट संवाद
2

Pune News: बारामती, पुरंदरमध्ये ‘इलेक्शन मोड’; मतदार यादी निरीक्षकांकडून BLO अन् मतदारांशी थेट संवाद

Loyola Football Cup: आर्हतवा डोंगरेचा ‘पंच’! पेनल्टी शूटआऊटमध्ये तीन बचाव, बिशप्स कॅम्प उपांत्य फेरीत
3

Loyola Football Cup: आर्हतवा डोंगरेचा ‘पंच’! पेनल्टी शूटआऊटमध्ये तीन बचाव, बिशप्स कॅम्प उपांत्य फेरीत

Pune PMC Mula Mutha Riverfront: मुळा-मुठा नदीकाठ सुधार प्रकल्पासाठी खासगी जागेचे भूसंपादन; महापालिकेचा स्थायी समितीपुढे प्रस्ताव
4

Pune PMC Mula Mutha Riverfront: मुळा-मुठा नदीकाठ सुधार प्रकल्पासाठी खासगी जागेचे भूसंपादन; महापालिकेचा स्थायी समितीपुढे प्रस्ताव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.