Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पैसाच-पैसा! ना 100, ना 200 कोटी… US Open 2026 मध्ये टेनिसपटूंवर होणार तब्बल ‘इतक्या’ कोटींची बरसात

US Open 2026 108M prize Money: यूएस ओपन २०२६ च्या टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या एकूण बक्षीस रकमेत लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. खेळाडूंना किती मिळणार प्राइस मनी, जाणून घेऊयात.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 26, 2026 | 06:16 PM
US Open 2026 prize Money

US Open 2026 prize Money

Follow Us
Follow Us:
  • टेनिसच्या इतिहासात नवा विक्रम
  • 1000 कोटींची प्राइज मनी जाहीर
  • खेळाडूही होणार मालामाल
टेनिस ग्रँड स्लॅम यूएस ओपन २०२६ (US Open 2026) स्पर्धेला सुरुवात झाली आहे. ही स्पर्धा ३० ऑगस्ट ते १३ सप्टेंबर दरम्यान खेळवली जाईल. या स्पर्धेसाठी बक्षिसाच्या रकमेत विक्रमी वाढ झाली आहे. ही रक्कम गेल्या वर्षीच्या तुलनेत २०% वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळे या स्पर्धेत खेळाडूंवर पैशांचा वर्षाव होणार आहे. यूएस टेनिस असोसिएशनने (USTA) स्पर्धेच्या बक्षीस रकमेची घोषणा केली. या हंगामात किती असेल प्राइस मनी, जाणून घेऊयात.

US Open 2026 मध्ये दिग्गजांना मोठा धक्का! सेरेना-अल्काराझचा पराभव; जोकोविच-सबालेन्काही पहिल्याच फेरीत गारद

US Open साठी तब्बल १००० कोटींची प्राइस मनी

यूएस ओपन २०२६ ची एकूण प्राइस मनी १०८ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच अंदाजे १,०३३ कोटी रुपये आहे. ही रक्कम गेल्या वर्षीच्या तुलनेत २०% आणि २०२४ च्या तुलनेत जवळपास ४४% अधिक आहे. गेल्या वर्षीच्या यूएस ओपन पुरुष आणि महिला एकेरीचे विजेते, कार्लोस अल्काराझ आणि आर्यना सबालेन्का यांना प्रत्येकी ५ दशलक्ष डॉलर्स मिळाले होते. २०२५ मध्ये, स्पर्धेतील खेळाडूंना मिळालेली एकूण बक्षीस रक्कम ९० दशलक्ष डॉलर्स होती. या वर्षी पुरुष आणि महिला एकेरीच्या विजेत्यांना प्रत्येकी ५.५ लाख डॉलर्स म्हणजेच अंदाजे ५२.६६ कोटी रुपये इतकी बक्षीस रक्कम मिळेल. टेनिसच्या इतिहासात ग्रँड स्लॅम एकेरी विजेत्याला देण्यात आलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी बक्षीस रक्कम असेल.

मुख्य ड्रॉमध्ये पोहोचणारे खेळाडूही मालामाल होणार

मुख्य स्पर्धा ३० ऑगस्ट रोजी सुरू होईल आणि १३ सप्टेंबरपर्यंत चालेल. मुख्य ड्रॉमध्ये स्थान मिळवणाऱ्या प्रत्येक खेळाडूला १४०,००० लाख डॉलर्स अंदाजे रु. १३.४ कोटी रुपये मिळतील. उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणाऱ्यांना ७८०,००० लाख डॉलर्स म्हणजे अंदाजे ७४.६ कोटी रुपये मिळतील. उपांत्य फेरीत पराभूत झालेल्यांना १४५,००० लाख डॉलर्स म्हणजे अंदाजे रु. १३८.८ कोटी रुपये मिळतील. उपविजेत्या संघाला २८ लाख डॉलर्स म्हणजेच अंदाजे २६.८० कोटी रुपये मिळतील.

दुहेरीच्या विजेत्यांना १० लाख डॉलर्स

यूएस ओपन मध्ये पुरुष दुहेरी, महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरीतील विजेत्या संघांना बक्षीस म्हणून १० लाख डॉलर्स मिळतील. उपविजेत्या संघाला ५ लाख डॉलर्स मिळतील. व्हीलचेअर एकेरीच्या विजेत्यांसाठीची बक्षीस रक्कमही वाढवण्यात आली आहे. त्यांना १ लाख डॉलर्स मिळतील.

USTA ने एका नवीन ‘प्लेअर सपोर्ट प्रोग्राम’ची घोषणा केली आहे, ज्याची सुरुवातीची रक्कम २० लाख डॉलर्स निश्चित करण्यात आली आहे . ही रक्कम पुरुष आणि महिला खेळाडूंमध्ये समान विभागली जाईल. या कार्यक्रमाचा उद्देश खेळाडूंना अतिरिक्त सुविधा आणि लाभ प्रदान करणे, तसेच विद्यमान पेन्शन निधीला आधार देणे हा आहे.

Cricket News: देशांतर्गत क्रिकेटमध्ये आणखी एका संघाची भर? अंदमान-निकोबारबाबत BCCI घेणार मोठा निर्णय

Web Title: Us open 2026 prize money 108 million pool prize money largest prize fund in grand slam history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 06:16 PM

Topics:  

  • Aryna Sabalenka
  • International Tennis Tournament
  • MONEY
  • Novak Djokovic
  • USA

संबंधित बातम्या

उधार घेतलेले पैसे परत करायला लोक टाळाटाळ का करतात? जाणून घ्या यामागचं मानसशास्त्र
1

उधार घेतलेले पैसे परत करायला लोक टाळाटाळ का करतात? जाणून घ्या यामागचं मानसशास्त्र

Earn Money Selling Old Clothes Online : जुने कपडे फेकून देण्याऐवजी विकून करा कमाई! ऑनलाइन कुठे, कसे विकायचे? जाणून घ्या ट्रिक्स
2

Earn Money Selling Old Clothes Online : जुने कपडे फेकून देण्याऐवजी विकून करा कमाई! ऑनलाइन कुठे, कसे विकायचे? जाणून घ्या ट्रिक्स

Money Management Tips : ‘इतका खर्च का करतोस?’ पती-पत्नीमध्ये पैशांवरुन भांडण? हे ४ सोपे नियम वाढवतील बचत
3

Money Management Tips : ‘इतका खर्च का करतोस?’ पती-पत्नीमध्ये पैशांवरुन भांडण? हे ४ सोपे नियम वाढवतील बचत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.