संजय मांजरेकरांचा पारा चढला (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
Dear @icc & @bcci…
Vaibhav for Ind A recently & now Jaiswal… if you keep letting them get away with such behaviour, you train them to repeat such behaviour. It’s not good for the sport & crucially their own future too. 🙏 — Sanjay Manjrekar (@sanjaymanjrekar) August 26, 2026
‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बोलताना संजय मांजरेकर म्हणाले की, मैदानातील खराब वर्तनानंतरही खेळाडूंना किरकोळ दंड देऊन सोडून दिल्याने त्यांना अशा चुका पुन्हा करण्यास प्रोत्साहन मिळते. त्यांनी लिहिले, “आधी इंडिया ‘ए’ संघाचा वैभव सूर्यवंशी आणि आता यशस्वी जयस्वाल… अशा वर्तनानंतरही तुम्ही त्यांना सोडून देत आहात. तुम्ही त्यांना असे वर्तन पुन्हा करण्यास प्रोत्साहन देत आहात. हे खेळासाठी आणि विशेषतः या दोन खेळाडूंच्या भविष्यासाठी चांगले नाही.”
IND vs SL: अरेरे! काय ही अवस्था, फॉलोऑन खेळणाऱ्या श्रीलंकेच्या २ विकेट्स, अजूनही १३० धावांनी मागे
कोलंबो कसोटीत भारताच्या पहिल्या डावादरम्यान, यशस्वी जयस्वाल असिथा फर्नांडोच्या गोलंदाजीवर ४५ धावांवर बाद झाला. पॅव्हेलियनमध्ये परतत असताना, फर्नांडोच्या स्लेजिंगमुळे जयस्वाल संतापला. त्यांच्यात जोरदार वाद झाला, ज्याचे पर्यवसान समोरासमोरच्या धडकेत झाले. या घटनेसाठी आयसीसीने केवळ दंड आणि डिमेरिट पॉइंट लावला. दरम्यान यावर हर्षा भोगले यांच्या व्हिडिओवर यशस्वी जयस्वालने कमेंट करत तुम्हाला पूर्ण माहिती नसेल तर बोलू नका असे स्पष्ट सांगितले होते. त्यावरही सोशल मीडियावर प्रचंड चर्चा झाली.
जूनमध्ये त्रिकोणीय मालिकेत श्रीलंका ‘अ’ संघाविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये झालेल्या पराभवानंतर, १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा संयम सुटला. वादादरम्यान त्याने श्रीलंका ‘अ’ संघाच्या विशन हलंबगेला ढकलले. इतक्या लहान वयात अशा आक्रमक वर्तनानंतरही कठोर कारवाईचा अभाव असल्याबद्दल मांजरेकर यांनी चिंता व्यक्त केली. त्याच्या मते, खेळात शिस्त राखण्यासाठी आयसीसी आणि बीसीसीआयने हे नियम अधिक कडक केले पाहिजेत तरच पुढे खेळाडूंना योग्य दिशा मिळेल आणि असे वागण्यापासून रोख लागेल.






